Nagpur Crime : अपघातातील आरोपी असल्याची धमकी, पाच लाखांची खंडणी मागितली, नागपुरात कुटुंबीयांच्या मदतीने आरोपी गजाआड

घरच्यांनी त्याच्या पदाविषयी विचारलं असता त्याने मी सीबीआय अधिकारी आहे, असं सांगितलं. मात्र घरच्यांना संशय आला. तेवढ्यामध्ये त्यांचा संशय दूर करण्यासाठी त्याने आपल्या दुसऱ्या सहकाऱ्याला फोन केला. हे तपासात सहकार्य करत नाही, असं सांगितलं.

Nagpur Crime : अपघातातील आरोपी असल्याची धमकी, पाच लाखांची खंडणी मागितली, नागपुरात कुटुंबीयांच्या मदतीने आरोपी गजाआड
नागपुरात कुटुंबीयांच्या मदतीने आरोपी गजाआड
Follow us
| Updated on: Aug 19, 2022 | 6:58 PM

नागपूर : तुमच्या घरचा व्यक्ती हा अपघातातील आरोपी आहे. त्याला लवकरच अटक होणार आहे. अटक टाळायची असेल, तर पाच लाख रुपयांची खंडणी द्यावी लागेल. आम्ही त्याला त्यातून सुखरूप बाहेर काढू. आम्ही सीबीआयचे (CBI) अधिकारी आहोत. आम्हाला सहकार्य केलं नाही, तर महागात जाल, अशी धमकी घरी येऊन देण्यात आली. त्यामुळं अश्विन शंभरकरला (Ashwin) वाचवायचं असेल, तर मला म्हणजे उज्ज्वल देवतळेला (Ujjwal Devtale) खंडणी द्यावी लागेल. हे सर्व ऐकूण शंभरकर कुटुंबीयांना संशय आला. उज्ज्वलनं दुसऱ्या सहकाऱ्याला फोन केला. घरचे लोकं सहकार्य करत नसल्याचं सांगितलं. त्यामुळं तोही शंभरकर कुटुंबीयांच्या घरी आला. पण, शंभरकर कुटुंबीय हुशार निघाले. त्यांनी उज्ज्वल देवतळेला एका खोली डांबून ठेवले. पोलीस पोहचले. दोघांचंही बिंग फुटलं. ते तोतडे निघाले. सीबीआय अधिकारी असल्याच्या नावावर लुबाडणूक करणार होते. पण, पोलिसांनी त्यांना आता जेलची हवा खायला लावली.

नेमकं काय घडलं

नागपूरच्या मानकापूर पोलीस स्टेशन हद्दीत काही दिवसांपूर्वी एक अपघात झाला होता. त्या अपघातात अश्विन शंभरकर याचं नाव आहे. तो या प्रकरणात फसला आहे. हे सांगण्यासाठी उज्वल देवतळे नावाचा इसम शंभरकर कुटुंबीयांच्या घरी गेला. अश्विनला या प्रकरणातून वाचवायचा असेल तर पाच लाख रुपये द्यावे लागतील, अशी मागणी केली. मात्र घरच्यांनी त्याच्या पदाविषयी विचारलं असता त्याने मी सीबीआय अधिकारी आहे, असं सांगितलं. मात्र घरच्यांना संशय आला. तेवढ्यामध्ये त्यांचा संशय दूर करण्यासाठी त्याने आपल्या दुसऱ्या सहकाऱ्याला फोन केला. हे तपासात सहकार्य करत नाही, असं सांगितलं. मात्र शंभरकर कुटुंबीयांचा संशय अधिक बळावला. त्यांनी आरोपीला एका खोलीमध्ये बंद केलं. पोलिसांना याची माहिती दिली. पोलीस पोहचण्याआधी देवताळेचा दुसरा सहकारी प्रकरण मिटवण्यासाठी त्या ठिकाणी पोहोचला. मात्र तोपर्यंत कपिल नगर पोलीस शंभरकर कुटुंबीयांच्या घरापर्यंत पोहोचले. दोन्ही तोतया सीबीआय अधिकाऱ्यांना अटक केली. अशी माहिती कपिल नगर ठाण्येच पोलीस निरीक्षक वैभव देशमुख यांनी दिली.

खंडणी मागणारे निघाले तोतये

नागपूरच्या कपिल नगर पोलीस स्टेशनमध्ये अपघात प्रकरणात धमकी देत पाच लाखाची लाच मागितली होती. याप्रकरणी दोन तोतया सीबीआय अधिकाऱ्याला परिवारातील सदस्याच्या मदतीने अटक करण्यात पोलिसांना यश आलं. तोतयांनी रचलेला डाव फसला. दोघांनाही आता जेलची हवा खावी लागणार आहे.

हे सुद्धा वाचा

Non Stop LIVE Update
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला.
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ.