विदर्भातील भाजपचे दोन माजी आमदार BRS च्या गळाला, के. चंद्रशेखर राव यांच्या उपस्थितीत शक्तिप्रदर्शन
भाजपचा गड असलेल्या विदर्भात आज तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांनी नागपुरात शक्तीप्रदर्शन केलं. भाजपचे माजी आमदार चरण वाघमारे, राजू तोडसाम, माजी अपक्ष आमदार दिपक आत्राम, बीआरएसच्या गळाला लागलेय.
गजानन उमाटे, प्रतिनिधी, नागपूर : देशात आणखी १०-१५ राज्य बनले तर काय जाणार. आणखी राज्य झाले तर विदर्भही वेगळा होईल आणि विकास होईल. पंतप्रधान मोदी आमचे चांगले मित्र आहे. राज्याच्या विकासाबाबत आमच्या बैठका होतात. येत्या काळात आम्ही महाराष्ट्रातील सर्व निवडणुका लढवणार. सर्व जागा लढवणार आम्ही आमचा बेस बनवणार आहोत. जगभरात सरकारच्या मदतीशिवाय शक्य नाही. भारतात सर्वाधिक कमी सबसीडी दिली जात असल्याचा आरोप तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी केला.
भाजपचा गड असलेल्या विदर्भात आज तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांनी नागपुरात शक्तीप्रदर्शन केलं. भाजपचे माजी आमदार चरण वाघमारे, राजू तोडसाम, माजी अपक्ष आमदार दिपक आत्राम, बीआरएसच्या गळाला लागलेय. शेतकऱ्यांच्या हितासाठी आम्ही बीआरएसमध्ये जातोय. आगामी विधानसभा निवडणुका लढणार. असा निर्धार या माजी आमदारांनी केलाय. आगामी महानगरपालिका, विधानसभा, लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर BRS ची विदर्भात जुळवाजुळव सुरु आहे. अब की बार किसान सरकार, असं म्हणत शहरात सर्वत्र केसीआर राव यांचे होर्डिंग्ज लागले होते. नागपूर विमानतळावर बीआरएसच्या कार्यकर्त्यांनी गर्दी केलीय.
तेलंगनाच्या भारत राष्ट्र समिती या पक्षाने आता राज्यातील जनतेपर्यंत पोहोचण्यास सुरुवात केली आहे. आगामी विधानसभा आणि लोकसभेच्या निवडणुका पूर्वी बीआरएस या पक्षाने राज्यात मोठ्या प्रमाणात होर्डिंग बाजी सुरू केली आहे. जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी बीआरएसने तीर्थक्षेत्र आपल्या केंद्रस्थानी ठेवल्याचं दिसत आहे.
राज्यातील मोठ- मोठ्या तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी बीआरएसने मोठ्या प्रमाणात होर्डिंग बाजी सुरू केली आहे. राज्यातील एक मोठ तीर्थक्षेत्र असलेले शेगाव या ठिकाणी अनेक मार्गावर भारत राष्ट्र समिती पक्षाने मोठे मोठे होर्डिंग लावलेले आहेत. त्यामुळे राज्यभरातून आलेले भाविक या होर्डिंगकडे आकर्षित होत आहेत.
तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या भारत राष्ट्र समिती (बीआरएस) या पक्षाचे पोस्टर सांगली शहरातील अनेक भागात लावलेले दिसून आले. सांगली शहरातील अनेक भागांमध्ये जवळपास बीआरएस पक्षाकडून मेरा वोट मेरी सरकार, अबकी बार किसान सरकार या आशयाचे स्लोगन छापून पोस्टरबाजी करण्यात आली आहे.
सांगली शहरात पोस्टरबाजी करण्याबरोबरच महाराष्ट्रातील आगामी लोकसभा आणि विधानसभा लक्षात घेऊन करण्यात आली. सांगली जिल्ह्यातील काही माजी आमदार आपल्या पक्षात येतात का, याची देखील चाचपणी बीआरएस पक्षाकडून करण्यात येत असल्याची माहिती आहे.