Nagpur Corona | विमानतळासोबतच रेल्वे स्टेशन, बाजारपेठ, मॉल्स, भाजी बाजारातही चाचणी; नागपुरात कोरोनाची साखळी तोडण्यासाठी प्रशासन सज्ज

पुढील संभाव्य धोक्याचा सामना करण्याच्या दृष्टीने मनपाची संपूर्ण आरोग्य यंत्रणा सज्ज झाली. हॉस्पिटल्स, वैद्यकीय कर्मचारी, ऑक्सिजन प्लांट, औषधे आदी सर्व सुस्सज करण्याचेही निर्देश आयुक्तांनी आरोग्य विभागाला दिले. कोरोनावर नियंत्रण मिळविण्यासाठी लसीकरण आवश्यक आहे. युवकांचे बारा वर्षावरील मुलांचे लसीकरण आणि ज्येष्ठ नागरिक यांच्या बुस्टर डोससाठी प्रयत्न करणे गरजेचे आहेत.

Nagpur Corona | विमानतळासोबतच रेल्वे स्टेशन, बाजारपेठ, मॉल्स, भाजी बाजारातही चाचणी; नागपुरात कोरोनाची साखळी तोडण्यासाठी प्रशासन सज्ज
नागपुरात कोरोनाची साखळी तोडण्यासाठी प्रशासन सज्ज
Follow us
| Updated on: Jun 07, 2022 | 5:45 PM

नागपूर : नागपूर शहरात कोरोना रुग्णांची संख्या हळूहळू वाढत आहे. त्यादृष्टीने सुरक्षात्मक उपाययोजना आवश्यक आहे. कोरोना संसर्गाची साखळी खंडीत करण्याकडे विशेषत्वाने लक्ष देण्याची गरज आहे. यासाठी जास्तीत जास्त कोरोना चाचणीवर भर देण्याचे निर्देश मनपा आयुक्त राधाकृष्णन बी.(Radhakrishnan) यांनी दिले आहेत. दिल्ली आणि मुंबई येथून विमानाने येणाऱ्या प्रवाशांनी तसेच त्यांच्या संपर्कात येणा-या नागरिकांनी चाचणी करण्यात येत आहे. आरोग्य विभागाद्वारे बाजारपेठ, मॉल्स, भाजी बाजार अशा सर्व गर्दीच्या ठिकाणी सुपर स्पेडर्स (Super Spiders) ठरणा-या व्यक्तींच्या चाचणीवरही भर देण्यात येणार आहे. रेल्वे स्थानकांवर सुद्धा प्रवाश्यांची चाचणी केली जाणार आहे. कोरोनाचा संभाव्य धोका टाळण्यासाठी नागरिकांना कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन्ही डोस घेण्याचे आवाहन मनपा आयुक्तांनी (Commissioner) केले आहे. तसेच त्यांनी गर्दीच्या ठिकाणी किंवा समारंभात मास्कचा वापर करणे, शारीरिक अंतर ठेवण्याचे आवाहन केले.

आरोग्य विभागाची महत्त्वपूर्ण बैठक

कोरोनाची वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता मंगळवारी मनपा मुख्यालयातील कोरोना वॉर रूमध्ये आरोग्य विभागाची एक महत्वाची बैठक घेण्यात आली. प्रारंभी आयुक्तांनी सर्व झोनमध्ये कोरोनाच्या संभाव्य धोक्यापासून बचावाच्या दृष्टीने करण्यात येत असलेल्या तयारीची माहिती घेतली. त्यांनी सांगितले की, कोरोनाची रुग्णसंख्या वाढत आहे. वाढत्या संसर्गाच्या साखळीवर वेळीच नियंत्रण करणे गरजेचे आहे. यासाठी सर्वप्रथम कोरोना संशयित तसेच लक्षणे आढळणा-या व्यक्तींची चाचणी करणे आवश्यक आहे. त्यांची आर.टी.पी.सी.आर. चाचणी करण्यात यावी. बाजारपेठेत रॅपिड अँटीजेन चाचणी केली जावी. रुग्णालयात तपासणीसाठी येणा-या रुग्णांची कोरोना चाचणी करण्यात यावी. कोरोनाबाधित रुग्णांच्या प्रवासाची पार्श्वभूमी लक्षात घेऊन त्यांची सर्व ट्रॅव्हल हिस्ट्री काढण्यात यावी. त्यांच्या संपर्कातील सर्व निकटवर्तीयांची चाचणी करण्याचेही आयुक्तांनी निर्देशित केले.

36 केंद्रांवर कोरोना चाचणी

पुढील संभाव्य धोक्याचा सामना करण्याच्या दृष्टीने मनपाची संपूर्ण आरोग्य यंत्रणा सज्ज झाली. हॉस्पिटल्स, वैद्यकीय कर्मचारी, ऑक्सिजन प्लांट, औषधे आदी सर्व सुस्सज करण्याचेही निर्देश आयुक्तांनी आरोग्य विभागाला दिले. कोरोनावर नियंत्रण मिळविण्यासाठी लसीकरण आवश्यक आहे. युवकांचे बारा वर्षावरील मुलांचे लसीकरण आणि ज्येष्ठ नागरिक यांच्या बुस्टर डोससाठी प्रयत्न करणे गरजेचे आहेत. शाळा, महाविद्यालयात शिबिरे आयोजित करावीत. विद्यार्थ्यांना नर्सेस, डॉक्टरकडून नि:शुल्क लसीकरण करावे. नागपूर शहरातील विविध भागांमध्ये सध्या 36 केंद्रांवर कोरोना चाचणी केली जात आहे. कुणालाही सर्दी, खोकल्याचा त्रास असल्यास त्यांनी मनपाच्या कोरोना चाचणी केंद्रावरून नि:शुल्क चाचणी करण्याचे आवाहनही आयुक्तांनी केले.

हे सुद्धा वाचा

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.