लहान मुलांना सोडून पोटापाण्यासाठी नागपुरात आले, नियतीने घेतला दाम्पत्याचा असा बळी

मनीषनगर येथील गुरुछाया सोसायटीतील सांझविला येथे ते मजुरीचे काम करायचे. राहण्यासाठी ठेकेदाराने त्यांना टिनाच्या झोपडीची व्यवस्था करून दिली होती.

लहान मुलांना सोडून पोटापाण्यासाठी नागपुरात आले, नियतीने घेतला दाम्पत्याचा असा बळी
Follow us
| Updated on: Apr 22, 2023 | 2:39 PM

नागपूर : नागपूर हे उपराजधानीचे शहर. आजूबाजूच्या गावातील लोकं येथे रोजगारासाठी येतात. बालाघाट, शिवणी, भंडारा, गोंदिया या जिल्ह्यातून काही लोकं कोणत्या ना कोणत्या कामानिमित्त नागपूर गाठतात. नागपूर हे जवळ असलेले रोजगाराचे हमखास शहर. पण, आता नागपूर शहराची लोकसंख्या वाढत आहे. त्यामुळे बाहेरून आलेल्या लोकांची तात्पुरती व्यवस्था केली जाते. पण, वादळ वाऱ्यात अशा झोपड्या निस्तनाबूत होतात. त्यात नुकसान होण्याची शक्यता मोठी असते. गुरुवारी आलेल्या वादळात टिनाचे शेड पडून दाम्पत्याचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली.

टिनाचे शेड पडून दोघांचा मृत्यू

छत्तीसगड येथील गौरीलाल पटेल (वय ३२) आणि त्यांची पत्नी रामला गौरीलाल पटेल (वय ३१) हे दोघेही नागपुरात मजुरीच्या कामासाठी आले. ते बलोदा बाजार येथील सोलदा गावचे रहिवासी. मनीषनगर येथील गुरुछाया सोसायटीतील सांझविला येथे ते मजुरीचे काम करायचे. राहण्यासाठी ठेकेदाराने त्यांना टिनाच्या झोपडीची व्यवस्था करून दिली होती.

हे सुद्धा वाचा

टिनाचे शेड डोक्यावर पडल्याने मृत्यू

टिनाच्या झोपडीतील टीन वादळवाऱ्यात उडाले. त्यानंतर ते झोपडीत पडले. यावेळी दोघेही पती-पत्नी यांच्या डोक्यावर ते टीन पडले. यांत ते गंभीर जखमी झाले. त्यांनी एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केले.

दोन्ही मुले झाली पोरकी

पटेल दाम्पत्याने काम करून घरी मुलांच्या पालनपोषणासाठी पैसे पाठवण्याचे ठरवले होते. गावातच दोन्ही मुलांना ठेवले होते. एक तीन वर्षांचा तर दुसरा पाच वर्षांचा अशा लहान मुलांना गावी ठेवून ते पोट भरण्यासाठी नागपूरला आले होते.

पण, निसर्गाच्या तांडवात होत्याचे नव्हते झाले. या दोघांचाही मृत्यू झाला. त्यामुळे दोन्ही लहान मुले पोरकी झालीत. पटेल यांच्या कुटुंबीयांचे आता पालनपोषण कोण करणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

घटनेनंतर बेलतरोडी पोलीस ठाण्याचे निरीक्षक अनिल मेश्राम घटनास्थळी पोहचले. पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली. या भागात बांधकाम सुरू आहेत. मजूर टिनाच्या झोपड्यांमध्ये राहतात. गुरुवारी आलेल्या वादळी पावसाने अनेकांच्या घराचे छत उडाले.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.