जामीन जामिनाच्या खेळात प्रशांत कोरटकर भारताबाहेर पसार? कोणत्या देशात लपला? दुसरा दावा काय?
Prashant Koratkar Out of India : छत्रपती शिवराय आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणारा प्रशांत कोरटकर भारताबाहेर पसार झाल्याचा दावा करण्यात येत आहे? तर कोल्हापूरचे पथक त्याला नागपूरजवळील या शहरात शोधत आहेत.

छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केलेला प्रशांत कोरटकर याने यंत्रणांच्या हातावर तुरी दिल्याचा दावा करण्यात येत आहे. नागपूरमधील कोरटकर अजूनही तपास यंत्रणांच्या हाती लागला नाही. त्यावरून नाराजीचा सूर असतानाच आता कोरटकर थेट भारताबाहेर पसार झाल्याचा दावा करण्यात येत आहे. इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत यांना जिवे मारण्याची धमकी आणि महापुरुषांबद्दल आक्षेपार्ह भाषा वापरल्याप्रकरणात कोरटकरविरोधात कोल्हापूरसर राज्यातील इतर भागात गुन्हे दाखल करण्यात आले आहे. कोरकटर याला स्थानिक न्यायालयातून दिलासा न मिळाल्याने त्याने अटकपूर्व जामीनासाठी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. त्यातच तो देशाबाहेर पळाल्याचा दावा करण्यात येत आहे.
कोरटकर पळाला दुबईला?
मुंबई हायकोर्टात यापूर्वी दिलासा न मिळाल्याने प्रशांत कोरटकर दुबईला पळून गेल्याचा दावा करण्यात येत आहे. याविषयीची चर्चा व्हायरल झाली आहे. सोशल मीडियावर त्याचे दुबईतील फोटो समोर येत आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, तो दुबईत असल्याचा फोटो व्हायरल झाला आहे. प्रशांत कोरटकर सापडत नसल्याने राज्यभरात शिवप्रेमी संताप व्यक्त करताना असताना तो देशाबाहेर पळाल्याचा दावा करण्यात येत असल्याने मोठी खळबळ उडाली आहे.




कसा पळाला दुबईला?
कोरटकर हा दुबईला पळाल्याचा दावा करण्यात येत आहे. तो दुबईला कसा पळाला याविषयी दावे -प्रतिदावे करण्यात येत आहे. एका दाव्यानुसार, तो अगोदर कोलकत्ता येथे गेला आणि तिथून त्याने दुबईला धूम ठोकली. अर्थात याविषयी अधिकृत कोणतीही माहिती समोर आली नाही. सूत्रांनी याविषयीची माहिती दिली आहे.
चंद्रपूर परिसरात लपल्याचा पण दावा
दुसर्या एका दाव्यानुसार, प्रशांत कोरटकर हा दुबईला पळाला नाही तर चंद्रपूरात लपला आहे. कोल्हापूर पोलिसांचे पथकाने नागपूरमध्ये त्याचा शोध घेतला होता. त्याच्या घरावर छापा मारला असता तो आढळला नाही. प्रशांत कोरटकर चंद्रपूरात असल्याचे कळल्यानंतर पथक चंद्रपूर येथे गेल्याची माहिती समोर येत आहे.
दरम्यान इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत यांना जिवे मारण्याची धमकी आणि महापुरुषांबद्दल आक्षेपार्ह भाषा वापरल्याप्रकरणात कोरटकरविरोधात कोल्हापूरसर राज्यातील इतर भागात गुन्हे दाखल करण्यात आले आहे. अटकपूर्व जामीनासाठी त्याने मुंबई हायकोर्टात धाव घेतली आहे. या अर्जावर सोमवारी सुनावणी अपेक्षित आहे.