The Kidtastic Bhagavad Gita | नागपुरातील दहा वर्षांच्या काव्य अग्रवालने उलगडला भगवद् गीतेचा अर्थ; समजून घ्या किडटास्टिक गीतेत काय लिहिले?

किडटास्टिकमध्ये, काव्यने भगवद् गीतेच्या श्लोकांचा अर्थ सांगितला आहे. अध्यायांचे स्वतःच्या शब्दात भाषांतर केले आहे. प्रत्येक अध्यायातून काव्य काय शिकला हेदेखील लिहिले आहे.

The Kidtastic Bhagavad Gita | नागपुरातील दहा वर्षांच्या काव्य अग्रवालने उलगडला भगवद् गीतेचा अर्थ; समजून घ्या किडटास्टिक गीतेत काय लिहिले?
पत्रकार परिषदेत माहिती देताना काव्य अग्रवाल.
Follow us
| Updated on: Dec 30, 2021 | 9:36 AM

नागपूर : शहरातील लिटिल वंडर दहा वर्षीय काव्य अग्रवालने (Kavya Agarwal) काही विक्रम रचले आहेत. काव्यने किडटास्टिक (kidtastic) नावाची भगवद् गीता (the Bhagavad Gita) लिहिली. असे करणारा काव्य हा सर्वात छोटा लेखक बनला आहे. किडटास्टिकमध्ये, काव्यने भगवद् गीतेच्या श्लोकांचा अर्थ सांगितला आहे. अध्यायांचे स्वतःच्या शब्दात भाषांतर केले आहे. प्रत्येक अध्यायातून काव्य काय शिकला हेदेखील लिहिले आहे.

काव्यसोबत राहते श्रीकृष्णाची मूर्ती

पत्रकार परिषदेला संबोधित करताना काव्य म्हणाला की, लहान वयातच भगवद्गीतेबद्दल अधिकाधिक जाणून घेण्याकडे कल होता. नंतर भगवद्गीतेवरील कार्यशाळा पूर्ण केली. त्यामुळं संस्कृत श्लोक शिकण्यास आणि वाचण्यास आणि भगवद्गीतेचे विविध आयाम समजून घेऊन संशोधन करण्यास प्रेरित झालो. आई-वडील आणि आजी-आजोबांच्या पाठिंब्यामुळे मला पुस्तक लिहिण्यास प्रोत्साहन मिळाले. मी जिथे जातो तिथे आपल्या भगवान श्रीकृष्णाची मूर्ती सोबत घेऊन जातो. मी मूर्तीशी एक जवळीक साधली आहे आणि माझा असा विश्वास आहे की मूर्ती मला आयुष्यात चांगले काम करण्यासाठी प्रेरित करते.

बालकांची आवड लक्षात घेऊन रंगीबेरंगी चित्रांचा वापर

काव्य म्हणाला, स्वतःच्या व्हिज्युअलायझेशनद्वारे पुस्तकाच्या डिझाइनमध्ये योगदान दिले आहे. पुस्तक वाचताना मुलांची आवड लक्षात घेऊन काव्यने रंगीबेरंगी चित्रे, भगवान कृष्णाच्या कथा आणि रंगरंगोटीची जागा समाविष्ट केली आहे. भगवद्गीता आणि भगवान कृष्ण हे माझी प्रेरणा आहे. मला मार्गदर्शन करण्यात आणि पुस्तक लिहिण्यात या पवित्र धार्मिक ग्रंथाचा मोलाचा वाटा आहे. भगवद्गीता ही जगभरातील मानवांच्या समस्यांवर उपाय आहे. माझे आई-वडील रश्मी अग्रवाल आणि राज अग्रवाल यांनी मला माझ्या सर्व उपक्रमांमध्ये साथ दिली. तसेच आजोबा महेश आणि आजी मीना अग्रवाल आणि आजी-आजोबा अनिता आणि महेंद्र अग्रवाल हे माझ्या संस्कृत आणि शास्त्रांकडे असलेला कल बघता अतिशय आनंदी आहेत.

काव्य बहुआयामी व्यक्तिमत्त्वाचा धनी

काव्य उत्कृष्ट चित्रकार आहे. बंगाल बोर्डाने आयोजित केलेल्या विविध स्पर्धांमध्ये तो विजयी झाला आहे. बंगाल बोर्डातून शास्त्रीय संगीताची परीक्षाही त्याने दिली आणि जिंकली. काव्य गिटार खूप छान वाजवतो. काव्य सार्वजनिक वक्ता आहे. इंग्रजी भाषेवर त्याचे चांगले प्रभुत्व आहे. काव्य संस्कृत श्लोक आणि कवितेचे सादरीकरण करतो. तो योगाचा राष्ट्रीय विजेता देखील आहे.

काव्य विविध पुरस्कारांचा मानकरी

सिम्बायोसिस इन्स्टिट्यूट पुणे द्वारा ग्रोथ आयकॉन. हा पुरस्कार भगवद् गीता या ग्रंथाशी संबंधित आहे. संस्कृत राष्ट्रीय ऑलिम्पियाड, ट्रॉफी आणि प्रमाणपत्र आणि 25 हजारांचे रोख पारितोषिक मिळाले. संस्कृत श्लोक पठणासाठी इंडिया स्टार आयकॉन किड्स अचिव्हर अवॉर्ड प्राप्त झाला. ऑक्सफर्ड बिग रीड, जागतिक विजेता. यामध्ये काव्यला आयपॅड देऊन सन्मानित करण्यात आले. गेल्या वर्षी याच स्पर्धेत तो उपविजेता ठरला होता.

Crime | तेलंगणातून येत होता नागपुरात गांजा, बुटीबोरीत पोलिसांनी रचला सापडा; सात लाखांचा गांजा जप्त

Nagpur Omicron | नागपूर हादरले! तीन ओमिक्रॉनबाधित सापडले; थर्टी फस्टच्या पार्ट्यांवर कसे येणार निर्बंध?

Cancer Institute | भीती कॅन्सरची! नागपुरातील इन्स्टिट्यूटच्या बांधकामाला गती द्या; वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुखांनी घेतला आढावा

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.