आर्यन खानला जामीन, NCB ला आता काय करावं लागेल? तपास अधिकाऱ्यांनी काय काळजी घ्यावी, उज्वल निकम म्हणाले…

देशात अनेक प्रश्न असताना देखील या प्रश्नाला एवढं महत्व दिलं जाणं, या देशाचा नागरिक या नात्याने मला निश्चित दुःख होत आहे, असं ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ उज्वल निकम म्हणाले आहेत.

आर्यन खानला जामीन, NCB ला आता काय करावं लागेल? तपास अधिकाऱ्यांनी काय काळजी घ्यावी, उज्वल निकम म्हणाले...
उज्वल निकम
Follow us
| Updated on: Oct 29, 2021 | 6:46 PM

नागपूर : आर्यन खानला जामीन मिळेल की नाही याविषयी गेल्या तीन आठवड्यांपासून काहूर उठलेलं होतं. ते काहूर बघितल्यानंतर प्रत्येक भारतीयाच्या मनात एक शंका येत होती, की देशापुढे हाच एक महत्वाचा प्रश्न उरला आहे का? देशात अनेक प्रश्न असताना देखील या प्रश्नाला एवढं महत्व दिलं जाणं, या देशाचा नागरिक या नात्याने मला निश्चित दुःख होत आहे, असं ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ उज्वल निकम म्हणाले आहेत. आर्यन खानला जामीन मंजूर झाला आहे. ड्रग्ज प्रकरणी आर्यन खानच्या विरोधात व्हॉटसअप चॅट हा पुरावा असल्यानं एनसीबीली भविष्यात होमवर्क करावं लागणार आहे, असं निकम म्हणाले.

प्रसारमाध्यमांनी दिलेली प्रसिद्धी खेदजनक

एखाद्या आरोपीला जामीन मिळणे किंवा न मिळणे त्याच्या पुराव्यावर असतं मात्र हा एका आघाडीच्या कलाकाराचा मुलगा म्हणून ज्या रीतीने प्रसारमाध्यमांकडून त्याला प्रसिद्धी दिली गेली हे अत्यंत खेदजनक आहे, असं मत निकम यांनी व्यक्त केलं.

एनसीबीला होमवर्क करावा लागेल

जामीन मिळणे किंवा न मिळणे हे त्या गुन्ह्याच्या गुणवत्तेवर अवलंबून असते. सकृद्दर्शनी पुरावा असला तर जामीन मिळत नाही आरोपीच्या सुटल्याने त्या पुराव्याची छेडछाड होऊ शकत नसेल, तरच न्यायालय जामीन देतं. आर्यन खान प्रकरणात व्हाट्सअप चॅट व्यतिरिक्त दुसरा कोणताही पुरावा नव्हता, असं भासत आहे. व्हाट्सअप इलेक्ट्रॉनिक मधला पुरावा आहे. हा सकृद्दर्शनी पुरावा होऊ शकतो सध्यातरी एनसीबीच्या हाती तीन वर्षापूर्वी चे व्हाट्सअप चॅट आहेत. त्यामुळं असं दिसून येतं त्यामुळे ब्युरोला यावर होमवर्क करावा लागणार आहे, असा सल्ला उज्वल निकम यांनी दिला.

आरोप पत्र केव्हा दाखल होईल ते पुढे माहिती होईल. मात्र तो जामिनावर सुटला म्हणजे खटल्याची विल्हेवाट लागली असं म्हणता येणार नाही. एक गोष्ट मात्र निश्चित आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या गुन्ह्याचा तपास चालू असताना गुन्ह्यातील बारकावे प्रसारमाध्यमांसमोर उघडकीला येतात ही गोष्ट तपास यंत्रणा त्यांच्या दृष्टीने शोभादायक नाही, असंही ते म्हणाले.

तपास अधिकाऱ्यांना खडे बोल

तपास अधिकारी गुन्हा दाखल झाल्यानंतर अनेक नामांकित लोकांना बोलावतात मात्र त्या तपासाचा सगळा तपशील माध्यमांसमोर कसा जातो हे महत्त्वाचे आहे. तपास यंत्रणेमार्फत तच हे सगळे तपशील पोहोचवले जातात का हाही प्रश्न आहे ही गोष्ट निश्चित चांगली नाही. मात्र, अशा गोष्टीमुळे आरोपीला फायदा मिळतो याचं भान तपास यंत्रणांनी ठेवले पाहिजे. आर्यन खान ला जामीन सशर्त मिळाला असल्यानं त्याला त्या अटीचं पालन पालन करावे लागेल, असं उज्जवल निकम म्हणाले.

इतर बातम्या:

मानवतेच्या दृष्टीनं विचार करा, वयोमर्यादा संपलेल्या विद्यार्थ्यांना 2 संधी द्या, संभाजी छत्रपतींचं उद्धव ठाकरेंना पत्र

काय सांगता? औरंगाबाद जिल्हाधिकाऱ्यांची खुर्ची जप्त होणार? कोर्टाच्या नोटिशीकडे दुर्लक्ष भोवले, जप्तीसाठी पथक दारात

Ujjwal Nikam said NCB Should Home Work in Aryan Khan Case because only WhatsApp Chat is proof against him

तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल.
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती.
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे.
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस.
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू.
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी.
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.