राज्य सरकारने व्हॅट कमी करावे, भाजपचे नागपुरात आंदोलन
केंद्र सरकारनं पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी केलेत. आता राज्य सरकारनं व्हॅट कमी करून इंधनाचे दर कमी करावेत, या मागणीसाठी नागपुरात भारतीय जनता पक्षाने आंदोलन केलं. यावेळी निषेध सभा घेत राज्य सरकारनं व्हॅट कमी न केल्यास आंदोलनाचा इशारा देण्यात आला.
नागपूर : केंद्र सरकारनं पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी केलेत. आता राज्य सरकारनं व्हॅट कमी करून इंधनाचे दर कमी करावेत, या मागणीसाठी नागपुरात भारतीय जनता पक्षाने आंदोलन केलं. यावेळी निषेध सभा घेत राज्य सरकारनं व्हॅट कमी न केल्यास आंदोलनाचा इशारा देण्यात आला.
पोलीस-कार्यकर्त्यांत बाचाबाची
भारतीय जनता युवा मोर्च्याच्या कार्यकर्त्यांनी राज्य सरकारचा प्रतिकात्मक पुतळा जाळला. यावेळी कार्यकर्त्यांनी व्हेरायटी चौकात रास्ता रोको आंदोलन केले. त्यामुळं पोलीस आणि कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची झाली. भाजपचे कार्यकर्ते आक्रमक झाले होते. वातावरण तापले होते.
चंद्रशेखर बावनकुळे यांची उपस्थिती
राज्य सरकारने इंधनावरील व्हॅट कमी करावे. अन्यथा राज्यभरात रस्त्यावर उतरून आंदोलन केले जाईल, असा इशारा भाजपचे महासचिव चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिला. यावेळी भाजपचे प्रवीण दटके आणि अरविंद गजभिये उपस्थित होते.
सरकारला पडणार 400 कोटींचा भार
भाजपशासित राज्यात केंद्र आणि राज्य सरकारनं मिळून पेट्रोल, डिझेलवरील दर 10 ते 12 रुपये कमी केलेत. राज्य सरकारनं व्हॅट कमी केल्यास त्यांना 400 ते 500 कोटी रुपयांचा भार सहन करावा लागेल. त्यासाठी ते मागेपुढं पाहत आहेत, असा आरोप चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला.
पालकमंत्री गेले कुठे?
एसटी कर्मचारी आंदोलन करीत आहेत. त्याचे प्रश्न सोडविणे आवश्यक आहे. अशावेळी पालकमंत्री डॉ. नितीन राऊत हे कुठेच दिसत नाही. ते गेले कुठे असा सवाल चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला. फडणवीस मुख्यमंत्री असताना मनपाला 600 कोटी रुपये दरवर्षी मिळत होते. आता राज्य सरकारनं हा निधीही कमी केला आहे. फक्त 100 कोटी रुपये आता मिळतात.
इतर बातम्या :