Nagpur Crime | फाटलेले कपडे, विखुरलेले केस, काट्यागोट्यांमधून जाणे-येणे; ये देखो मेरी लाइफ…, गुंडाचा भावनिक व्हिडीओ व्हायरल

या व्हिडीओतून त्याने भावनिक साददेखील घातलेली आहे. व्हिडीओत त्याची स्थिती बिकट दिसून येत आहे.

Nagpur Crime | फाटलेले कपडे, विखुरलेले केस, काट्यागोट्यांमधून जाणे-येणे; ये देखो मेरी लाइफ..., गुंडाचा भावनिक व्हिडीओ व्हायरल
भावनिक साद घालणारा आरोपी
Follow us
| Updated on: Dec 25, 2021 | 10:35 AM

नागपूर : चित्रात दिसणारा हा आहे सय्यद आसिफ सय्यद निजाम. त्याच्यावर अर्धा डझनहून अधिक गुन्हे दाखल आहेत. एका प्रकरणात सय्यद पळून गेला. त्यानंतर त्याची भयावह परिस्थिती झाली. फाटलेले कपडे, विखुरलेले केस, काट्यागोट्यांमधून जाणे-येणे यामुळं त्याची दैनावस्था झाली. तीच दैनावस्था त्यानं व्हिडिओच्या माध्यमातून मांडली आहे. 16 सेकंदांचा हा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

अटकेपासून वाचण्यासाठी पळाला

या व्हिडीओत सय्यदनं स्वत:चं जीवन कमजोर असल्याचं सांगितलंय. पळून गेल्यानंतर अटकेपासून वाचण्यासाठी तो एका शेतात लपला. केस वाढलेले असून अंगावर मळकट कपडे दिसतात. पोलिसांच्या हाती लागू नये म्हणून त्याला झाडाझुडपातून फिरावे लागत आहे. केस विखुरलेले आहेत. खाण्यापिण्याचे वांदे झाले आहेत. पोलिसांपासून कसा बचाव करायचा, असा प्रश्न त्याला पडला आहे. स्वतःची बिकट परिस्थिती त्यानं या व्हिडीओच्या माध्यमातून दाखविली आहे.

पोलीस लागले शोधाला…

सोशल मीडियावर नियमित अनेक व्हिडीओ पोस्ट होत असतात. यातील अनेक व्हिडीओ व्हायरल होतात. आता याच सोशल मीडियाचा वापर करीत फरार असलेल्या एका आरोपीने फरारीवर असताना त्याची झालेल्या दैनावस्थेचा व्हिडीओ पोस्ट केला आहे. त्याचा हा व्हिडीओ व्हायरल झालाय. पोलिस त्याच्या शोधकामी लागली आहे.

सय्यदवर गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल

सय्यद हा यशोधरानगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत राहतो. त्याच्यावर अनेक गंभीर स्वरूपाचे गुन्हे आहेत. परिणामी, पोलिस त्याचा शोध घेत आहेत. सतत फरारीवर असल्यामुळे त्याची दैनावस्था झालेली आहे. हीच दैनावस्था त्याने या व्हिडीओतून व्यक्त केली आहे. या व्हिडीओतून त्याने भावनिक साददेखील घातलेली आहे. व्हिडीओत त्याची स्थिती बिकट दिसून येत आहे.

NMC Scam | स्टेशनरी घोटाळा : साकोरे कुटुंबीयांना 40 वर्षांपासून कंत्राट; पाच नव्हे सात कंपन्या!

Nagpur Crime | जीवन नकोसे झाले! विष घेऊन गळफास; 20 दिवस व्हेंटिलेटवर तरीही तुटली नाही आयुष्याची दोरी

Nagpur | सामूहिक बलात्कार प्रकरण : अडीच महिन्यांपासून आरोपी फरार; कसे आले पोलिसांच्या जाळ्यात?

गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्...
गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्....
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर.
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा.
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्.
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त.
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य.
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?.
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा.
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार.
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'.