सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय संपूर्ण देशासाठी हवा होता, ओबीसी आरक्षणावरून केदार यांचं मोठं विधान
सर्वोच्च न्यायालयात कोरोनाच्या काळात ओबीसी आरक्षणाच्या विषयाकडे गांभीर्याने लक्ष दिलं नाही, असं सुनील केदार यांनी सांगितलं. (sunil kedar)
नागपूर: कोरोनाच्या काळात सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या ओबीसी आरक्षणाच्या प्रश्नाकडे सरकारचं दुर्लक्षच झालं अशी कबुली देतानाच सर्वोच्च न्यायालयाने ओबीसी आरक्षणाबाबत दिलेला निर्णय संपूर्ण देशासाठी असायला हवा होता, असं मत राज्याचे दुग्ध विकास मंत्री सुनील केदार यांनी व्यक्त केलं आहे. (sunil kedar reaction on supreme court decision to obc reservation)
दुग्धविकास मंत्री सुनील केदार यांनी मीडियाशी बोलताना हे मत व्यक्त केलं. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या हा निर्णय संपूर्ण देशासाठी लागू व्हावा. फक्त पाच जिल्हा परिषदेसाठी हा निर्णय लागू होणं दुर्भाग्यपूर्ण आहे, असं ते म्हणाले. पूर्वी ओबीसींसाठी ज्या जागा आरक्षित होत्या त्या ठिकाणी ओबीसी उमेदवार देणार असल्याचं केदार यांनी स्पष्ट केलं.
सरकारने कोर्टात जावं
सर्वोच्च न्यायालयात कोरोनाच्या काळात ओबीसी आरक्षणाच्या विषयाकडे गांभीर्याने लक्ष दिलं नाही, असं केदार यांनी सांगितलं. तसेच ओबीसी आरक्षणाच्या प्रश्नावर महाविकास आघाडी सरकारने पुन्हा सर्वोच्च न्यायालयात जावं, असा सल्लाही त्यांनी दिला आहे.
तायवाडेंना भेटणार
राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य बबनराव तायवाडे यांनी आयोगाच्या सदस्यत्वाचा राजीनामा देण्याची घोषणा केली आहे. त्यावरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. डॉ. बबनराव तायवाडे यांची आपण स्वत: भेट घेणार असल्याचं केदार यांनी सांगितलं.
तायवाडे काय म्हणाले?
दरम्यान, तायवाडे यांनी राजीनामा देण्याची घोषणा केली आहे. या पदावर राहून माझ्या समाजाला न्याय मिळत नसेल तर मी या पदावर राहण्यास योग्य नाही. म्हणून मी येत्या 1 ते 2 दिवसात या पदाचा राजीनामा देण्याच्या मनस्थितीत आलो आहे. तत्वांशी तडजोड करू शकत नाही. त्यामुळे उद्या संध्याकाळीच मी राज्यपालांना राजीनामा पाठवणार आहे, असं तायवाडे यांनी सांगितलं.
भाजप आंदोलन आणि केदार
भाजपने आजच राज्यात एक हजार ठिकाणी ओबीसी आरक्षणासाठी आणि सरकारचा निषेध म्हणून जोरदार आंदोलन छेडलं आहे. त्यामुळे राज्यातील वातावरण ढवळून निघालं आहे. त्याचवेळी केदार यांनी सरकारला घरचा आहेर दिल्याने ठाकरे सरकार अधिकच अडचणीत सापडले आहे. केदार यांच्या या विधानामुळे विरोधकांच्या सरकारवरील आरोपांना बळ मिळू शकतं, असं सांगितलं जात आहे.
भाजपचं आंदोलन
दरम्यान, ओबीसींना आरक्षण मिळावं म्हणून आज भाजपने संपूर्ण राज्यात एक हजार ठिकाणी जोरदार आंदोलन सुरू केलं आहे. राज्य सरकारच्या नाकर्तेपणामुळेच ओबीसींचं आरक्षण गेल्याचा आरोप करत भाजपने संपूर्ण महाराष्ट्र दणाणून सोडला आहे. ठाण्यापासून मुंबई-पुण्यापर्यंत आणि नागपूरपासून औरंगाबादपर्यंत भाजपचा एल्गार आज पाहायला मिळाला. नागपुरात तर भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नेतृत्वात ठिय्या आंदोलन करण्यात आलं. यावेळी त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. (sunil kedar reaction on supreme court decision to obc reservation)
VIDEO | सुपरफास्ट 100 न्यूज | 15 September 2021 https://t.co/JEwzAdQ0pt #MorningBulletin | #MorningHeadlines | #TV9Marathi | #BreakingNews | #LatestUpdates
— TV9 Marathi (@TV9Marathi) September 15, 2021
संबंधित बातम्या:
महाविकास आघाडी सरकारकडून अखेर राज्य मागासवर्ग आयोगावर 9 सदस्यांची नियुक्ती, कुणाचा समावेश?
‘आरक्षण नाही, जीवनयात्रा संपवतोय’, मराठा आरक्षणासाठी आणखी एका तरुणाची आत्महत्या
(sunil kedar reaction on supreme court decision to obc reservation)