Nagpur Cultural Festival | खासदार सांस्कृतिक महोत्सव शनिवारपासून, हेमामालिनी, शंकर महादेवन येणार

राज्य सरकारच्या कोविड निर्बंधामुळे डिसेंबरमध्ये नागपुरातील खासदार सांस्कृतिक महोत्सव मध्यंतरी थांबवावा लागला. गायक, संगीतकार शंकर महादेवन आणि ड्रीमगर्ल हेमामालिनी यांचे कार्यक्रम रद्द झाले. हे कार्यक्रम आता 19 ते 24 मार्च दरम्यान होणार आहेत.

Nagpur Cultural Festival | खासदार सांस्कृतिक महोत्सव शनिवारपासून, हेमामालिनी, शंकर महादेवन येणार
खासदार सांस्कृतिक महोत्सवImage Credit source: facebook
Follow us
| Updated on: Mar 17, 2022 | 7:00 AM

नागपूर : खासदार सांस्कृतिक महोत्सव (MP Cultural Festival) ईश्‍वर देशमुख कॉलेज ग्राउंडमध्ये होणार आहे. या महोत्सवात श्रीवल्ली फेम जावेद अली, सुप्रसिद्ध गायिका सुनिधी चव्हाण यांच्यासह शंकर महादेवन, अभिनेत्री हेमामालिनी आणि इतर अनेक राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय कलाकार हजेरी लावणार आहेत, अशी माहिती आयोजन समितीचे अध्यक्ष प्रा. अनिल सोले (Anil Sole) यांनी दिली. साहित्य, संस्कृती, संगीत, नाट्य, नृत्य अशा अनेक कलांचा संगम असलेला खासदार सांस्कृतिक महोत्सव केंद्रीय मंत्री, खासदार नितीन गडकरी (MP Nitin Gadkari) यांच्या कल्पनेतून साकारला गेला आहे. देशात खासदार सांस्कृतिक महोत्सवाची चर्चा होऊ लागली आहे. अनेक राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय ख्यातीचे कलाकार या महोत्सवात आपली कला सादर करण्यासाठी उत्सुक आहेत.

अशी होणार कार्यक्रमांची रेलचेल

महोत्सवाचे उद्घाटन शनिवारी 19 मार्चला माय कंट्री माय म्युझिक या संगीतकार शंकर महादेवन यांच्या लाईव्ह इन कॉन्सर्टने होणार आहे. 20 मार्चला इंडिपॉप व्वीन सुनिधी चौहान, 21 मार्चला वंडर व्हाईस साईराम अय्यर, 22 मार्चला व्हर्सटाईल जावेद अली यांचे लाईव्ह कॉन्सर्ट होणार आहे. 23 मार्चला हास्यकवी संमेलनात पद्मश्री कवी सुरेंद्र शर्मा, सुरेंद्र दुबे, रुण जेमिनी, डॉ. प्रवीण शुक्ला, कविता तिवारी आणि डॉक्टर विष्णू सक्सेना सहभागी होतील. गुरुवारी 24 मार्चला पद्मश्री हेमामालिनी यांच्या राधा रासबिहारी या नृत्यनाटिकेने महोत्सवाचा समारोप होईल. महोत्सवासाठी डिजीटल पासची व्यवस्था करण्यात आली आहे.

नागपूरकरांना साद प्रतिसादाची

विदर्भाची व मध्य भारताची शान असलेल्या या खासदार सांस्कृतिक महोत्सवाला नागपूरकरांनी भरभरून प्रतिसाद द्यावा, असे आवाहन आयोजन समितीचे अध्यक्ष प्रा. अनिल सोले, सर्व उपाध्यक्ष प्रा. मधुप पांडे, डॉ. गौरीशंकर पाराशर, अशोक मानकर, दिलीप जाधव, सचिव जयप्रकाश गुप्ता, कोषाध्यक्ष प्रा. राजेश बागडी, सर्व सदस्य बाळ कुळकर्णी, अविनाश घुशे, हाजी अब्दुल कादीर, संदीप गवई, संजय गुळकरी, रेणुका देशकर, आशिष वांदिले, चेतन कायरकर, भोलानाथ सहारे व किशोर पाटील यांनी केले आहे.

Yavatmal Crime | बनावट दारू बनविणाऱ्या कारखान्यावर धाड, 5 लाख रुपयांचे साहित्य जप्त

photo – वाशिममध्ये दोन मोटारसायकल समोरासमोर भिडल्या, अपघातात शिक्षक ठार, दोन जण गंभीर 

नागपुरातील दोघे मित्र दारू पित बसले, झिंग चढल्यानंतर वाद झाला, त्यात एक जिवानीशीचं गेला!

Sadavarte Video: सदावर्तेंचा सुरेश धसांवर टीका, 'हवालदार म्हणून काम..'
Sadavarte Video: सदावर्तेंचा सुरेश धसांवर टीका, 'हवालदार म्हणून काम..'.
Karad Property Video : घरगडी कराड कसा झाला अरबपती? संपत्ती नेमकी किती?
Karad Property Video : घरगडी कराड कसा झाला अरबपती? संपत्ती नेमकी किती?.
Walmik Karad Video : कराडवर मकोका अन्10 मिनिटांत परळी बंदची हाक
Walmik Karad Video : कराडवर मकोका अन्10 मिनिटांत परळी बंदची हाक.
Walmik Karad Video : कराडवर मकोका....हत्येच्या गुन्ह्यात अडकला!
Walmik Karad Video : कराडवर मकोका....हत्येच्या गुन्ह्यात अडकला!.
MSRTC Viral Video : 'मी कसं चढू?', व्हायरल होणाऱ्या एसटीच वास्तव काय?
MSRTC Viral Video : 'मी कसं चढू?', व्हायरल होणाऱ्या एसटीच वास्तव काय?.
बीडचा पालकमंत्री कोण होणार? अजित पवारांनी सांगितली थेट तारीख
बीडचा पालकमंत्री कोण होणार? अजित पवारांनी सांगितली थेट तारीख.
कराडवर मकोका अन् पुन्हा मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी, दमानिया म्हणाले
कराडवर मकोका अन् पुन्हा मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी, दमानिया म्हणाले.
कराडवर मकोका, सरपंच देशमुखांच्या हत्येचा कट रचला? McocaAct म्हणजे काय?
कराडवर मकोका, सरपंच देशमुखांच्या हत्येचा कट रचला? McocaAct म्हणजे काय?.
वाल्मिक कराडला मकोका अन् सुरेश धस म्हणाले...'त्यांना शिक्षा होणार'
वाल्मिक कराडला मकोका अन् सुरेश धस म्हणाले...'त्यांना शिक्षा होणार'.
वाल्मिक कराडवर मकोका अन् परळी बदं, समर्थक उतरले रस्त्यावर अन्...
वाल्मिक कराडवर मकोका अन् परळी बदं, समर्थक उतरले रस्त्यावर अन्....