Plastic Ban : स्वच्छ भारत अभियान, प्लास्टिकविरुध्द नागपूर मनपाची धडक कारवाई, 5 लाखांचा दंड वसूल

आशिनगर झोन अंतर्गत कमाल चौक येथील राजपुत रेस्टॉरेंट यांच्याविरूध्द 5 हजार रुपयांचा दंड वसूल केला. मंगलवारी झोन अंतर्गत मंगलवारी बाजार, सदर येथील साई फ्रुट सेंटर आणि माँ वैष्णवी फ्रुट सेंटर यांच्याविरूध्द 10 हजार रुपयांचा दंड वसूल केला.

Plastic Ban : स्वच्छ भारत अभियान, प्लास्टिकविरुध्द नागपूर मनपाची धडक कारवाई, 5 लाखांचा दंड वसूल
प्लास्टिक विरुध्द नागपूर मनपाची धडक कारवाई
Follow us
| Updated on: Jul 03, 2022 | 8:08 PM

नागपूर : स्वच्छ भारत अभियान अंतर्गत नागपूर महापालिकेच्या उपद्रव शोध पथकाने शुक्रवारी 13 प्रतिष्ठानांवर कारवाई करून 75 हजार रुपयांचा दंड वसूल केला. धंतोली (Dhantoli), नेहरुनगर, गांधीबाग, सतरंजीपुरा, आशिनगर आणि मंगलवारी झोनच्या उपद्रव शोध पथकाद्वारे प्रतिबंधित प्लास्टिक (Prohibited Plastic) पिशवी संदर्भात कारवाई करण्यात आली. 55 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. प्लास्टिक बंदीचा पार्श्वभूमीवर मनपातर्फे आतापर्यंत 93 प्रतिष्ठानांवर कारवाई करण्यात आली. 4 लाख 80 हजार रुपये दंड वसूल करण्यात आले आहे. धंतोली झोन अंतर्गत मानेवाडा (Manewada) रोड येथील नवदुर्गा साडी सेंटर आणि जुना बाबुलखेडा येथील पदमावती किराणा स्टोअर्स यांच्याविरूध्द कारवाई करण्यात आली. प्लास्टिक पिशवीच्या वापर केल्याबद्दल 10 हजार रुपयांचा दंड वसूल केला. नेहरुनगर झोन अंतर्गत ज्ञानेश्वर नगर येथील गजानन डेली निडस यांच्याविरूध्द 5 हजार रुपयांचा दंड वसूल केला. गांधीबाग झोन अंतर्गत नंगा पुतला चौक, गांधीबाग येथील बोडे खाद्य भंडार तसेच विकास क्लॉथ शॉप आणि शहीद चौक, इतवारी येथील हुडीया ट्रेडर्स यांच्याविरूध्द 15 हजार रुपयांचा दंड वसूल केला.

या प्रतिष्ठानांवर करण्यात आली कारवाई

सतरंजीपुरा झोन अंतर्गत मस्कासाथ येथील महेन्द्र किराणा ॲण्ड जनरल स्टोअर्स आणि राऊत चौक येथील शैलेन्द्र किराणा ॲण्ड कंपनी यांच्याविरूध्द प्लास्टिक पिशवीच्या वापर केल्याबद्दल कारवाई करून 10 हजार रुपयांचा दंड वसूल केला. आशिनगर झोन अंतर्गत कमाल चौक येथील राजपुत रेस्टॉरेंट यांच्याविरूध्द 5 हजार रुपयांचा दंड वसूल केला. मंगलवारी झोन अंतर्गत मंगलवारी बाजार, सदर येथील साई फ्रुट सेंटर आणि माँ वैष्णवी फ्रुट सेंटर यांच्याविरूध्द 10 हजार रुपयांचा दंड वसूल केला. धरमपेठ झोन अंतर्गत नॉर्थ अंबाझरी रोड येथील Singh Builders यांच्याविरुध्द रस्त्यालगत बांधकाम साहित्य पसरवून ठेवल्याबद्दल कारवाई करण्यात आली. त्यांच्याकडून 10 हजार रुपयांचा दंड वसूल केला. तसेच आशिनगर झोन अंतर्गत लष्करीबाग कमाल चौक येथील Aradhana The Fassion Mall यांच्याविरुध्द परवानगीशिवाय विद्युत खांबावर फलक/होर्डिंग्ज लावल्याबद्दल कारवाई करण्यात आळी. प्रत्येकी 10 हजार रुपयांचा दंड वसूल केला. ही कारवाई उपद्रव शोध पथक प्रमुख वीरसेन तांबे यांच्या नेतृत्वात करण्यात आली.

हे सुद्धा वाचा

'दमानियांना जे करायचं ते करू द्या...', गुणरत्न सदावर्तेंचा हल्लाबोल
'दमानियांना जे करायचं ते करू द्या...', गुणरत्न सदावर्तेंचा हल्लाबोल.
कल्याण अत्याचार प्रकरण, आरोपी विशाल गवळीच्या वकिलाला धमकी
कल्याण अत्याचार प्रकरण, आरोपी विशाल गवळीच्या वकिलाला धमकी.
बीडच्या फरार आरोपींचं प्रसिद्ध पत्रक जारी, नेमकं काय म्हटलंय?
बीडच्या फरार आरोपींचं प्रसिद्ध पत्रक जारी, नेमकं काय म्हटलंय?.
राऊतांना मातोश्रीवर धुतलं, खोलीत डांबलं? बातम्या व्हायरल; राऊत भडकले
राऊतांना मातोश्रीवर धुतलं, खोलीत डांबलं? बातम्या व्हायरल; राऊत भडकले.
लाडकी बहीण योजनेबाबत मोठी अपडेट, 'या' पाच प्रकारच्या बहिणींना आता...
लाडकी बहीण योजनेबाबत मोठी अपडेट, 'या' पाच प्रकारच्या बहिणींना आता....
'मेजर ध्यानचंद खेलरत्न'ची घोषणा, मनु भाकर-डी गुकेशसह कोणाचा सन्मान?
'मेजर ध्यानचंद खेलरत्न'ची घोषणा, मनु भाकर-डी गुकेशसह कोणाचा सन्मान?.
'आमच्याकडे आता गर्दी, आमच्यासोबत या असं आम्ही साळवींना म्हटलो नाही'
'आमच्याकडे आता गर्दी, आमच्यासोबत या असं आम्ही साळवींना म्हटलो नाही'.
'दादांच्या ताफ्यात वाल्मिक कराडची गाडी..' बीडच्या खासदाराचा गौप्यस्फोट
'दादांच्या ताफ्यात वाल्मिक कराडची गाडी..' बीडच्या खासदाराचा गौप्यस्फोट.
अंत्यविधीची तयारी सुरू अन् 'तो' जिवंत झाला; सिनेमात शोभेल अशी घटना
अंत्यविधीची तयारी सुरू अन् 'तो' जिवंत झाला; सिनेमात शोभेल अशी घटना.
ठाकरे गटाचे राजन साळवी भाजपच्या वाटेवर? होणाऱ्या चर्चांवर म्हणाले...
ठाकरे गटाचे राजन साळवी भाजपच्या वाटेवर? होणाऱ्या चर्चांवर म्हणाले....