Nagpur Crime| दहा दुचाक्या चोरल्या, एक पेटविली; कारण विचारताच पोलीसही चक्रावले
नागपुरात चोरट्यांनी कहर केला. थंडीपासून बचावासाठी चोरी केलेली दुचाकीचं पेटवल्याचीच धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. छोटा सर्फराज आणि त्याचच्या टोळीने हे कृत्य केले असल्याचं पोलीस तपासात पुढे आलं.
नागपूर : नागपुरात थंडीचा कडाका चांगलाच वाढलाय. तापमान दहा डिग्री सेल्सीअसच्या खाली गेलंय. थंडीपासून बचावासाठी शेकोटीचा वापर करतात हे आपण ऐकलंय. थंडीपासून बचावासाठी साधारण लाकडाची, कपड्यांची किंवा कचऱ्याची शेकोटी पेटवताना पाहिलं असेल. मात्र नागपुरात चोरट्यांच्या एका टोळक्यानं थंडीपासून बचावासाठी शेकोटी म्हणून चोरलेली दुचाकीच पेटवून दिल्याची घटना उघडकीस आली आहे. नागपुरात चोरट्यांनी कहर केला. थंडीपासून बचावासाठी चोरी केलेली दुचाकीचं पेटवल्याचीच धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. छोटा सर्फराज आणि त्याचच्या टोळीने हे कृत्य केले असल्याचं पोलीस तपासात पुढे आलं.
चोरल्या होत्या दहा दुचाक्या
यशोधरानगर पोलिसांनी दरोड्याचा तयारीत असलेल्या सर्फराजच्या टोळीला पकडले. त्यांच्या या तपासादरम्यान पोलिसांना छोटा सर्फराजने शहरातून वेगवेगळ्या ठिकाणाहून दहा दुचाकी चोरल्याची माहिती दिली होती. जेव्हा पोलिसांनी त्या दहा दुचाकीबद्दल विचारलं. तेव्हा सर्फराज आणि त्याचे सहकाऱ्यांकडून पोलिसांना नऊ दुचाकी हस्तगत झाल्या. मात्र, दहावी दुचाकी ते पोलिसांना देऊ शकले नाहीत. दुचाकी पेटवून शेकोटी तापल्याचं सर्फराजतच्या टोळीने पोलिसांना सांगितले, अशी माहिती यशोधरनगरचे पोलीस निरीक्षक संजय जाधव यांनी दिली.
शेतात लपल्यावर लागली थंडी
दुचाकी चोरीसाठी कुख्यात छोटा सर्फराज आणि त्याच्या टोळीने हे कृत्य केले आहे. सर्फराज आणि त्याच्या टोळीने गेल्या काही दिवसात नागपूरच्या विविध पोलीस स्टेशनच्या हद्दीतून दहा दुचाकी चोरल्या होत्या. त्यानंतर छोटा सर्फराज आणि त्याच्या टोळीने पोलिसांपासून लपण्यासाठी शेतात आश्रय घेतला होता. त्यांना कडाक्याची थंडी असल्या कारणाने शेतावर लपलेल्या सर्फराज आणि त्याच्या टोळीचे हाल होऊ लागले होते. शेकोटी पेटवण्यासाठी त्यांना कुठे लाकडं किंवा कचरा मिळाला नाही. त्यामुळे थंडीपुढे हतबल झालेल्या सर्फराजने शेकोटी म्हणून एक बाईकच पेटवली.