Vidarbha Temperature | विदर्भात सूर्य कोपला! चंद्रपुरात सर्वाधिक 45.8, तर अकोल्यात 45.4 @, पुढील आठवडा धोक्याचाच
विदर्भात आज सूर्य चांगलाच कोपला. चंद्रपुरात सर्वाधिक 45.8 तापमानाची नोंद झाली. तर त्यापाठोपाठ अकोल्यात 45.4 अंश डिग्री सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. पुढील आठवडा हा उष्णतेचाच राहणार असल्यानं दुपारी घराबाहेर पडू नये, असा इशारा प्रशासनानं दिलाय.
वर्धा : विदर्भात आणखी चार दिवस उष्णतेची लहर कायम राहणार आहे. आज विदर्भात सर्वाधिक तापमानाची नोंद चंद्रपुरात झाली. त्यापाठोपाठ अकोल्यातही सूर्य चांगलाच कोपला. चंद्रपुरात ( Chandrapur) आज तापमान 45.8 अंश सेल्सिअसपर्यंत गेलंय. चंद्रपुरात उद्याही जवळपास येवढंच तापमान राहण्याची शक्यता आहे. चंद्रपुरातही उष्णतेची लहर पुढील चार-पाच दिवस कायम राहणार आहे. अकोल्यात (Akola) 45.4 अंश डिग्री सेल्सिअस तापमान नोंदविण्यात आलंय. वर्धेच आज तापमानात पुन्हा वाढ होत पारा हा 45.1 अंशावर पोहचला आहे. त्यापाठोपाठ अमरावतीत 44.4 अंश डिग्री सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. पुढील आठवडाभर अमरावतीत (Amravati) आकाश अंशत: ढगाळलेलं राहण्याचा अंदाज हवामान विभागानं नोंदवलाय.
नागपुरात उष्णतेची लहर दोन मेपर्यंत
विदर्भात आज सूर्य चांगलाच कोपला. चंद्रपुरात सर्वाधिक 45.8 तापमानाची नोंद झाली. तर त्यापाठोपाठ अकोल्यात 45.4 अंश डिग्री सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. पुढील आठवडा हा उष्णतेचाच राहणार असल्यानं दुपारी घराबाहेर पडू नये, असा इशारा प्रशासनानं दिलाय. नागपूरचे तापमान आज 44.3 अंश डिग्री सेल्सिअस नोंदविण्यात आलंय. उष्णतेही ही लहर दोन मेपर्यंत कायम राहणार असल्याचा हवामान खात्याचा अंदाज आहे. यवतमाळात आजचे तापमान 44.2 अंश डिग्री सेल्सिअस नोंदविण्यात आले. गोंदिया 43.5 तापमानाची नोंद झाली. गोंदियात पुढील आठवड्यात आकाश अंशतः ढगाळलेलं राहण्याची शक्यता आहे. बुलडाण्यात आज 42.3 तापमान होते.
वर्ध्यात रस्ते सुनसान
वर्धा जिल्ह्याच्या तापमानात सतत वाढ होत आहे. वाढत असलेल्या तापमानामुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. आजचा तापमान हा यंदाच्या मोसमातील सर्वाधिक तापमान आहे. सकाळपासूनच नागरिकांना उन्हाचे चटके सहन करावे लागत आहे. वाढलेल्या तापमानामुळे दुपारी शहरातील रस्ते सुनसान होते. वाढत्या तापमानापासून नागरिकांनी काळजी घेणे गरजेचे असल्याचं आवाहन आरोग्य विभागाकडून केल जातं आहे. पुढील तीन दिवस तापमान आणखी वाढणार असल्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.