नागपूर : नागपुरातील संविधान चौकात आज अचानक स्टार बसला आग (fire broke out) लागली. यावेळी बसमध्ये 45 प्रवासी (45 passengers) होते. बसमधून धूर निघत असल्याचं लक्षात येताच चालक आणि वाहकाने प्रसंगावधान राखत प्रवाश्यांना बाहेर (passengers survived) काढलं. वाहकाने एका वृद्ध महिलेला उचलून बाहेर काढलं. त्यामुळं जीवितहानी झाली नाही. बॅटरीमध्ये शॉर्ट सर्किटमुळं आग लागल्याची प्राथमिक माहिती आहे. यंदाच्या उन्हाळ्यात स्टार बसला आग लागण्याची ही तिसरी घटना आहे. तापमान वाढल्यानं आग लागण्याच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. तसंच शहरातील अनेक स्टार बसचं मेंटेनन्स होत नसल्यानं सुद्धा आग लागण्याच्या घटना घडताहेत. गौरव कांबळे या वाहकानं यानिमित्त टीव्ही 9 मराठीशी संवाद साधला.
नागपुरातील संविधान चौकात स्टार बसला लागली आग pic.twitter.com/1CJfJRiHG3
हे सुद्धा वाचा— Govind Hatwar (@GovindHatwar) May 5, 2022
नागपूर स्टार बसची हालत खराब आहे. मध्यंतरी कर्मचाऱ्यांनी वेळेवर पगार मिळावा, यासाठी आंदोलन केलं होतं. कर्मचाऱ्यांना वेळेवर पगार मिळत नव्हते. अशीची काहीशी अवस्था मेंटनन्सच्या बाबतीत आहे. स्टार बसचे व्यवस्थापन योग्य पद्धतीनं होत नाही. त्यामुळं आगीच्या घटना घडतात. यंदा उन्हाळ्यात स्टार बस पेटण्याची ही तिसरी घटना आहे. यापूर्वी मेडिकल चौकात स्टार बस पेटली होती. तापमान वाढल्यामुळं या गाड्या पेटतात. पण, त्या योग्य पद्धतीनं तंदुरुस्त असत्या तर पेटल्या नसत्या असं चालक चांगतात. गाडी चांगली असेल तर ती सहसा पेट घेत नाही. पण, गेल्या काही दिवसांपासून स्टार बसची योग्य पद्धतीनं दुरुस्ती करण्यात आली नाही. त्यामुळं खटारा गाड्या रस्त्यावर धावत आहेत. या अतिशय धोकादायक आहेत.
संविधान चौकात स्टार बस पेटताच वाहकानं हुशारी केली. पटकन प्रवाशांना खाली उतरविण्यात आलं.
एक वृद्ध महिला फसली होती. वाहकानं प्रसंगावधान साधून तिला बाहेर काढलं. अग्निशमन विभागाचं पथक घटनास्थळी पोहचलं. तोपर्यतं गाडी जळून खाक झाली होती. अग्निशमन विभाग तत्पर आहे. त्यांच्याकडं कर्मचाऱ्यांची कमी असल्यानं नुकतीच भरती प्रक्रिया राबविण्यात आली.