कामाचा व्याप वाढतोय, असे व्हा तणावमुक्त; आयुक्तांनी दिल्या या खास टिप्स

कामातून तणाव निर्माण होतो. हा तणाव कमी करण्यासाठी गेट टुगेटर, क्रीडा, कला गुण प्रदर्शन, सांस्कृतिक कार्यक्रम यांची मदत होते.

कामाचा व्याप वाढतोय, असे व्हा तणावमुक्त; आयुक्तांनी दिल्या या खास टिप्स
Follow us
| Updated on: Feb 25, 2023 | 5:02 PM

नागपूर : कोणतेही कर्मचारी असले की कामाचा व्याप हा आलाच. कामातून तणाव निर्माण होतो. हा तणाव कमी करण्यासाठी गेट टुगेटर, क्रीडा, कला गुण प्रदर्शन, सांस्कृतिक कार्यक्रम यांची मदत होते. महसूल विभागात पूर्वीच्या तुलनेत सध्या काम वाढलीत. नव्या माहिती तंत्रज्ञानाच्या युगात व्हाट्सॲप, इमेलच्या वापरामुळे प्रत्येकाला तात्काळ प्रतिसाद द्यावा. कामे मार्गी लावावीत, असा सल्ला नागपूरच्या विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांनी दिला. क्रीडा व सांस्कृतिक महोत्सव आणि एकत्रीकरणातून तणाव कमी व्हावा. ‘खेळकर व तणाव मुक्त कर्मचारी’ ही महसूल विभागाची ओळख बनावी, अशी अपेक्षा बिदरी यांनी येथे व्यक्त केली. नागपूर विभागीय महसूल क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचे उद्घाटन आज आयुक्त बिदरी यांच्या हस्ते मानकापूर विभागीय क्रीडा संकुल येथे करण्यात आले, त्याप्रसंगी त्या बोलत होत्या.

यांची होती उपस्थिती

कार्यक्रमाला जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, गडचिरोलीचे जिल्हाधिकारी संजय मीणा, भंडारा जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर, नागपूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक विशाल आनंद, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सौम्या शर्मा,अपर जिल्हाधिकारी आशा पठाण, महसूल उपायुक्त मिलिंद साळवे, निवासी उपजिल्हाधिकारी विजया बनकर, क्रीडा उपसंचालक शेखर पाटील, जिल्हा क्रीडा अधिकारी पल्लवी धात्रक, एन.सी.सी.चे कर्नल विशाल मिश्रा, महसूल विभागातील विविध संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.

स्पर्धेत 81 क्रीडा व सांस्कृतिक कार्यक्रम

जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी प्रास्ताविकेतून क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धा आयोजनाची माहिती दिली. कोरोनानंतर प्रथमच होत असलेल्या या स्पर्धेत 81 क्रीडा व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. तीन दिवस चालणाऱ्या या कार्यक्रमासाठी विभागातील सुमारे 1200 ते 1500 महसूल अधिकारी व कर्मचारी उपस्थित राहणार आहेत. सर्व स्पर्धेचे आयोजन मानकापूर येथील विभागीय क्रीडा संकुल येथे तसेच क्रिकेट सामना व्ही.सी.ए. मैदान व पोहण्याची स्पर्धा नागपूर महापालिकेच्या तरणतलावावर आयोजित करण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले.

हे ठरले विजेते

क्रीडा स्पर्धा उद्घाटनानंतर 100 मीटर धावण्याच्या स्पर्धा घेण्यात आली. यात पुरूष गटात गोंदियाच्या प्रणय कापगतेने 12.57 मिनिटात हे अंतर कापून प्रथम क्रमांक पटकावला. भंडाऱ्याचा अमोल फेंडर दुसरा तर गडचिरोलीचा गुलशन पटले तिसऱ्या स्थानी होते. महिलांच्या 100 मीटर धावण्याच्या स्पर्धेत गडचिरोलीच्या स्नेहा टोहलियाने 14.56 मिनिटांची वेळ नोंदवून प्रथम क्रमांक तर चंद्रपूरच्या मनीषा माटेने दुसरा व भंडराच्या अर्चना देशमुखने तिसरा क्रमांक पटकावला. उत्कृष्ट संचलन संघ म्हणून नागपूर प्रथम, गडचिरोली द्वितीय व गोंदिया जिल्ह्याची तृतीत क्रमांकावर निवड करण्यात आली.

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.