वाघानं घेतला महिला वनरक्षकाचा बळी, ताडोबातील कोअर झोनमधील घटना

चंद्रपूर जिल्ह्यातल्या ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात मोठी घटना घडली. व्याघ्रगणनेची पूर्वतयारी करण्यासाठी कोअर क्षेत्रात गेलेल्या महिला वनरक्षकावर वाघानं हल्ला केल्ला. हा वाघ पानवठ्याजवळ दबा धरून बसला होता. कोलारा कोअर झोनमध्ये झालेल्या या हल्ल्यात महिला वनरक्षकाचा बळी गेला.

वाघानं घेतला महिला वनरक्षकाचा बळी, ताडोबातील कोअर झोनमधील घटना
स्वाती दुमने
Follow us
| Updated on: Nov 20, 2021 | 11:28 AM

चंद्रपूर : वाघांसह जंगलाचं रक्षण करणाऱ्या वनरक्षकावरचं वाघानं हल्ला केला. ताडोबा जंगलातील कोअर झोनमध्ये आज सकाळी आठ वाजताच्या सुमारास ही घटना घडली. स्वाती ढुमणे असं वाघाच्या हल्ल्यात ठार झालेल्या वनरक्षकाचं नाव आहे. या घटनेमुळं वनकर्मचाऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय.

चंद्रपूर जिल्ह्यातल्या ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात मोठी घटना घडली. व्याघ्रगणनेची पूर्वतयारी करण्यासाठी कोअर क्षेत्रात गेलेल्या महिला वनरक्षकावर वाघानं हल्ला केल्ला. हा वाघ पानवठ्याजवळ दबा धरून बसला होता. कोलारा कोअर झोनमध्ये झालेल्या या हल्ल्यात महिला वनरक्षकाचा बळी गेला.

दबा धरून बसला होता वाघ

महिला वनरक्षक स्वाती ढुमणे (वय 43) या चार वनमजुरांसोबत आज सकाळीच कोलारा कोअर झोनच्या कक्ष क्र. 97 मध्ये गेल्या. तिथं वॉटर होलजवळ पाणी आहे की, नाही याची पाहणी त्या करीत होत्या. दरम्यान, पाणवठ्याजवळ दबा धरून बसलेल्या वाघानं त्यांच्यावर हल्ला केला. स्वाती यांना पकडून ओढत जंगलात नेले. सोबत असलेल्या वनमजुरांनी वाघाला हुसकवण्याचा प्रयत्न केला. पण, तोपर्यंत स्वाती यांना वाघानं ठार केलं होतं.

मृतदेह जंगलात सापडला

घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ अधिकाऱ्यांनी अधिक कुमक बोलावली. शोधमोहीम सुरू केल्यावर स्वाती यांचा मृतदेह जंगलात सापडला. सध्या व्याघ्रगणनेसाठी देशातील सर्वच जंगलात वनविभागाच्या वतीने पूर्वतयारी केली जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून स्वाती या कोअर झोनमध्ये गेल्या होत्या.

महिला वनरक्षकाला दोन लहान मुलं

स्वाती ढुबळे या महिला वनरक्षक मागील वर्षी विरुर वनपरिक्षेत्रातून बदली होऊन ताडोबात आल्या होत्या. त्यांना दोन लहान अपत्य आहेत. पाणवठ्याजवळ घडलेल्या घटनेमुळं वनकर्मचाऱ्यांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. ट्रान्झिट लाईनद्वारे सर्वेक्षण केले जात आहे. आजपासून अखिल भारतीय व्याघ्र लाईन सर्वेक्षण सुरू झालं होतं. हे सर्वेक्षण 26 नोव्हेंबरपर्यंत सुरू राहणार आहे.

कोलारा गेटवर येतात व्हीआयपी

ताडोबातील कोलारा या गेटनं व्हीआयपी लोक येतात. या गेटजवळ बांबूपासून तयार झालेले रिसॉर्ट्स आहेत. त्यामुळं या गेटची क्रेझ जास्त आहे. याच गेटच्या जंगलात वाघानं या वनरक्षक महिलेचा बळी घेतला. ताडोबातील वाघ आक्रमक झालेत का, त्यांना जंगलात वन्यप्राणी मिळत नाहीत का, असा प्रश्न यानिमित्तानं निर्माण झालाय.

पालकमंत्री विजय वडेट्टीवारांची बैलबंडीवरून मिरवणूक, पिपरी गावात केला रात्री मुक्काम, गावकऱ्यांकडून जल्लोषात स्वागत

राखेनं केली राखरांगोळी, फ्लाय अॅशचा 18 गावांना धोका, सांगा कसं जगायचं?

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.