खोटं बोल रेटून बोलं, एकही कागद दाखवत नाहीत, सुधीर मुनगंटीवार यांचा आरोप
टाटानं सरकारशी काही चर्चा केली, त्यांनी कागदं दाखवावी.
नागपूर : वने व सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार नागपुरात बोलताना म्हणाले, आमदार रवी राणा आणि आमदार बच्चू कडू यांच्यातला वाद मिटला, याचं स्वागत करायला हवं. बच्चू कडू जनतेचे प्रश्न घेऊन काम करणारे आमदार. राणा हे सुद्धा तीन वेळा अपक्ष निवडून आलेत. जनतेच्या प्रश्नावर चर्चा होणाऐवजी व्यक्तीत काटा करणं योग्य नाही. दोघांनी सामंजस्याची भूमिका घेतली. मागणी केल्यावर मुंबई मनपाचा कॅग ॲाडिट वेगाने होईल. या ॲाडिटमध्ये झालेला भ्रष्टाचार झाला असेल तर उघड होईल. कायद्यानुसार कॅग ॲाडिट करणं गरजेचं आहे, असंही त्यांनी सांगितलं.
मंत्रिमंडळ विस्ताराबाबत माहिती नाही. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री याबाबत बोलतील. उद्योग गेल्यावर काँग्रेस – राष्ट्रवादी आंदोलन करतायत, हे आश्चर्य आहे. खोटं बोलं पण रेटून बोल हे नॅरेटिव्ह यांनी सेट केलंय, असा आरोपही मुनगंटीवार यांनी केला. हे नेते पत्रकार परिषद घेतात. पण कागद दाखवत नाही. टाटानं सरकारशी काही चर्चा केली, त्यांनी कागदं दाखवावी. या आधीच्या उद्योगमंत्र्यांनी काही बैठका घेतल्या त्याची माहिती आहे का?
शिंदे – फडणवीस सरकारने वेगाने निर्णय घेतात. त्यात उद्धव ठाकरे यांना काही सापडत नाही. उद्धव ठाकरे बांधावर गेल्यावर शेतकरी त्यांना विचारतात की, तुम्ही अडीच वर्षांत काय मदत केली. आम्ही तीन हेक्टरपर्यंत मदत केलीय. आम्ही जे केलं ते या आधीच्या सरकारने केलं नाही. जनतेच्या मनात भ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातोय, अशी टीकाही मुनगंटीवार यांनी केली.
दोन दिवसांनी उद्योग सचिवांना माहिती मागणणार. माहिती संपर्क विभागाने सत्य स्थिती लोकांसमोर ठेवावी नाही तर खोटं बोलण्याची नीती यशस्वी होईल. टाटा प्रकल्पाबाबत एक पेपर नाही. व्हाईट पेपर काढण्याची मागणी करणार असल्याचं ते म्हणाले.
मंत्री यांना येवढी माहिती पाहिजे की, सुरक्षा सरकार काढत नाही. गृह विभागात सुरक्षेसाठी समिती आहे. ती समिती निर्णय घेते. हे सरकार काढत नाही. माझी सुरक्षा काढली होती, मीही नक्षलग्रस्त भागात राहतो. आज 350 पेक्षा जास्त वाघ आहेत. दोन वर्षांचे आकडे बघितले तर 500 संख्या होईल वाघांची. वाघांची संख्या वाढलीय. मानव वन्यजीव संघर्ष वाढला. पीडित परिवाराला वाढीव निर्णय घेतोय.
ब्रम्हपुरीच्या बफर झोनमध्ये पाच वाघ स्थलांतरित करतोय. NTCA ने त्याला मान्यता दिलीय. दोन नरक्षभक वाघांना आपण जेरबंद केलंय. 3 नरभक्षक बिबट्याला जेरबंद केलंय. कुंपण देण्याचं काम करतोय. आवश्यकता आहे तिथे वाघ जेरबंद केले जातात, अशी माहितीही त्यांनी दिली.
एखादा तरी कागद दाखवला जातोय का? की उद्योग गुजरातला गेले. जे राजकारणात वंशावळ आहे त्यांनी कागद द्यावा, असा टोला त्यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला. म्हणून श्वेतपत्र काढण्याची मागणी केली. नेत्यांनी बिना कागद असं बोलू नये, असंही त्यांनी सांगितलं. महाराष्ट्राच्या हक्काचे प्रकल्प गुजरातला जात नाही. जिथे कागद नाही एमओयू नाही ते प्रकल्प देशात कुठेही जातोय.