असे आहेत फायर फायटिंग सूट जे अग्निशमन जवानांचे संरक्षण करतात; या सूटची वैशिष्ट्ये काय?

हा सूट अग्निशमन जवानांना कोणत्याही फ्लेशओव्हरपासून अर्थात आगीच्या ज्वालांपासून वाचवेल. या सूटचे सर्व भाग युरोपीयन मानकांनुसार प्रमाणित करण्यात आले आहेत. सूटमध्ये जॅकेट पॅन्ट हुड, हातमोजे, हेल्मेट आणि बूट यांचा समावेश आहे.

असे आहेत फायर फायटिंग सूट जे अग्निशमन जवानांचे संरक्षण करतात; या सूटची वैशिष्ट्ये काय?
Follow us
| Updated on: Feb 28, 2023 | 4:17 PM

नागपूर : अग्निशमन व आणिबाणी सेवा विभागाने ‘मेक इन इंडिया’ अंतर्गत १७० व्यक्तिगत सुरक्षा उपकरण व ५० नग श्वसन उपकरण खरेदी केले आहेत. शहरातील वाढती लोकसंख्या, झपाट्याने होणारा विकास वाढती इमारतींची उंची या सर्व बाबींच्या अनुषंगाने अग्निशमन दलाच्या जवानांच्या सुरक्षेच्या दृष्टीने हे फायटिंग सूट महत्त्वाचे आहेत. मनपाच्या अग्निशमन यंत्रणेच्या ताफ्यात अत्याधुनिक व आंतरराष्ट्रीय मानकांवर आधारित या फायर फायटिंग सूटचा समावेश करण्यात आला आहे. मनपा मुख्यालयातील छत्रपती शिवाजी महाराज प्रशासकीय इमारतीच्या आवारात मनपा आयुक्त राधाकृष्णन बी.यांनी फायर फायटिंग सूटचे निरीक्षण केले. अग्निशमन व आणीबाणी सेवा विभागाने ‘मेक इन इंडिया’ अंतर्गत १७० फायर फायटिंग सूट व जर्मन बनावटीचे ५० नग खरेदी केले आहेत.

धुर मानवी जीवनास धोकादायक

या सूटमध्ये वापरलेले कापड हे परदेशातून आणण्यात आले आहे. हा सूट भारतात तयार करण्यात आला आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञानाकडे वाटचाल करीत असल्याचे सांगत मुख्य अग्निशमन अधिकारी राजेंद्र उचके म्हणाले की, अग्निशमन जवानांना आगीच्या दुर्घटनांवर अग्निशमनाचे कार्य करण्यास जावे लागते. जळणाऱ्या वस्तूंच्या भौतिक व रासायनिक गुणधर्मानुसार वेगवेगळ्या प्रकारचा धुर निघत असतो. हा धुर मानवी जीवनाला फार धोकादायक असतो. तसेच विषारी वायू गळती दुर्घटना स्थळांतील प्राणवायुची कमी अशा वातावरणात जाऊन कर्मचा-याला अग्निशमनाचे कार्य करावे लागते.

जॅकेट आणि पायघोळ ३ थरांनी बनलेले

अशा वेळेस त्याच्या स्वतःच्या बचावाकरिता बी. ए. सेटचा वापर करावा लागतो. त्यामुळे शुद्ध हवेचा पुरवठा त्याला मिळतो. अग्निशमन विभागाला मिळालेला फायर फायटिंग सूट हा प्रॉक्सिमिटी सूट आहे. हा सूट अग्निशमन जवानांना कोणत्याही फ्लेशओव्हरपासून अर्थात आगीच्या ज्वालांपासून वाचवेल. या सूटचे सर्व भाग युरोपीयन मानकांनुसार प्रमाणित करण्यात आले आहेत. सूटमध्ये जॅकेट पॅन्ट हुड, हातमोजे, हेल्मेट आणि बूट यांचा समावेश आहे. सूटमधील जॅकेट आणि पायघोळ हे Nomex नावाच्या जगातील सर्वोत्कृष्ट फॅब्रिकसह तयार केले जाते. ते मूळतः फ्लेम रिटाईट आहेत. जॅकेट आणि पायघोळ ३ थरांनी बनलेले आहेत. यातील बाह्य भाग कोणत्याही थेट ज्वालाच्या संपर्कापासून जवानांचे संरक्षण करतो. मधला थर, ज्याला मॉइश्चर बेरियर असेही म्हणतात, हा थर जवानाला कोरडा ठेवतो.

बुटांचा दुहेरी रंग

सर्वात आतील थर हा थर्मल बेरियर आहे. जो जवानाला तेजस्वी उष्णतेपासून वाचवतो. जवानांचे बूटला स्टील टो कँप आणि स्टील मिड सोलने तयार केले आहेत. जे फायरमनच्या पायाचे कोणत्याही जड आणि तीक्ष्ण वस्तूपासून संरक्षण करते. १५KV पर्यंत इलेक्ट्रिक शॉक प्रूफ करण्यासाठी बुटांची चाचणी देखील करण्यात आली आहे. बुटांच्या दुहेरी रंगामुळे ते दूरवरून दृश्यमान होईल. बूट सहजपणे वाहून नेण्यासाठी आणि खेचण्यासाठी लूप दिले जातात. फायरमन हेल्मेटला वायझर आणि इनर गॉगल दिलेले आहेत. फायरमन गरजेनुसार दोन्ही किंवा कोणतेही वापरू शकतो. अतिरिक्त संरक्षणासाठी अल्युमिनाइझ्ड नेक प्रोटेक्टर देखील प्रदान केले आहेत. हातमोजे कोणत्या ही गरम वस्तूपासून जवानांचे संरक्षण करतील. हूड फायरमनच्या चेह-याला तेजस्वी उष्णतेपासून अतिरिक्त संरक्षण देईल.

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.