Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Video – Nagpur Crime | दुचाकीस्वार आले, वृद्ध महिलेच्या हातून पैशांची पिशवी घेऊन पळाले! सीसीटीव्हीत घटना कैद

नागपुरात बँकेतून रोकड काढून दुचाकीने जाणाऱ्या एका वृद्ध दाम्पत्याचे लुटारुंनी  5 लाख रुपये लुटले. ही घटना नागपूरच्या एमआयडीसी पोलीस स्टेशन हद्दीत घडली. लुटीचा हा सगळा प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला. 

Video - Nagpur Crime | दुचाकीस्वार आले, वृद्ध महिलेच्या हातून पैशांची पिशवी घेऊन पळाले! सीसीटीव्हीत घटना कैद
एमआयडीसी पोलीस हद्दीतील याच एसबीआय बँकेसमोरून पिशवी घेऊन चोर पळाले. Image Credit source: tv 9
Follow us
| Updated on: Mar 04, 2022 | 5:19 PM

नागपूर : नागपूरच्या एमआयडीसी पोलीस स्टेशन (MIDC Police Station) हद्दीत एका वयोवृद्ध दाम्पत्याला लुटल्याची घटना पुढे आली. ही लुटीची घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली. धक्कादायक म्हणजे लुटण्यात आलेले वृद्ध सेवानिवृत्त पोलीस अधिकारी (Retired Police Officer) आहेत. शिवप्रसाद विश्वकर्मा आणि त्यांची पत्नी मीना विश्वकर्मा काल दुपारी एमआयडीसी परिसरातील एसबीआय बँकेत गेले होते. पाच लाख रुपयांची रोकड काढून पिशवीत भरून दुचाकीकडे जात होते. पार्किंगजवळ दोन बाईकस्वारांनी त्यांच्या हातातील पिशवी हिसकावून पळ (bag snatched and fled) काढला.

पिशवी हिसकावली नि पळ काढला

घराच्या बांधकामासाठी ते पत्नीसोबत स्कुटरने एसबीआय बँकेत पैसे काढण्यासाठी गेले होते. बँकेतून पाच लाख रुपये काढल्यानंतर पिशवीत ठेवून पत्नीच्या हातात ती पिशवी दिली. बँकेच्या बाहेर रस्त्यावर ठेवलेली स्कुटर सुरू करीत असताना मागून  मोटरसायकलवर दोन आरोपी आले. मीना यांच्या हातातील ती पिशवी हिसकावून पळ काढला.

पाहा व्हिडीओ

सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास

विश्वकर्मा दाम्पत्य प्रचंड घाबरले. त्यानंतर त्यांनी पोलिसांत तक्रार केली. पोलीस हिंगणा मार्गावरील सीसीटीव्ही फुटेजवरून आरोपींचा शोध घेत आहे. आरोपी हे बँकेमधूनच वृद्ध दाम्पत्याच्या मागावर असल्याचा पोलिसांना संशय आहे. त्यामुळे बँकेतील सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्या आधारावर पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

नितीन गडकरींनी दिले मनपा निवडणुकीच्या तिकीट वाटपाबाबत संकेत, नागपुरातील अनेक नगरसेवक धास्तावले!

गोंदियातील सेजगावमध्ये महिला डॉक्टरने घेतला गळफास, किरायाच्या घरात का घेतला अंतिम श्वास?

अमरावती महापालिकेवर 8 मार्चपासून प्रशासकाची सत्ता, निवडणूक लांबणीवर, कारण काय?

वक्फ बिलाबद्दल ठाकरेंच्या शिवसेनेची भूमिका अस्पष्टच
वक्फ बिलाबद्दल ठाकरेंच्या शिवसेनेची भूमिका अस्पष्टच.
जर बाळासाहेब असते तर तुम्ही..., श्रीकांत शिंदे संतापले
जर बाळासाहेब असते तर तुम्ही..., श्रीकांत शिंदे संतापले.
धसांच्या आरोपांवर किरण जाधवांनी बोलणं टाळलं, कॅमेरा बघताच ठोकली धूम
धसांच्या आरोपांवर किरण जाधवांनी बोलणं टाळलं, कॅमेरा बघताच ठोकली धूम.
दाऊदचा उजवा हात म्हणून ओळख; टायगर मेमन पुन्हा का आला चर्चेत
दाऊदचा उजवा हात म्हणून ओळख; टायगर मेमन पुन्हा का आला चर्चेत.
अंबरनाथच्या बँकेत मनसेचा राडा; अमराठी बँक मॅनेजरला धरलं धारेवर
अंबरनाथच्या बँकेत मनसेचा राडा; अमराठी बँक मॅनेजरला धरलं धारेवर.
'नाहीतर आमची आवस्था...', सदाभाऊ काय म्हणाले की सगळेच पोट धरून हसले
'नाहीतर आमची आवस्था...', सदाभाऊ काय म्हणाले की सगळेच पोट धरून हसले.
अबीर गुलालच्या प्रदर्शनाचा मुद्दा पेटला; मनसे आक्रमक
अबीर गुलालच्या प्रदर्शनाचा मुद्दा पेटला; मनसे आक्रमक.
कुणी पैसे काढून घेत असेल तर...लाडक्या बहिणींना पंकजाताई काय म्हणाल्या?
कुणी पैसे काढून घेत असेल तर...लाडक्या बहिणींना पंकजाताई काय म्हणाल्या?.
धनंजय देशमुख अजित पवारांच्या भेटीसाठी दाखल
धनंजय देशमुख अजित पवारांच्या भेटीसाठी दाखल.
दिशा सालियान प्रकरणाची सुनावणी मुंबई हायकोर्टात होणार
दिशा सालियान प्रकरणाची सुनावणी मुंबई हायकोर्टात होणार.