Eid in Nagpur | राज ठाकरेंचे अल्टिमेटम विनोद म्हणून घ्या; मुस्लीम समाजाच्या भावना, दोन वर्षांनंतर नागपुरात ईदचा उत्साह

न्यायालय आणि सरकारचा निर्णय मान्य आहे. राज ठाकरेंनी दिलेला अल्टिमेटम विनोद म्हणून घ्या, अशा भावना मुस्लीम समाजबांधवांनी व्यक्त केल्यात.

Eid in Nagpur | राज ठाकरेंचे अल्टिमेटम विनोद म्हणून घ्या; मुस्लीम समाजाच्या भावना, दोन वर्षांनंतर नागपुरात ईदचा उत्साह
कोरोनाच्या दोन वर्षांनंतर नागपुरात ईद साजरी केली जातेयImage Credit source: t v 9
Follow us
| Updated on: May 03, 2022 | 11:56 AM

नागपूर : कोरोनाच्या दोन वर्षांनंतर नागपुरात ईद साजरी केली जातेय. घरोघरी मोठ्या आनंदात आणि हर्षोल्लासात ईद साजरी केली जातेय. कोरोनामुळे दोन वर्षे कुठलेही सण साजरे करता आले नाही. पण यंदा निर्बंध शिथिल झाल्यानंतर नागपुरात उत्साहात ईद साजरी होतेय. मुस्लीम बांधव ( Muslim Society) एक दुसऱ्याच्या घरी दाऊन शिरखुरम्याचा आस्वाद घेत आहेत. एक दुसऱ्यांना ईदच्या शुभेच्छा देतायत. राज ठाकरेंचं अल्टिमेटम (ultimatum) विनोद म्हणून घ्या, न्यायालय आणि सरकारचा निर्णय आम्हाला मान्य आहे. नागपुरातील मुस्लीम समाजाच्या या भावना आहे. राज्यात भोंग्यावरुन राजकारण तापत असताना नागपुरातील मुस्लीम बांधवांनी शांततेत ईद साजरी करण्याचं आवाहन केलंय. भोंग्याच्या बाबतीत चार तारखेचा अल्टिमेटम देण्यात आलाय. पण कुणाच्याही चिथावणीला बळी पडू नका, शांतता राखा, असं आवाहन नागपुरातील राष्ट्रवादीचे नेते गुलाम अश्रफी (Ghulam Ashrafi) यांनी केलंय.

न्यायालय, सरकारचा निर्णय मान्य

नागपुरात मुस्लीम समाजात घरोघरी उत्साहात ईद साजरी केली जात आहे. शहरात जामा मशीद परिसरात पोलीस बंदोबस्त लावण्यात आलाय. कुणाच्या चिथालणीला बळी पडू नका, शांतता पाळा, असं आवाहन नागपुरातील मुस्लीम समाज बांधवांनी केलंय. न्यायालय आणि सरकारचा निर्णय मान्य आहे. राज ठाकरेंनी दिलेला अल्टिमेटम विनोद म्हणून घ्या, अशा भावना मुस्लीम समाजबांधवांनी व्यक्त केल्यात.

आम्ही कुणाची डेडलाईन पाळत नाही

ईदच्या पार्श्वभूमीवर नागपुरात तीन हजार पोलीस फोर्स तैनात करण्यात आल्याची माहिती पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली. गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्यांची झाडाझडती घेण्यात आली. भोंग्याच्या बाबतीत सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाची अंमलबजावणी सुरू आहे. आम्ही कुणाची डेडलाईन मानत नाही, असं पोलिसांनी स्पष्ट केलंय. ईदच्या पार्श्वभूमीवर प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून नोटीस बजावली आहे.

हे सुद्धा वाचा

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.