Video Nagpur | समृद्धी महामार्गावरून टीव्ही 9 मराठीची टेस्ट ड्राईव्ह; पहिल्या टप्प्याचं लोकार्पण लवकरच

पहिल्या टप्प्यात नागपूर, वर्धा, अमरावती (Amravati), अकोला, वाशिम जिल्ह्यातील महामार्गाची होणार सुरुवात आहे. महाराष्ट्राला खऱ्या अर्थाने समृद्धी देणारा हा महामार्ग आहे. देशातील सर्वात मोठा समृद्धी महामार्ग नेमका कसा आहे? याची टेस्ट ड्राईव्ह केली आहे गजानन उमाटे यांनी.

Video Nagpur | समृद्धी महामार्गावरून टीव्ही 9 मराठीची टेस्ट ड्राईव्ह; पहिल्या टप्प्याचं लोकार्पण लवकरच
समृद्धी महामार्गावरून टीव्ही 9 मराठीची टेस्ट ड्राईव्हImage Credit source: tv 9
Follow us
| Updated on: Apr 22, 2022 | 11:47 AM

नागपूर : 2 मे रोजी समृद्धी महामार्गाचं (Samrudhi Highway) मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. नागपूर- मुंबई 710 किलोमीटरचा हा महामार्ग आहे. नागपूर-वाशिम (Nagpur-Washim) 210 किलोमीटरचा पहिला टप्पा दोन तारखेला सुरु होतोय. पहिल्या टप्प्यात नागपूर, वर्धा, अमरावती (Amravati), अकोला, वाशिम जिल्ह्यातील महामार्गाची होणार सुरुवात आहे. महाराष्ट्राला खऱ्या अर्थाने समृद्धी देणारा हा महामार्ग आहे. देशातील सर्वात मोठा समृद्धी महामार्ग नेमका कसा आहे? याची टेस्ट ड्राईव्ह केली आहे. गजानन उमाटे यांनी. या विभागाचे मंत्री एकनाथ शिंदे यांनी या महामार्गाचे नियोजन केले आहे. रस्त्याच्या आजूबाजूनं इंडस्ट्रीयल कॉरिडोर (Industrial Corridor) उघडला जाणार आहे. अनेक गाव या महामार्गाशी जुळलेली आहेत. तरुणांच्या हाताला काम मिळणार आहे. रोजगार मिळेल, या उद्देशानं हा महामार्ग बनविला गेला आहे. हे सर्व विकासचं प्रतीक असल्यानं या महामार्गाचं नाव समृद्धी महामार्ग असं ठेवण्यात आलंय.

पहिल्या टप्प्यात विदर्भातील पाच जिल्हे

दोन मे रोजी समृद्धी महामार्गाचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. देशातील सर्वात मोठा समृद्धी महामार्ग नेमका कसा आहे? 710 किमीचा महामार्ग, नागपूर-मुंबई केवळ सात तासांत प्रवास होणार आहे. पहिल्या टप्प्यात 210 किमी नागपूर ते सेलू बाजार महामार्ग सुरू होणार आहे. सहा लेनचा महामार्ग, 10 जिल्हे, 27 तालुके आणि 292 गावातून जाणार आहे. पहिल्या टप्प्यात नागपूर, वर्धा, अमरावती, अकोला, वाशिम जिल्ह्यातील महामार्गाची सुरुवात होणार आहे. वन्य प्राण्यांसाठी अंडरपास आणि ओव्हरपासची सोय करण्यात आली आहे.

मुंबईतील बाजारपेठ विदर्भासाठी खुली होणार

मुंबई-नागपूर महामार्गावर 26 टोलनाके असणार आहेत. या महामार्गावरून 150 किलोमीटर अंतर एका तासात कापले जाऊ शकते. पण, 120 प्रतितास अंतर कापण्यास परवानगी देण्यात आली आहे. पहिला टप्पा नागपूर ते सेलूबाजार वाशिम जिल्हा असा राहणार आहे. या महामार्गावर 11 लाखांपेक्षा जास्त झाडं लावली जाणार आहेत. हिरवळ आणि पर्यावणाचं संतुलन राखले जाणार आहे. नागपूर हे देशाचं मध्यवर्ती केंद्र आहे. दूध, भाजीपाला तसेच इतर उत्पादन मुंबईला कस जाईल, यासाठी हा महामार्ग तयार करण्यात आला आहे. या महामार्गामुळं मुंबईतील बाजारपेठ विदर्भातील शेतकऱ्यांसाठी खुली होणाराय.

पाहा व्हिडीओ

Video Samrudhi Highway | समृद्धी महामार्गाची एकनाथ शिंदे आज पाहणी करणार, 2 मे रोजी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण

Saamana : मास्क पुन्हा अनिवार्य होणार! शिवसेनेकडून सामना अग्रलेखाच्या माध्यमातून थेट संकेत

power outage : विजेची उधळपट्टी होऊ नको, वापराबाबत सर्वांनी काळजी घ्या: मुख्यमंत्र्यांचे आवाहन

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.