पोलीस ठाणे बॉम्बने उडवण्याची धमकी, त्यानंतर सुरू झाली पोलिसांची अशी धावपळ
त्यामुळे पोलिसांनाच बॉम्बने उडवून देण्यात येईल, अशी धमकी आली. त्यामुळे बिट मार्शल घाबरले. त्यांनी वरिष्ठांना कळवले. पोलिसांनी कॉल बॅक केला. तोपर्यंत फोननंबर स्वीच ऑफ दाखवत होता.
नागपूर : स्थळ यशोधरानगर पोलीस स्टेशन. वेळ सकाळची. पेट्रोलिंग सुरू होती. डायल ११२ वरून बिट मार्शलला अज्ञात व्यक्तीने फोन केला. मुलीचा मृतदेह अद्याप प्राप्त झाला नाही. माझ्या तक्रारीच्या प्रकरणात कारवाई झाली नाही. त्यामुळे पोलिसांनाच बॉम्बने उडवून देण्यात येईल, अशी धमकी आली. त्यामुळे बिट मार्शल घाबरले. त्यांनी वरिष्ठांना कळवले. पोलिसांनी कॉल बॅक केला. तोपर्यंत फोननंबर स्वीच ऑफ दाखवत होता. त्यानंतर फोन लागला. पण, पोलिसांना त्रास देण्यासाठी हा फोन केल्याचं सांगितलं.
कॉलर पोलिसांचे फोन उचलत नाही
वरिष्ठ पोलिसांनी संबंधित कॉलरविरोधात तक्रार नोंदवली. यशोधरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला. या घटनेमुळे पोलिासंची डोकेदुखी वाढलीय. सावनेर तालुक्यातील वलनी येथील एका संघणक रिपेअरिंग सेंटरचा पत्ता दाखवत होता. संबंधित कॉलरने पोलिसांत येणे टाळले. त्यानंतर तो पोलिसांचे फोनही उचलत नसल्याची माहिती आहे.
का केला असेल फोन
या कॉलरने हा फोन का केला असेल, यावर पोलीस काम करत आहेत. ठाण्यातील पोलिसांविरोधात कुणाचातरी राग असावा. त्यातून त्याच्या मनात राग असावा. असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. तरीही पोलिसांना थेट फोन करणे या व्यक्तीला चांगलेच महागात पडेल, असे दिसते.
बॉम्बने उडवण्याची धमकी
राजकीय व्हीआयपींना बॉम्बने उडवून देण्याच्या धमकीनंतर आता थेट पोलिसांनाही बॉम्बने उडवून देण्याची धमकी देण्यात आली. नागपुरातील यशोधरा पोलीस ठाण्यातील पोलिसांना बॉम्बने उडवून देण्याची धमकी देण्यात आली. डायल 112 वर बिट मार्शलला अज्ञात व्यक्तीचा बॉम्बने उडवण्याचा फोन आला.
धमकी सायको की पोलिसांचा राग
मुलींचे मृतदेह अद्याप प्राप्त झाले नाही. आपल्या तक्रारीवर कारवाई केली नाही म्हणून बॉम्बने उडवून देण्याची धमकी देण्यात आली. बॉम्बने उडवून देण्याच्या धमकीने पोलिसांची भागमभाग झाली. धमकी सायको की पोलिसांचा राग ? यासंदर्भात अज्ञात आरोपींचा शोध सुरू आहे.
यापूर्वी नितीन गडकरी यांना धमकीचे फोन आले होते. राजकीय नेत्यांपाठोपाठ पोलिसांनाही धमकीचे फोन यायला लागलेत. त्यामुळे अशा व्यक्तींवर योग्य ती कारवाई करून बंदोबस्त करणे गरजेचे झाले आहे.