शिवसेनेचे साम्राज्य उद्ध्वस्त होण्याचे मूळ कारण; अब्दुल सत्तार यांनी सांगितलं
सर्व सामान्य माणसापर्यंत तो संदेश जावा लोकांपर्यंत जाऊ. नव्याने पक्षप्रमुख झाल्याने त्याचा प्रचार प्रसार होण्यासाठी जनसंपर्क होईल. सर्वसामान्य माणसाची संवाद साधता येईल.
नागपूर : शिवसेनेचे साम्राज्य उद्ध्वस्त होण्यामागे मूळ कारण हे संजय राऊत आहेत. राजकारणाचे समीकरण कुठे जोडायचे कसे जोडायचे. काय बोलायचं कुठे बोलायचं. त्याचे परिणाम काय याची जाणीव न ठेवत ते बोलत असतात. संसदीय पदाच्या व्यक्तीबद्दल त्यांनी सन्मान ठेवायला पाहिजे. अशा पद्धतीने त्यांनी वक्तव्य करणे हे चुकीचं आहे. काहीही बोलून चालत नाही. त्यांच्यावर कायदेशीर कारवाई होईल, असं मंत्री अब्दुल सत्तार म्हणाले. नागपुरात विमानतळावर ते बोलत होते. सत्तार म्हणाले, विजय-पराजय होत राहतो. कसब्याच्या पराभवाचे चिंतन मनन आवश्यक आहे. पराभवाचे मूळ कारण काय हे शोधले जाईल. भविष्यात ते पुन्हा होऊ नये याची दक्षता घेतल्या जाईल.
धनुष्यबाण यात्रा चालू होणार
सर्व सामान्य माणसापर्यंत तो संदेश जावा लोकांपर्यंत जाऊ. नव्याने पक्षप्रमुख झाल्याने त्याचा प्रचार प्रसार होण्यासाठी जनसंपर्क होईल. सर्वसामान्य माणसाची संवाद साधता येईल. त्यासाठी धनुष्यबाण यात्रा चालू होणार आहे. वेगवेगळ्या जिल्ह्यातून तालुक्यातून यात्रा जाणार आहे. येणाऱ्या निवडणुकीत या यात्रेचं मोठं योगदान ठरेल. निवडणूक आयोगाने चिन्ह दिलं. पक्षाचं नाव दिलं. त्याचा सर्वसामान्य माणसांपर्यंत संदेश जावा. अयोध्येत धनुष्यबाणाचे पूजन होईल. त्यानंतर नवीन पक्षप्रमुख झाल्यानंतर लोकांपर्यंत जाऊ, असंही अब्दुल सत्तार यांनी म्हंटलंय.
उत्तर आल्यानंतर होणार कारवाई
संजय राऊत यांनी विधिमंडळ सदस्यांवर टीका केली. त्यानंतर अब्दुल सत्तार यांनी त्यांच्या अटकेची मागणी केली. त्या मागणीवर ठाम असल्याचंही सत्तार म्हणाले. राज्यकर्त्यांबद्दल अपशब्द वापरल्यास कारवाई झाली पाहिजे. हेतुपुरस्पर अशा शब्दांचा वापर करणे योग्य नाही. शिवसेनेत उद्रेक होण्यामागचे कारण संजय राऊत आहेत. सत्ता असताना वेगळ्या वळणावर उद्धव ठाकरे गेले आहेत. आता एकनाथ शिंदे यांना पक्षप्रमुख म्हणून शिक्कामोर्तब निवडणूक आयोगाने केला आहे. त्याचे परिणाम भविष्याच्या निवडणुकीमध्ये दिसतील. संजय राऊत यांना उत्तर मागितलं आहे. त्यानंतर कारवाई कशी होईल, हे ठरवलं जाईल, असंही सत्तार यांनी सांगितलं. संजय राऊत यांना अटक करावी. त्यांच्यावर कारवाई करावी, अशा वेगवेगळ्या मागण्या करण्यात आल्यात. विधानसभेचे अध्यक्ष काय कारवाई करतात. हे त्यांचं उत्तर आल्यानंतर कळेल.