सुनील प्रभू यांचा राहुल शेवाळे यांच्यावर पलटवार, म्हणाले, त्यामुळं त्यांनी अशाप्रकारचं विधान केलंय
राहुल शेवाळे हे मिंध्ये गटात जाऊन भाजपच्या ताटाखालचं मांजर झाले आहेत. त्यामुळं त्यांनी अशाप्रकारचं विधान केलंय, असा आरोपही त्यांनी केला.
नागपूर : आदित्य ठाकरे कुटुंबाला बदनाम करण्याचे प्रयत्न सुरू आहेत, असं सुनील प्रभू म्हणाले. सुनील प्रभू यांनी राहुल शेवाळे यांच्यावर पटलवार केलाय. राहुल शेवाळे यांचं डोकं फिरलंय, असं प्रभू यांनी म्हटलं. राहुल शेवाळे यांनी एयू म्हणजे आदित्य उद्धव का असा सवाल लोकसभेमध्ये आज उपस्थित केला. सुनील प्रभू यांनी असं प्रत्युत्तर दिलं. सुनील प्रभू म्हणाले, राहुल शेवाळे यांचं डोकं फिरलंय. शिवसेना पक्षाला राहुल शेवाळे यांना मोठं केलं. त्या राहुल शेवाळे यांची जीभ टीका करताना चालली कशी. हा खरा प्रश्न आहे. राहुल शेवाळे हे मिंध्ये गटात जाऊन भाजपच्या ताटाखालचं मांजर झाले आहेत. त्यामुळं त्यांनी अशाप्रकारचं विधान केलंय, असा आरोपही त्यांनी केला.
कुठलीही चौकशी होऊ द्या. उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि आदित्य उद्धव ठाकरे हे निर्दोष आहेत. सीबीआयनं रिपोर्ट दिला आहे. पण, ओढून ताणून ठाकरे कुटुंबीयांना बदनाम करण्याचा अजेंडा सुरू आहे. तो अजेंडा राबविण्यासाठी मिंध्ये गटातील खासदाराला वापरण्याचं काम भाजप करत आहे, अशी टीका सुनील प्रभू यांनी केली.
रिया चक्रवर्तीला एयू नावानं ४४ कॉस आले होते, असं बिहार पोलिसांच्या तपासात समोर आलंय. बिहार पोलिसांपेक्षा सीबीआयचा रिपोर्ट स्पष्ट आहे. जे आरोप केले गेले ते फेल झाले. त्यामुळं राहुल शेवाळे यांना खोटंनाट बोलायला लावलं आहे, असं सुनील प्रभू म्हणाले.
राहुल शेवाळे यांचं डोकं ठिकाणावर नाही. लवकरचं त्यांना त्यांची जागा कळेल, असंही सुनील प्रभू म्हणाले. शिवसैनिकांनी काही करण्यापेक्षा महाराष्ट्रातील जनता हे सर्व बघतेय. संधी येईल. तेव्हा निश्चितच यावर उत्तर दिलं जाईल, असंही त्यांनी सांगितलं.
सुशांतसिंह राजपूत केसबाबत राहुल शेवाळे यांनी भाष्य केलंय. रिया चक्रवर्तीला जे कॉल आहे होते ते एयू यावरून आले होते. मुंबई पोलिसांनी त्याचा खुलासा केला नव्हता. पण, बिहार पोलिसांनी त्याचा खुलासा केलाय. बिहार पोलिसांनी आदित्य ठाकरे यांच्या नावाचा उल्लेख केलाय. केंद्रीय गृहमंत्री यावर निर्णय घेऊ शकतात, असंही शेवाळे म्हणाले. त्यावर सुनील प्रभू यांनी प्रतिक्रिया दिली.