Devendra Fadnavis | दक्षिण-पश्चिम नागपूरमधील 1600 कुटुंबांचा प्रश्न; झोपडपट्टीधारकांसाठी देवेंद्र फडणवीसांचा पुढाकार

दक्षिण-पश्चिममधील सुमारे दीड हजार कुटुंब झोपडपट्टीत राहतात. गेल्या शंभर वर्षांपासून ते तिथं राहतात. त्यांना मनपाने मालकी पट्टी दिले आहेत. वीज जोडणीही झाली आहे. या झोपडपट्टीधारकांच्या मदतीसाठी आता माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही पुढाकार घेतला.

Devendra Fadnavis | दक्षिण-पश्चिम नागपूरमधील 1600 कुटुंबांचा प्रश्न; झोपडपट्टीधारकांसाठी देवेंद्र फडणवीसांचा पुढाकार
माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देताना स्थानिक नागरिक. Image Credit source: tv 9
Follow us
| Updated on: Apr 23, 2022 | 10:33 AM

नागपूर : दक्षिण-पश्चिम मतदारसंघातील काही भागातील झोपडपट्टीधारकांना दिलेल्या नोटीसा तत्काळ मागे घेण्यात याव्यात, या मागणीसाठी माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Leader of Opposition Devendra Fadnavis) यांच्या नेतृत्त्वात एका शिष्टमंडळाने शुक्रवारी रेल्वे अधिकाऱ्यांची (Railway officials) नागपुरात भेट घेतली. रामबाग, इंदिरानगर, जाटतरोडी, सरस्वतीनगर, तकिया परिसरातील 50 वर्षांपासून वास्तव्यास असलेल्या नागरिकांना नागपूर महापालिकेकडून मालकी हक्काचे पट्टे देण्यात आले आहेत. ही जागा नासुप्रची असल्याने रेल्वेने दिलेल्या नोटीस मागे घेण्यात याव्या, अशी मागणी यावेळी विभागीय रेल्वे व्यवस्थापक श्रीमती खरे यांच्याकडे करण्यात आली. सुमारे 1600 कुटुंबांचा हा प्रश्न आहे. या परिसरात 100 वर्षांपूर्वी एम्प्रेस मिलकडे जाणारी रेल्वेलाईन टाकण्यात आली होती.

वीज जोडणीही मिळाली

गेल्या 75 वर्षांपासून त्या लाईनचा कोणताही उपयोग झाला नाही. नंतरच्या काळात नागपूर महापालिकेने त्यांना मालकी हक्काचे पट्टे दिले आणि ते महापालिकेला कर सुद्धा देत आहेत. वीज मंडळाने त्यांना वीज जोडणी सुद्धा दिलेली आहे. तीन पिढ्यांपासून ते तेथे राहत आहेत, असे या निवेदनात सांगण्यात आले आहे. विभागीय रेल्वे व्यवस्थापक श्रीमती खरे तथा अन्य वरिष्ठ अधिकाऱ्यांनी म्हणणे ऐकून घेत पट्टेवाटप झाले असेल तर आम्ही त्यांना विस्थापित करणार नाही, असे आश्वासन दिले. तसेच सर्व कागदपत्रांची पडताळणी करण्यात येईल, असेही सांगितले.

रेल्वे मंत्रालय स्थरावर बैठक

दक्षिण-पश्चिममधील सुमारे दीड हजार कुटुंब झोपडपट्टीत राहतात. गेल्या शंभर वर्षांपासून ते तिथं राहतात. त्यांना मनपाने मालकी पट्टी दिले आहेत. वीज जोडणीही झाली आहे. या झोपडपट्टीधारकांच्या मदतीसाठी आता माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही पुढाकार घेतला. यावेळी या भागातील नागरिकांशी सुद्धा देवेंद्र फडणवीस यांनी संवाद साधला. गरज पडली तर याबाबत केंद्र सरकार आणि रेल्वे मंत्रालयाच्या स्तरावर या प्रश्नावर बैठक घेण्यात येईल. पण, कुठल्याही स्थितीत या नागरिकांवर अन्याय होऊ दिला जाणार नाही, असे आश्वासन देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी दिले. माजी महापौर संदीप जोशी आणि अन्य यावेळी उपस्थित होते.

Video: डिकीमध्ये लपून राणा दाम्पत्य बाहेर जाण्याचा शिवसैनिकांना डाऊट! खारमध्ये गाड्यांची कसून तपासणी

Navneet Rana vs Shiv sena : ‘येऊन दाखवा महाप्रसाद देतो’ शिवसैनिकांचं राणा दाम्पत्याला चॅलेंज

Uddhav Thackeray Vs Rana : मातोश्री बाहेर मध्यरात्रीपासून शिवसैनिक आक्रमक, राणा दाम्पत्याच्या घरासमोर शिवसैनिकांची घोषणाबाजी

ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर
ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर.
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला.
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.