Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राजकारणात आणखी एका काका-पुतण्याचा संघर्ष, काटोल विधानसभा मतदारसंघात काका-पुतण्या लढत?

यावेळेस भाजपने काटोलची निवडणूक प्रतिष्ठेची केलीय. आशिष देशमुख यांना मैदानात उतरुवून, काका - पुतण्याची लढत करण्याची भाजपची रणनिती आहे.

राजकारणात आणखी एका काका-पुतण्याचा संघर्ष, काटोल विधानसभा मतदारसंघात काका-पुतण्या लढत?
Follow us
| Updated on: May 25, 2023 | 4:36 PM

गजानन उमाटे, प्रतिनिधी, नागपूर : महाराष्ट्राच्या राजकारणात काका पुतण्याचा संघर्ष नवा नाही. नागपूर जिल्ह्यातील काटोल विधानसभा मतदारसंघातंही काका अनिल देशमुख आणि पुतण्या आशिष देशमुख यांच्यात लढत होण्याची शक्यता आहे. काँग्रेसने निष्कासित केल्यानंतर आशिष देशमुख भाजपच्या वाटेवर आहे. भाजपलाही काटोलमध्ये तगड्या उमेदवाराचा शोध होता. त्यामुळे आशिष देशमुख काटोल मतदारसंघातून भाजपचे उमेदवार राहिले, तर २०१४ प्रमाणे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीतही काका-पुतण्या लढत होण्याची शक्यता आहे.

नागपूर जिल्ह्यातील काटोल विधानसभा मतदारसंघ राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख यांचा बालेकिल्ला आहे. या मतदारसंघात अनिल देशमुख तब्बल चार वेळा निवडून आलेत. पण यावेळेस भाजपने काटोलची निवडणूक प्रतिष्ठेची केलीय. आशिष देशमुख यांना मैदानात उतरुवून, काका – पुतण्याची लढत करण्याची भाजपची रणनिती आहे.

हे सुद्धा वाचा

यापूर्वी २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपच्या तिकिटावर लढलेल्या आशिष देशमुख यांनी अनिल देशमुख यांचा पराभव केला होता. यावेळेसही भाजपने तीच तयारी केलीय. त्यामुळे आशिष देशमुख यांना पक्षात घेण्याची पूर्ण तयारी भाजपने केलीय. त्यामुळे आतापासूनच आशिष देशमुख काकांच्या विरोधात दंड थोपटून उभे आहे.

काटोल मतदारसंघात २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपचा पराभव झाला. तेव्हापासूनच भाजपने या मतदारसंघात संपूर्ण ताकद लावलीय. नुकतेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी काटोलचा दौरा केला.

कार्यकर्ता मेळावा घेऊन काटोल जिंकण्याचा निर्धार केला. काटोलमध्ये अनिल देशमुख यांचा पराभव करायचा असेल तर आशिष देशमुख सारखा तगडा, उमेदवार हवा. हे भाजपच्या नेत्यांना चांगलं माहीत आहे.

गेल्या काही दिवसांत आशिष देशमुख आणि भाजप नेत्यांच्या भेटीगाठी वाढल्यात. फडणवीस आणि बावनकुळे हे आशिष देशमुख यांच्या घरी जाऊन आलेत. यावरून काटोल मतदारसंघात काका – पुतण्या लढत होणार, अशीच शक्यता वर्तवली जातेय.