रात्री ते दोघे झोपले ते सकाळी उठलेच नाहीत, नातेवाईक भेटायला आले तेव्हा…
सकाळी रजत आणि अमनचे नातेवाईक त्यांना भेटायला आले. तेव्हा दोघांचेही मृतदेह त्यांच्या खोलीत सापडले.
नागपूर : रजत आणि अमन तिवारी हे दोन तरुण. मूळचे मध्य प्रदेशातील. कामाच्या शोधात नागपुरात आले. रूम भाड्याने घेतली. प्लेक्स तयार करण्याचे काम ते करायचे. काल ते रात्री झोपी गेले. पण, ही झोप शेवटची ठरेल, याची त्यांनी कल्पना नव्हती. अचाकन शार्ट सर्किट झालं. खोलीतून धूर निघाला. या धुरात श्वास कोंडल्याने दोघांचाही मृत्यू झाला असावा, असा अंदाज आता व्यक्त करण्यात येत आहे. सकाळी रजत आणि अमनचे नातेवाईक त्यांना भेटायला आले. तेव्हा दोघांचेही मृतदेह त्यांच्या खोलीत सापडले.
दोन मजुरांचा मृत्यू
नागपूरच्या इमामवाडा परिसरात एका घराच्या खोलीला आग लागली. आग विझविण्यात यश आलं. मात्र धुरात गुदमरून दोघांचा मृत्यू झाला. पोलीस घटनास्थळी दाखल झालेत. शॉट सर्किटमुळे आग लागल्यानंतर निघालेल्या धुरात गुदमरून दोन मजुरांचा मृत्यू झाला.
इमामवाडा पोलीस हद्दीतील घटना
नागपूरच्या इमामवाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आनंद पब्लीक स्कुलच्या बाजूला असलेल्या रूममधील ही घटना आहे. मृतक आकाश रजत आणि अमान तिवारी हे पब्लिक स्कूलच्या बाजूला एका खोलीत राहत होते. ते दोघेही मध्येप्रदेशमधील रहिवासी आहेत. कामानिमित्त ते नागपूरला आले होते. ते दोघेही फ्लेक्सची कामं करायचे.
अशी आली घटना उघडकीस
रूममध्ये असलेला इलेक्ट्रिक बोर्ड पूर्णपणे जळून खाक झाला. मृतकाचे परिचित त्यांना भेटण्यासाठी आले असता घटना उघडकीस आली. आग लागली तेव्हा ते गाढ झोपेत असावे. धुरामुळे मृत्यू झाला असल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. पुढील तपास सुरू आहे
सहा दिवसांपूर्वी हिंगणा एमआयडीत एका अॅग्रो कंपनीला आग लागली होती. या आगीत चार कामगारांचा धुरामुळेच गुदमरून मृत्यू झाला होता. ही घटना ताजी असताना आता इमामवाडा पोलीस हद्दीत ही दुर्घटना घडली. अचानक आग लागून दोन मजुरांचा मृत्यू झाला. पोटासाठी नागपुरात आलेल्या या तरुणांचा असा शेवट झाला. कालची रात्र शेवटची ठरेल, याची कल्पनाही त्यांनी केली नसेल.