विदर्भात शाळेचा पहिला दिवस; विद्यार्थ्यांचे असे करण्यात आले जोरदार स्वागत

नागपुरातील शाळांना आजपासून सुरुवात झाली. शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांचं स्वागत करण्यात आलं. विद्यार्थ्यांना पुस्तकं आणि गणवेश वितरित करण्यात आले.

विदर्भात शाळेचा पहिला दिवस; विद्यार्थ्यांचे असे करण्यात आले जोरदार स्वागत
नागपूर मनपाच्या दुर्गानगर माध्यमिक शाळेत विद्यार्थ्याचे स्वागत करताना.
Follow us
| Updated on: Jun 30, 2023 | 6:52 PM

नागपूर : तब्बल दोन महिन्यांच्या सुट्यानंतर आजपासून विदर्भातील शाळांना सुरुवात झाली. विद्यार्थ्यांच्या मनात शाळेत येण्याची हुरहूर होती. आनंददायी शिक्षणातून शिक्षणाविषयी गोडी निर्माण व्हावी, नागपूर मनपाने प्रवेशोत्सव साजरा केला. नागपूर महापालिकेच्या १३५ शाळांमध्ये शाळेचा पहिला दिवस प्रवेशोत्सव म्हणून साजरा करण्यात आला. शिक्षकांनी गुलाब पुष्प वर्षाव करीत विद्यार्थ्यांचे स्वागत केले. तसेच विद्यार्थ्यांना गणवेश, पाठ्यपुस्तक आणि शालेय साहित्याचे वितरण करण्यात आले.

यांची होती उपस्थिती

प्रवेशोत्सवाचा मुख्य कार्यक्रम देवनगर परिसरातील विवेकानंद नगर हिंदी उच्च प्राथमिक आणि माध्यमिक शाळेत आयोजित करण्यात आला. कार्यक्रमात नागपूर महापालिकेचे शिक्षणाधिकारी राजेंद्र पुसेकर, उपशिक्षणाधिकारी सुभाष उपासे, लक्ष्मीनगर झोनच्या शाळा निरीक्षक अश्विनी फेट्टेवार, विवेकानंदनगर हिंदी उच्च प्राथमिक आणि माध्यमिक शाळेचे मुख्याध्यापक राजकुमार बोबाटे उपस्थित होते.

गणवेश, शालेय साहित्याचे वितरण

वर्गात प्रवेश करताना विद्यार्थ्यांवर गुलाब पुष्पचा वर्षाव करण्यात आला. याशिवाय शाळेच्या पहिल्या दिवशी इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तक आणि गणवेश देण्यात आले. पहिल्या दिवसापासूनच विद्यार्थ्यांना पोषण आहार देण्यात आला. गणवेश आणि शालेय साहित्य मिळाल्याने विद्यार्थ्यांनी आनंद व्यक्त केला.

nmc 1 n

वर्धा येथे विद्यार्थ्यांचे जोरदार स्वागत

वर्धा जिल्ह्यातील शाळा आजपासून सुरू झाल्यात. विद्यार्थ्यांच्या किलबिलाटानं शाळांचा परिसर गजबजला. जिल्ह्यातील सर्व जिल्हा परिषद, नगरपालिका, खासगी अनुदानित, विना अनुदानित, कायम विनाअनुदानित आणि स्वयंअर्थसहाय्यित शाळा सुरु झाल्या. १ हजार ४७९ शाळांमध्ये २ लाखावर विद्यार्थी आहेत. शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांच शाळांकडून जोरदार स्वागत करण्यात आलं. काही शाळांमध्ये सजावट करण्यात आली होती.

गोंदिया जिल्ह्यातील शाळांत पुस्तकांचे वितरण

गोंदिया जिल्ह्यातील शाळांना आज सुरुवात झाली. शाळेच्या पहिल्याच दिवशी नवप्रवेशित विद्यार्थ्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. गोड तोंड करून सर्व प्रवेशित विद्यार्थ्यांचे शाळेमध्ये स्वागत करण्यात आले. अनेक शाळांत आज पाठ्यपुस्तक विद्यार्थ्यांना वितरित केले असल्याचे पहावयास मिळते.

भंडारा जिल्ह्यात ग्रामीण भागात उत्साह

भंडारा जिल्ह्यातील ग्रामीण भागात प्रवेश उत्सव कार्यक्रम आयोजित करण्यात आला. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण दिसून आले. जिल्हा परिषदेच्या शाळेच्या विद्यार्थ्याचे स्वागत गावातील तरुणांनी टाळ वाजवत, फुलांचा वर्षाव करत केले. गावात प्रभातफेरी काढण्यात आली. नवीन विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर नवा डबा, नवे दप्तर, वह्या पुस्तकांची नवलाई दिसून आली.

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.