Heat Wave | विदर्भात उष्णतेची लाट, उन्हाची झळ प्राण्यांनाही, महाराजबागेत प्राण्यांसाठी लागले कुलर्स
विदर्भात सूर्य चांगलीच आग ओकू लागला आहे. त्यामुळं उष्णतेची लाट तयार झालीय. या लाटेत माणसांप्रमाणे प्राण्यांचेही संरक्षण करणे सुरू आहे. त्यांच्यासाठी कुलर्सची व्यवस्था करण्यात आली आहे.
नागपूर : विदर्भात उष्णतेची लाट (heat wave) सुरु झालीय. विदर्भातील चंद्रपुरात तापमान 43 अंश सेल्सिअसवर गेलंय. नागपुरातील तापमान 40 च्या पुढे गेलंय. तापमान वाढल्यामुळे नागपुरातील महाराजबाग प्राणिसंग्रहालयातील प्राण्यांसाठी (animals in Maharajbag) कुलर्स लागलेत. बिबट्या, अस्वल, वाघ या प्राण्यांना उकाड्याचा त्रास होऊ नये म्हणून महाराजबाग प्राणिसंग्रहालयात (At the zoo) कुलर्स लावण्यात आलेत. सध्या महाराजबाग प्राणिसंग्रहालयात चार बिबट, चार अस्वल, दोन वाघ आणि इतर प्राणी आहेत. वाढत्या उकाड्यापासून दिलासा मिळावा म्हणून प्राण्यांसाठी कुलर्स लावण्यात आलेत. शिवाय काही प्राण्यांना आहारात ग्लुकोज देण्यास सुरुवात करण्यात आलीय.
प्राण्यांनाही उन्हाच्या झळा
माणसानं घरी कुलर्स, एसी सुरू केलेत. माणसांप्रमाणे प्राण्यांनाही उन्हाच्या झळा पोहचतात. त्यामुळं माणसांप्रमाणेच प्राण्यांचीही काळजी घ्यावी लागते. उन्हाचा त्रास त्यांनाही होतो. त्यामुळं त्यांच्यासाठी ही व्यवस्था करण्यात आल्याचं महाराजबाग प्राणिसंग्रहालयाच्या जैवशास्त्रज्ञ सुवर्णा कावळे यांनी सांगितलं.
चंद्रपुरात सर्वाधिक 43 अंश डिग्री सेल्सिअस तापमान
विदर्भातील शहरांचे तापमान वाढले आहे. हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार, नागपूर 40 अंश डिग्री सेल्सिअस तापमान होतं. अकोला येथे 42.7 अंश डिग्री सेल्सिअस, तर अमरावती येथे 41.4 अंश डिग्री सेल्सिअस तापमान होतं. विदर्भात सर्वात कमी तापमान बुलडाणा येथे व गोंदिया येथे 39.8 अंश डिग्री सेल्सिअस होतं. तर चंद्रपूर जिल्ह्यात सर्वाधिक म्हणजे 43 अंश डिग्री सेल्सिअस तापमान होतं. वर्धा येते 41.4, तर यवतमाळ येथे 41 डिग्री सेल्सिअस तापमान होतं.