Rahul Gandhi : हे केवळ पुस्तक नाही, ते भारताचं व्हिजन, नागपूरमधील संविधान सन्मान संमेलनात राहुल गांधी यांचं मोठं वक्तव्य

Rahul Gandhi on Constitution : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील प्रचाराला आता वेग चढला आहे. त्यापूर्वीच राहुल गांधी यांनी राज्यातील प्रचारात स्फोटक वक्तव्याने वातावरण तापवले आहे. जातनिहाय जनगणनेबाबतच आता संविधान बचावचा पुन्हा नारा त्यांनी दिला आहे. नागपूरमधील संविधान सन्मान संमेलनात त्यांनी मोठं वक्तव्य केलं आहे.

Rahul Gandhi : हे केवळ पुस्तक नाही, ते भारताचं व्हिजन, नागपूरमधील संविधान सन्मान संमेलनात राहुल गांधी यांचं मोठं वक्तव्य
राहुल गांधी
Follow us
| Updated on: Nov 06, 2024 | 3:25 PM

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील प्रचाराचा नारळ फुटला आहे. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा जातनिहाय जनणना, ओबीसींचा सत्तेतील वाटा आणि संविधान बचाव या तीन मुद्यांना हवा दिली आहे. राज्यात येण्यापूर्वीच त्यांच्या स्फोटक विधानाने वातावरण तापले आहे. आज त्यांनी नागपूरमध्ये पुन्हा त्यांचा प्रचाराचा रोख काय असेल, याची झलक दाखवली. संविधान सन्मान संमेलनात त्यांनी मोठं वक्तव्य केलं. त्यांनी भाजपाविरोधात आरोपांची राळ उडवली. काय म्हणाले राहुल गांधी?

त्यांनी दुसऱ्यांच्या वेदना मांडल्या

या संमेलनात राहुल गांधी यांनी महापुरूषांच्या विचाराचे प्रतिबिंब मांडले.  “आता तुम्ही आंबेडकर आणि गांधींचा विषय काढला. प्रत्येक संमेलनात आंबेडकर आणि गांधींजींचा विचार होतो. शिवाजी महाराज, संत तुकाराम, महात्मा फुले, शाहू महाराज, बिरसा मुंडा, सावित्रीबाई फुले, भगवान बुद्धाचे विचार मांडले जातात. त्यांचा उल्लेख होतो. प्रत्येक राज्यात तुम्हाला असे दोन तीन नावे सापडतील. आपण त्यांचं स्मरण करतो. गांधीजी अमर रहे, आंबेडकर अमर रहे म्हणतो, पण वास्तव हे आहे की जेव्हा गांधी आंबेडकरांवर बोलतो तेव्हा व्यक्तीवर बोलत नाही. आपण आंबेडकरांवर बोलायचं झालं तर ते एक फॉर्म होते, एक शरीर होते. पण आंबेडकरांच्या तोंडून केवळ त्यांचा आवाज येत नव्हता. जेव्हा ते बोलायचे तेव्हा कोट्यवधी लोकांची आवाज त्यांच्या तोंडून यायचा. फक्त आंबेडकरांचा आवाज आला असता तर आपण त्यांची आठवण केली नसती. ते जेव्हा बोलायचे तेव्हा दुसऱ्यांचं दुख वेदना, ते त्यांच्या तोंडून यायचे. मी त्यांची पुस्तके वाचली आहे. ॲनिहिलेशन ऑफ कास्ट असेल, बुद्धिझमवरील अनेक पुस्तके वाचले. जेव्हा तुम्ही आंबेडकर वाचता तेव्हा असं दिसतं ही व्यक्ती आपलं म्हणणं मांडत नाही, दुसऱ्यांच्या वेदना मांडत आहेत, असं वाटतं.” गांधी यांनी असं मत व्यक्त केलं.

हे सुद्धा वाचा

हे पुस्तक तर भारताचं व्हिजन

“प्रत्येक नेत्यामध्ये एक द्व्ंद असतं. मला काय हवं आणि जनतेला काय हवं. यात द्वंद्व होतं. पण आंबेडकर आणि गांधी सारखे लोक आपली आवाज बंद करतात. त्यांच्या तोंडून आपलं दुख वेदना येत नाही. दुसऱ्यांच्या वेदना येतात. जेव्हा आपण हे संविधान भारतात केवळ काँग्रेस पक्षाने नाही,. केवळ नेहरू आणि गांधींनी नव्हे भारताने आंबेडकरांना सांगितलं तुम्ही हे संविधान तयार करा. तेव्हा देश त्यांना सांगत होता. आम्हाला वाटतं या संविधानात जे या देशात कोट्यवधी दलित आहे. त्यांची वेदना आहे, त्यांना रोज ती सहन करावी लागते. ते दुख तो आवाज या संविधानात गुंजला पाहिजे. ते काम आंबेडकरांनी केलं.”, संविधान सन्मान संमेलनात गांधींनी तत्कालीन परिस्थितीचे आकलन असं केलं.

“आता लोक म्हणतात आंबेडकरांनी हे संविधान स्वातंत्र्याच्या एकदम नंतर बनवलं. मी तुम्हाला विचारतो, त्यात फुल्यांचा आवाज नाही का, बुद्धाचा आवाज नाही का, बसवन्नाचा आवाज नाही का, सावित्रीबाईंचा आवाज नाही का. याची आपण रक्षा करत आहोत. ही हजारो वर्ष जुनं पुस्तक आहे. यातील विचार आहे… आपण हे मॉडर्न व्हर्जन आहे. २१व्या शतकातील व्हर्जन आहे. पण यातील विचार हजारो वर्ष जुने आहेत. जे यात सांगितलं तेच बुद्धाने, अशोकाने सांगितलं. सर्वच महापुरुषांनी सांगितलं. तेच आंबेडकर आणि गांधींनी सांगितलं. हे केवळ पुस्तक नाही. ते भारताचं व्हिजन आहे. हे जगण्याची पद्धत आहे. हे पुस्तक म्हणजे मरण्याची पद्धत आहे. आम्ही जगू तर देशासाठी जगू. एकमेकांचा आदर करू. आणि दुसऱ्यांना देणार आहोत.”  असे विचार त्यांनी मांडले.

'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र.
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला.
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद.
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?.
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच.
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली.