Accident | रुग्णावर उपचार करून परतत होते नागपूरला, विरुद्ध दिशेने येणाऱ्या ट्रकच्या धडकेत टवेरातील चार ठार

परतत असताना मोही घाटीत विरुद्ध दिशेने येणाऱ्या ट्रकने त्यांच्या वाहनाला धडक दिली. अपघातानंतर ट्रकचालक ट्रकसह पसार झाला. पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपी ट्रकचालकाचा शोध सुरू केला.

Accident | रुग्णावर उपचार करून परतत होते नागपूरला, विरुद्ध दिशेने येणाऱ्या ट्रकच्या धडकेत टवेरातील चार ठार
अपघातग्रस्त वाहन
Follow us
| Updated on: Jan 18, 2022 | 9:20 AM

नागपूर : राजस्थानच्या भिलवाडाकडून नागपूरला (Nagpur) परतत असताना मोही घाटी टवेराला ट्रकने धडक दिली. ट्रक आणि चारचाकी टवेरा यांच्यात भीषण अपघात (Accident) झाला. या अपघातात नागपुरातील पाचपावली संकुलातील चार जणांचा जागीच मृत्यू झाला. याशिवाय तीन जण गंभीर जखमी झालेले. जखमींना प्राथमिक उपचारानंतर नागपूरला हलविण्यात आले. बयाबाई हरिदास नंदनवार (वय 56), मुलगा महेश नंदनवार (वय 29), मुलगी अर्चना गणेश खापरे ( वय 33) आणि प्रमोद दशरथ धार्मिक ( वय 22) अशी मृतांची नावे आहे. भोपाळ-नागपूर महामार्गावरील पांढुर्णा तालुक्याला लागून असलेल्या मोही घाटी गावात शनिवार-रविवार मध्यरात्री तीन वाजता विरुद्ध दिशेने येणाऱ्या ट्रकने चारचाकी वाहनास धडक दिली.

जखमींना नागपूरच्या रुग्णालयात हलविले

ट्रकने टवेराला दिलेल्या धडकेत वाहनाचा चुराडा झाला. तसेच टवेरातील चार जणांचा जागीच मृत्यू झाला. पांढुर्णाचे स्थानिक पोलिस घटनास्थळ दाखल झाले. टवेरामध्ये अडकलेल्या शैलेश हरिदास नंदनवार (वय 28), गणेश वासुदेव खापरे (वय 37) आणि चालक ज्ञानेश्वर जांभूळकर यांना बाहेर काढण्यात आले. पांढुर्णा येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. सर्व जखमींची प्रकृती गंभीर असल्याने प्राथमिक उपचारानंतर त्यांना उपचारासाठी नागपूरला पाठविण्यात आले. नागपुरातील शासकीय रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

कर्करोगाच्या उपचारासाठी गेले होते भिलवाड्याला

गणेश वासुदेव खापरे यांना कॅन्सर झाला होता. कॅन्सरचे निदान झाल्याचे जखमींनी स्थानिक पोलिसांना सांगितले. ते नंदनवार कुटुंबाचे जावई आहेत. त्यांच्या उपचारासाठी सर्वजण भिलवाडा येथे गेले होते. तेथून परतत असताना मोही घाटीत विरुद्ध दिशेने येणाऱ्या ट्रकने त्यांच्या वाहनाला धडक दिली. अपघातानंतर ट्रकचालक ट्रकसह पसार झाला. पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपी ट्रकचालकाचा शोध सुरू केला.

PHOTO: वाघिणीचा जेव्हा अंत होतो.. पेंच अभयारण्यातली 29 बछड्यांची आई दगावली, वन्यप्रेमी हळहळले!

VIDEO: तर 105 नगर पंचायत समितीच्या निवडणुकीत ओबीसींचं नुकसान झालं नसतं; वडेट्टीवारांचं केंद्रावर बोट

नागपूर – मुंबई बुलेट ट्रेनचे काम रुळावर येणार कधी; डीपीआर मार्चपर्यंत तरी होणार का?

Non Stop LIVE Update
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या...
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या....
'पंकजाताईंनी मोठ मन केल म्हणून मी...', सभेतून धनंजय मुंडे काय म्हणाले?
'पंकजाताईंनी मोठ मन केल म्हणून मी...', सभेतून धनंजय मुंडे काय म्हणाले?.
चित्रपटात काम केलं असत.., सदा सरवणकरांच्या मुलीचा अमित ठाकरेंना टोला
चित्रपटात काम केलं असत.., सदा सरवणकरांच्या मुलीचा अमित ठाकरेंना टोला.
'रामदास कदम सरपटणारा साप, निवडणुकीनंतर...',ठाकरे गटाच्या नेत्याची टीका
'रामदास कदम सरपटणारा साप, निवडणुकीनंतर...',ठाकरे गटाच्या नेत्याची टीका.
'राणे पिता-पुत्र हे गाडग्यासारखे..', ठाकरे गटाच्या बड्या नेत्याची टीका
'राणे पिता-पुत्र हे गाडग्यासारखे..', ठाकरे गटाच्या बड्या नेत्याची टीका.
भाजपच्या किती जागा येणार?,कोण होणार CM?; विनोद तावडेंनी थेट सांगितलं..
भाजपच्या किती जागा येणार?,कोण होणार CM?; विनोद तावडेंनी थेट सांगितलं...
डोंबिवलीत भाजपचं कार्यालय फोडल, कोणी केल्ला हल्ला? घटना CCTV मध्ये कैद
डोंबिवलीत भाजपचं कार्यालय फोडल, कोणी केल्ला हल्ला? घटना CCTV मध्ये कैद.
एकनाथ शिंदेंच्या आमदारानं पैसे वाटले? विधानसभेच्या तोंडावर अडचणी वाढल्
एकनाथ शिंदेंच्या आमदारानं पैसे वाटले? विधानसभेच्या तोंडावर अडचणी वाढल्.
पंकजा मुंडेंकडून भाऊ धनंजय मुंडेंना खास गिफ्ट, सभेतून काय केली घोषणा?
पंकजा मुंडेंकडून भाऊ धनंजय मुंडेंना खास गिफ्ट, सभेतून काय केली घोषणा?.
पवार कुटुंबातील कटुता भविष्यात दूर होणार? अजित पवारांचं मोठं वक्तव्य
पवार कुटुंबातील कटुता भविष्यात दूर होणार? अजित पवारांचं मोठं वक्तव्य.