आई महालक्ष्मीच्या मंदिरात दिवाळीचा उत्सव, चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितलं कारण
वर्तमान आणि भविष्य हे आनंददायी व्हावं, यासाठी आई महालक्ष्मीला प्रार्थना केली.
नागपूर : भाजपचे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे कोराडी येथील आई महालक्ष्मीच्या मंदिरात दिवाळी साजरी करतात. दिवाळीनिमित्त चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, जगात, देशात हिंदू संस्कृतीसाठी हा मोठा दिवस आहे. दीपावलीनिमित्त राज्यातील जनतेला शुभेच्छा देतो. आई महालक्ष्मीच्या मंदिरात दीपावली पूजन करतो. संस्थानात दिवसभराचा वेळ घालवितो. भाविक येतात. पूजाअर्चा करतात. मी आई महालक्ष्मीला म्हटलं की, सर्वांच जीवन मंगलमय राहू दे, असं बावनकुळे यांनी सांगितलं.
चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, माझा खूप मोठा परिवार आहे. आई-वडील भाऊ, बहिणी, मुलं, मुलगी. सोबतचं पक्षाचे कार्यकर्ते तसेच पक्षाच्या बाहेरच्या कार्यकर्त्यांचा परिवार आहे. दिवाळीला घरी खूप गर्दी असते. लोकं भेटतात. बोलतात. जातात. दिवस केव्हा निघतो नि केव्हा संपतो काही कळतचं नाही. आजचा दिवस हा आई महालक्ष्मीच्या पूजनाचा दिवस आहे.
वर्तमान आणि भविष्य हे आनंददायी व्हावं, यासाठी आई महालक्ष्मीला प्रार्थना केली. बावनकुळे यांनी सांगितलं की, माझी पत्नी सारं काही घरातलं बघतं. ज्या वस्तू घरी बनतात त्या मी आवडीनं खातो. आजचा दिवस अविस्मरनीय असतो. काही ना काही नवीन देऊन जातो. नवीन लोकं येतात. भेटतात.
लहानपणी महालक्ष्मीचा मंदिरात साजरी करत होता. पंधरा दिवस दिवाळी असायची. तेव्हा शाळेला चाटा मारायचो. आता पाच दिवस किंवा दोन दिवस करतो. पूर्वीची दिवाळी वेगळी असायची. ती दिवाळी येईल का नाही, माहीत नाही. पुजारी, मंदिरातील मुलं सगळे खेळायचो. फटाके लहानपणी फोडायचो. केव्हा फटाके येणार याची वाट बघायचो. फटाके नाही आले तर रुसून बसायचो. फटाके कितीही फोडले तरी प्रदूषणाचा विषय नव्हता. आता फटाके कमी फोडले पाहिजे. कारण प्रदूषणाचा मुद्दा आहे, असंही बावनकुळे यांनी सांगितलं.
बावनकुळे म्हणाले, दिवाळीला अनेक ठिकाणांहून फोन येतात. त्यातले सर्वच राजकीय पक्षाचे, नागपूर, विदर्भ, मुंबई या सगळ्यांचे फोन येतात. उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे, रामदास आठवले यांच्या जवळचे लोकं फोन करतात. सण, तेव्हारात सर्व मिळून आनंद साजरा करतो.
आई महालक्ष्मीला सांगितलं की, महाराष्ट्र सुजलाम सुफलाम होऊ दे. अवकाळी परिस्थितीतून शेतकऱ्यानं आत्महत्या करू नये यासाठी प्रयत्न केले पाहिजे. राज्यातील 12 कोटी जनतेला सुखी समाधानी ठेव, असही बावनकुळे म्हणाले.