Nagpur | स्वच्छ भारत अभियान; नागपुरात ओल्या कचऱ्याची जागीच प्रक्रिया स्पर्धा, सहभागी होण्याचे आवाहन

स्पर्धेत सहभागी होण्यासाठी अंतिम तारीख 25 एप्रिल असून यात प्रवेश निःशुल्क आहे. शहरातील जास्तीत जास्त नागरिकांनी या स्पर्धेत सहभागी व्हावे, असे आवाहन घनकचरा व्यवस्थापन विभागातर्फे (Solid Waste Management Department) करण्यात आले आहे.

Nagpur | स्वच्छ भारत अभियान; नागपुरात ओल्या कचऱ्याची जागीच प्रक्रिया स्पर्धा, सहभागी होण्याचे आवाहन
नागपूर मनपाImage Credit source: tv 9
Follow us
| Updated on: Apr 07, 2022 | 4:22 PM

नागपूर : स्वच्छ भारत अभियान अंतर्गत नागपूर महापालिकेतर्फे शहरात विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. स्वच्छ सर्वेक्षणात नागपूर शहराची रँक (City Rank) वाढविण्यासाठी मनपातर्फे विविध उपाययोजना केल्या जात आहेत. यात नागरिकांचा सहभाग वाढावा म्हणून विविध स्पर्धांचे आयोजन सुद्धा करण्यात येत आहे. याचाच एक भाग म्हणून स्वच्छ भारत अभियान अंतर्गत मनपातर्फे होम/ऑनसाईट कंपोस्टिंग (Onsite Composting) (ओल्या कचऱ्याची जागीच प्रक्रिया) स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले आहे. ही स्पर्धा वैयक्तिक घरगुती स्तरावर, निवासी कल्याण संघटना/सोसायटी स्तरावर आणि हॉटेल/इन्स्टिट्यूशन अशा तीन श्रेणीत घेण्यात येणार आहे. स्पर्धेत सहभागी होण्यासाठी अंतिम तारीख 25 एप्रिल असून यात प्रवेश निःशुल्क आहे. शहरातील जास्तीत जास्त नागरिकांनी या स्पर्धेत सहभागी व्हावे, असे आवाहन घनकचरा व्यवस्थापन विभागातर्फे (Solid Waste Management Department) करण्यात आले आहे.

येथे साधावा संपर्क

सदर स्पर्धा नागपूर शहरापुरतीच मर्यादित असून इच्छूक स्पर्धकांनी 25 एप्रिलपर्यंत कार्यालयीन वेळेत सकाळी 9.45 ते सायंकाळी 6.15 वाजेपर्यंत स्वच्छ भारत अभियान कक्ष, पाचवा माळा, बी विंग, छत्रपती शिवाजी महाराज प्रशासकीय इमारत, नागपूर महानगरपालिका, सिव्हिल लाईन्स, नागपूर – 440001 येथे किंवा संबंधित महानगरपालिकेच्या झोन कार्यालयामधील घनकचरा व्यवस्थापन विभागात अथवा ऑनलाईन माध्यमातून https://forms.gle/y3 HPtponh CHAxaK 78 या लिंकवर आपले अर्ज जमा करावे. स्पर्धेच्या सविस्तर माहिती साठी या https://www.nmcnagpur.gov.in/assets/250/2022/04/mediafiles/Competition_Final.pdf लिंकवर क्लिक करा. स्पर्धेत सहभागी होण्यासाठीचा अर्ज याच लिंकवर देण्यात आलेला आहे.

सर्वोत्कृष्ट 50 स्पर्धकांना सन्मानित करणार

स्पर्धेत सहभागी स्पर्धकांना तिन्ही स्तरावर प्रत्येकी तीन पुरस्कार देण्यात येणार आहेत. यात प्रथम पुरस्कार : 10 हजार रुपये व प्रमाणपत्र, द्वितीय पुरस्कार : 5 हजार रुपये व प्रमाणपत्र तसेच तृतीय पुरस्कार : 3 हजार रुपये व प्रमाणपत्र देण्यात येईल. सोबतच श्रेणी एकमधील सर्वोत्कृष्ट 50 स्पर्धकांना प्रमाणपत्र प्रदान करून सन्मानित करण्यात येईल. त्यामुळे या स्पर्धेत मोठ्या संख्येने नागपूरकरांनी सहभाग घ्यावा, असे आवाहन मनपाच्या घनकचरा व्यवस्थापन विभागातर्फे करण्यात आले आहे.

आवश्यक सूचना

25 एप्रिलनंतर येणारे अर्ज ग्राह्य धरले जाणार नाही. एक स्पर्धक वरीलपैकी कितीही स्पर्धेत भाग घेऊ शकतो. आपले अर्ज जमा करताना संपूर्ण माहिती अचूक भरली आहे याची खात्री करून घ्यावी. सदर स्पर्धेकरिता प्रवेश नि:शुल्क आहे. कोणत्याही प्रकारचा बनाव केल्याचे निदर्शनास आल्यास स्पर्धकास स्पर्धेतून तात्काळ अपात्र करण्यात येईल. याबाबत मा. आयुक्त, नागपूर महानगरपालिका यांचा निर्णय अंतिम राहील. कोणत्याही स्पर्धेत भाग घेत असताना मास्क, सॅनिटायजर व सुरक्षित अंतराचे पालन करणे बंधनकारक राहील. स्पर्धेचे निकाल सुयोग्य दिवशी सार्वजनिक स्वरूपात www.nmcnagpur.gov.in या संकेतस्थळावर जाहीर करण्यात येईल. कुठल्याही अधिक माहिती करिता nmcsbmcitizenengagement@gmail.com या ई-मेलवर संपर्क साधावा.

Nagpur Crime | नोकरीच्या निमित्ताने शहरात आणले, बलात्कार करून देहव्यापारात ढकलले, चार आरोपी जेरबंद

Video Chandrapur leopard | बिबट्या आला रे आला! चंद्रपुरात रात्री घरात शिरला बिबट्या, पिंजराबंद करण्यात यश

Video Nagpur Fire | नागपुरात आरा मशीनला भीषण आग, आग विझविण्यासाठी अग्निशमन विभागाच्या गाड्या रवाना

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.