नागपूर : एमआयडीसी पोलीस (MIDC Police) स्टेशनच्या हद्दीतील ही घटना आहे. एक सोळा वर्षाची मुलगी मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार 16 डिसेंबर रोजी पोलिसांत दाखल झाली. त्यानंतर तिचा शोध सुरू झाला. पीडित मुलीच्या घरची परिस्थिती बेताची होती. त्यामुळं तिला नोकरीचे आमिष दाखवून गुजरातमध्ये नेण्यात आले. त्यासाठी तिच्या मैत्रिणींचा वापर केला गेला. अहमदाबाद (Ahmedabad) येथे तुला नोकरी मिळेल, असे आश्वासन देण्यात आले. तिथं गेल्यानंतर एका 35 वर्षीय व्यक्तीशी तिचा विवाह लावून देण्यात आला. त्या मोबदल्यात एक लाख रुपये मुलीला अहमदाबादमध्ये पोहचविणाऱ्या टोळीस मिळाले. या प्रकरणी पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर त्यांनी तीन आरोपींना अटक केली. त्यात एका महिलेचा व दोन पुरुषांचा समावेश आहे. अटक झालेली ही महिला सोमवारी क्वार्टर्स (Quarters) येथील रहिवासी आहे. विशाखा प्रदीप बिस्वास असं तीचं नाव.
विशाखाला अटक केल्यानंतर पोलीस गुजरातमध्ये गेले. त्याठिकाणी पीडित मुलीची सुटका केली. व दोन पुरुष आरोपींना अटक केली. निखिल पटेल व प्रकाश वनकर अशी या एजंट आरोपींची नावे आहेत. तिन्ही आरोपींविरोधात अपहरणाच्या कलमासह अत्याचार, बालविवाह कायदा पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. अशी माहिती एमआयडीसीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक उमेश बेसरकर यांनी दिली. या प्रकरणी आणखी काही आरोपी आहेत या याचा शोध सुरू आहे.
गरीब मुलगी बघायची. तिला पैशाचे आमिष दाखवायचे. शिवाय तुला कामधंदा मिळेल. सुखात राहशील असे सांगायचे. तिला गुजरातमध्ये न्यायचे. त्याठिकाणी एखाद्या पुरुषासोबत विवाह लावून द्यायचा. तू राणीसारखी राहशील काही कमी पडणार नाही, असे आश्वासन द्यायचे. या मोबदल्यात तिला ज्या पुरुषासोबत विवाह होतो, तो व्यक्ती या एजंटांना पैसे देतो. चार-पाच लोकं या टोळीत वेगवेगळी भूमिका पार पाडतात. अशाच टोळीतील तीन जणांना अटक करण्यात आली आहे. आणखी काही जण पोलिसांच्या रडारवर आहेत.