उद्धव ठाकरे यांनी पोहरादेवीची शपथ घेताच मुनगंटीवारांकडून पवार-ठाकरेंच्या 2019 च्या गुप्त भेटीबाबत मोठा गौप्यस्फोट!

भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी 2019 मध्ये विधानसभेच्या निकालाआधी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि उद्धल ठाकरे यांच्यामध्ये झालेल्या गुप्त बैठकीबाबत सर्वात मोठा गौप्यस्फोट केला आहे.  

उद्धव ठाकरे यांनी पोहरादेवीची शपथ घेताच मुनगंटीवारांकडून पवार-ठाकरेंच्या 2019 च्या गुप्त भेटीबाबत मोठा गौप्यस्फोट!
Follow us
| Updated on: Jul 09, 2023 | 7:50 PM

नागपूर :  ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे दोन दिवसाच्या विदर्भ दौऱ्यावर आहेत. यवतमाळमध्ये उद्धव ठाकरेंनी बोलताना परत एकदा भाजप नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी अडीच वर्षे मुख्यमंत्रिपद देण्याचा शब्द दिल्याचं सांगितलं. इतकंच नाहीतर उद्धव ठाकरे यांनी वंजारा समाजाचं श्रद्धास्थान असलेल्या पोहरादेवीची शपथ घेत शहांनी आपल्याला शब्द दिल्याचा पुर्नउच्चार केला. यावर भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी 2019 मध्ये विधानसभेच्या निकालाआधी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये झालेल्या गुप्त बैठकीबाबत सर्वात मोठा गौप्यस्फोट केला आहे.

सुधीर मुनगंटीवार काय म्हणाले?

जेवढ्या जाहीर सभा व्हायच्या त्या सभेचे व्हिडीओ आताही उपलब्ध आहेत. विश्वगौरव नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वातच निवडणुका होतील आणि फडणवीसच मुख्यमंत्री होतील असं एकदा नाहीतर शंभरवेळा सांगितलं. उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांची  निवडणूक निकाल लागण्याआधी एकमेकांशी चर्चा झाली. त्यामध्ये पवारांनी त्यांना सांगितलं, भाजपचे 130 पेक्षा जास्त आमदार आले तर तुमचं महत्त्व राहत नाही. मात्र कमी आमदार आले तर तुम्ही भाजपला ब्लॅकमेल करा आणि त्याचाच फायदा ठाकरेंनी घेतल्याचं सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितलं.

विधानसभा निवडणूकीचा निकाल लागल्यावर त्यांना लक्षात आलं की भाजपला 130 जागा काही मिळत नाहीत मग ठाकरेंनी कपोकल्पित कथा केल्या, अमित शहांनी सांगितलं की आम्ही कोणताही शब्द दिला नाही. ज्या ठिकाणी आम्ही आधी शब्द दिला तिथे आम्ही मान्य करतो. मात्र मुख्यमंत्रिपदाचा कोणताही शब्द उद्धव ठाकरेंना दिलेला नव्हता. उद्धव ठाकरेंचं मन अस्थिर आणि चंचल आहे म्हणून ज्यांनी 35 वर्षे रक्ताचं पाणी केलं ते नेते निघून गेले याचं कारण भाजप दोषी नसून तुमचा स्वभाव दोषी असल्याचं म्हणत सुधीर मुनगंटीवार उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला.

दरम्यान, उद्धव ठाकरे यांनी यवतमाळमधील संजय राठोड यांच्या मतदारसंघात सभा घेत शक्ती प्रदर्शन केलं. यावेळी बोलताना त्यांनी भाजपवर जहरी टीका केली. भाजपला ठाकरे नको आणि शिवसेना हवी असून आता भाजप बाजार बुनग्यांचा पक्ष झाल्याचं ठाकरे म्हणाले.

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.