Nagpur Crime | प्रेमीयुगुल घरून पळाले, नातेवाईक शोधायला गेले, दोघांनीही विहिरीत उडी मारून संपविले

नागपूर जिल्ह्यातील बेला येथील ही घटना. एक अल्पवयीन मुलगी गुराखी असलेल्या युवकाच्या प्रेमात पडली. दोघेही घराबाहेर गेले. तीन-चार दिवसांत त्यांचा शोध घेण्यासाठी त्यांचे नातेवाईक गेले. नातेवाईक दिसतात दोघांनीही विहिरीत उडी घेऊन स्वतःला संपविले.

Nagpur Crime | प्रेमीयुगुल घरून पळाले, नातेवाईक शोधायला गेले, दोघांनीही विहिरीत उडी मारून संपविले
प्रेमीयुगुलाची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या. Image Credit source: टीव्ही9
Follow us
| Updated on: Mar 29, 2022 | 10:18 AM

नागपूर : बेला येथील महेश शालिक ठाकरे (वय 28) (Mahesh Shalik Thackeray at Bela) व पंधरा वर्षीय मुलगी यांचे सूत जुळले. 25 मार्च रोजी दुपारी दोन वाजता ते घरून पळून गेले. घराबाहेर तीन-चार दिवस बाहेर काढले. सोमवारी दुपारी समुद्रपूर (Wardha in Samudrapur taluka)तालुक्यातील उमरी गावाजवळ सोमवारी एका शेतातील विहिरीत बसले होते. त्यांचे नातेवाईक त्यांना शोधायला गेले होते. नातेवाईक दिसताच दोघेही पळाले. कुर्ला शिवारात अक्षय कांबळे यांच्या शेतातील विहिरीत त्यांनी हातात हात घालून उडी घेतली. यात दोघांचाही मृत्यू झाला. घटनेची माहिती समुद्रपूर पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह वर्धा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात (District General Hospital) पाठविला.

अशी घडली घटना

पंधरा वर्षीय मुलगी बेला येथील शाळेत नवव्या वर्गात शिकणात होती. गुराखी असलेल्या महेशच्या प्रेमात ती पडली. दोघेही दोन वर्षांपासून एकमेकांच्या संपर्कात होते. ते दोघेही घराबाहेर निघून गेले. दोघांनी जीवनाची सुरुवात करायची म्हणून घराबाहेर पडले. आई-वडील घरी आले तेव्हा मुलगी घरी नव्हती. आजूबाजूला विचारणा केली. परंतु, कुणीच काही सांगितले नाही. आईने बेला पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली. सोमवारी दुपारी एक वाजतादरम्यान मुलीच्या नातेवाईकांना माहिती मिळाली की, दोघेही उमरी येथील एका शेतात आंब्याच्या झाडाखाली बसलेले आहेत. तेव्हा मुलाचे जावई दुचाकीने घटनास्थळी गेले. त्यांच्या डोळ्यादेखत दोघांनी जवळ असलेल्या विहिरीत हातात हात घालून उडी मारली.

गाळात फसल्याने मृत्यू

शेतात कोणी नसल्याने आरडाओरड केली. परंतु, कोणीही मदतीला धावून आले नाही. त्या विहिरीत गाळ असल्यामुळे हे दोन्ही गाळात फसल्यामुळे ते वर काही येऊ शकले नाही. समुद्रपूर पोलिसांनी घटनेची माहिती बेला पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. या प्रकरण समुद्रपूर पोलीस स्टेशन अंतर्गत येणार्‍या उमरी गावाच्या बिट जमादारकडे सोपविले. त्या दोघांचे मृतदेह विहिरीतून बाहेर काढण्यात आले.

Lady Conductor Murder | नागपुरातील महिला कंडक्टरच्या हत्येचं गूढ उकललं, दाम्पत्याला अटक

वीज कर्मचाऱ्यांचं पुण्यात आंदोलन, मेस्माविरोधात एकजूट; संप नको चर्चेतून तोडगा काढू : नितीन राऊत

Wardha | नगरविकास मंत्र्यांनी केली महामार्गाची पाहणी, समृद्धी महामार्गावर चालविली electric car

मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?.
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन.
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?.
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'.
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?.
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ.
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ.