Nagpur Mihan | मिहानमध्ये तारांकित हॉटेलची होणार उभारणी; रोजगार निर्मितीला कशी मिळेल चालना?

वर्धा रोडवर अनेक टॉऊनशीप प्रकल्प उभारण्यात येत आहेत. या साऱ्यांमुळे परिसरात असलेली तारांकित हॉटेलची गरज पूर्ण होण्यास मदत होणार आहे, असेही कपूर यांनी म्हटले आहे.

Nagpur Mihan | मिहानमध्ये तारांकित हॉटेलची होणार उभारणी; रोजगार निर्मितीला कशी मिळेल चालना?
मिहानचे प्रातिनिधीक छायाचित्र.
Follow us
| Updated on: Jan 31, 2022 | 4:19 AM

नागपूर : महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीने (एमएडीसी) (Maharashtra Airport Development Company) मिहान अधिसूचित क्षेत्राच्या विशेष आर्थिक क्षेत्राबाहेर (एसईझेड) तारांकित हॉटेल उभारणी लवकरच होणार आहे. नागपूरच्या इंडिया सफारी ॲन्ड कॅम्पस प्रा. लि. या कंपनीला 6.79 एकर भूखंडाचे वाटप (Allocation of plots) केले आहे. या उपक्रमामुळे नागपूर परिसरात मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक होणे अपेक्षित आहे. विदर्भातील रोजगार निर्मितीलाही मोठ्या प्रमाणात चालना मिळणार आहे. मिहान अधिसूचित क्षेत्राच्या विशेष आर्थिक क्षेत्राबाहेरील सेक्टर 22 मध्ये 27 हजार 490 चौ. मी. (6.79 एकर) क्षेत्रफळाच्या या भूखंडासाठी एमएडीसीने निविदा प्रक्रिया राबविली होती. त्यास अतिशय उत्तम प्रतिसाद मिळाला. कंपनी सेक्रेटरी (Company Secretary) विभागाकडून कायदेशीर सल्ला घेतल्यानंतर प्रथम क्रमांकाच्या निविदाधारक इंडिया सफारी ॲन्ड कॅम्पस प्रा. लि. यांना हे वितरण मंजूर करण्यात आले.

हॉटेल उद्योगातील संस्थेला भूखंड

एमएडीसीचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक दीपक कपूर यांनी या वितरणास मंजुरी दिली आहे. याबाबचे स्वीकृती पत्रही या कंपनीला पाठविण्यात आले आहे. या भूखंडासाठी सहा हजार 325 रुपये प्रती चौ.मी. एवढी राखीव किंमत निश्चित करण्यात आली होती. मात्र, इंडिया सफारी ॲन्ड कॅम्पस प्रा. लि. कंपनीने 7 हजार 99 रुपये प्रती चौ. मी. इतके दराने बोली लावली होती. दुसरी बोली आभा हॉस्पिटॅलिटी प्रा. लि.ने 6 हजार 335 रुपये प्रती चौ. मी. या दराने बोली लावली होती. या भूखंडासाठी जवळपास 20 कोटी रुपये मूल्य आकारणी झाली आहे. गेल्या काही महिन्यांत एमएडीसीकडून आयटी क्षेत्रातील पर्सिस्टंट टेक्नॉलॉजीस, एव्हिएशन क्षेत्रातील कल्पना सरोज एव्हिएशन, कृषी क्षेत्रातील कॉसग्रो ॲग्रो, आरोग्य क्षेत्रातील अंजली लॉजिस्टीक आणि आता इंडिया सफारी ॲन्ड कॅम्पस या हॉटेल उद्योगातील संस्थेला भूखंड देण्यात आला आहे.

टॉऊनशीप प्रकल्प उभारण्यात येतोय

या संपूर्ण कार्यवाहीमुळे या भागात मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक होणार आहे. कोविड महामारीमुळे उद्भवलेल्या निराशाजनक परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर उत्साहाचे आशादायी वातावरण निर्माण झाले आहे. मिहान प्रकल्पाबाबत सकारात्मकता निर्माण करण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न सुरु असल्याचे दीपक कपूर यांनी म्हटले आहे. मिहान परिसरात अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था (एम्स) 150 एकर जागेवर कार्यरत झाली आहे. तिचा फायदा विदर्भासह मध्यप्रदेश व छत्तीसगढ येथील नागरिकांना होत आहे. या प्रकल्पात टीसीएस, एचसीएल, इन्फोसीस, टेक महिन्द्रा, लुपिन, डीआरएएल, इंडमार, टीएएसएल, फर्स्ट सिटी, एफएससी, टीसीआय, कॉनकॉर, महिन्द्रा ब्लूमडेल, मोराज वॉटरफॉल आदी कंपन्या प्रामुख्याने आहेत.

Photo | केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी केले आमदार विजय रहांगडाले यांचे सांत्वन; आविष्कार रहांगडाले यांचा अपघाती झाला होता मृत्यू

Photo | केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी केले आमदार विजय रहांगडाले यांचे सांत्वन; आविष्कार रहांगडाले यांचा अपघाती झाला होता मृत्यू

नागपुरात कचरा संकलनात अनियमितता; ए. जी. एन्व्हायरो व बीव्हीजी कंपन्यांवर काय कारवाई करणार?

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.