Nagpur  corona | नागपुरात कोव्हॅक्सिन लसीअभावी लसीकरण ठप्प, परीक्षेच्या तोंडावर विद्यार्थ्यांना कशी मिळणार लस?

नागपुरात लसीकरण बंद पडलंय. परीक्षा तोंडावर असताना विद्यार्थ्यांना लस मिळत नाही. नागपूर शहरात 95 टक्के लसीकरण केंद्रांवर लस उपलब्ध नाही. त्यामुळं लस मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांची वणवण सुरू आहे.

Nagpur  corona | नागपुरात कोव्हॅक्सिन लसीअभावी लसीकरण ठप्प, परीक्षेच्या तोंडावर विद्यार्थ्यांना कशी मिळणार लस?
प्रातिनिधिक छायाचित्र
Follow us
| Updated on: Feb 15, 2022 | 1:35 PM

नागपूर : शहरात कोव्हॅक्सिन लसीचा पुरवठा कमी झालाय. त्यामुळे शहरातील 95 टक्क्यांपेक्षा जास्त केंद्रांवर कोव्हॅक्सिनचं लसीकरण (Vaccination with covacin) ठप्प आहे. याचा सर्वाधिक फटका विद्यार्थ्यांना बसतोय. बारावी आणि दहावीची (Twelfth and tenth) परीक्षा सुरू होत आहेत. कोरोनाच्या सावटाखाली ही परीक्षा होत आहे. पण कोव्हॅक्सिन लसीचा पुरेसा साठा बऱ्याच केंद्रांवर उपलब्ध नाही. 15 ते 18 वयोगटातील मुलांचं लसीकरण ठप्प झालंय. मुलांना लसीसाठी फिरावं लागतंय. अस असलं तरी विद्यार्थी परीक्षेपासून (Student exams) वंचित राहणार नाही. शिक्षण मंडळानं लसीकरण झालं नसेल तरीही परीक्षा देता येईल, असं स्पष्ट केलंय. त्यामुळं घाबरून जाण्याचं कारण नाही. तरीही पालकांना आपल्या पालकांचे लसीकरण झाले पाहिजे, असं वाटतं. त्यामुळं लसी उपलब्ध होणे आवश्यक आहे.

नागपुरात एकही कोरोनाबळी नाही

कोरोनाच्या दुसर्‍या लाटेने सर्वत्र हाहाकार माजविला होता. दुसऱ्या लाटेत कोरोनाबळींची संख्या रोज शंभरापलीकडे पोहोचली होती. बाधितांची संख्या सात हजारांच्या पलीकडे होती. त्यानंतर या लाटेचा प्रकोप ओसरला. डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यापासून सुरू झालेल्या तिसर्‍या लाटेने पुन्हा रुग्णसंख्येचा उच्चांक गाठला होता. कोरोना बळींचीही संख्या वाढली होती. त्यामुळं प्रशासनही चिंतेत होते. परंतु सोमवारी जिल्ह्यात सुमारे सव्वा महिन्यानंतर एकाही कोरोनाबळीची नोंद झाली नाही.

83 बाधित, तर 2 हजार 409 जण बरे झाले

गेल्या चोवीस तासात नव्याने फक्त 183 कोरोना बाधितांची भर पडली. याचदरम्यान 2 हजार 409 जण ठणठणीत बरे झालेत. 2022च्या पहिल्याच दिवशी जिल्ह्यात तिसर्‍या लाटेतील पहिल्या कोरोनाबळींची नोंद झाली. त्यानंतर ही संख्या वाढतच गेली. जिल्ह्यात 9 जानेवारीनंतर सोमवारी सुमारे सव्वा महिन्यानंतर शून्य कोरोनाबळींची नोंद झाली. आजवर जिल्ह्यात 10 हजार 324 जणांचा कोरोनामुळे मृत्यूही झालाय. सोमवारी शहरात 3 हजार 871 व ग्रामीणमध्ये 501 अशा जिल्ह्यात 4 हजार 372 चाचण्या करण्यात आल्या. त्यापैकी फक्त 183 जणांचे अहवाल सकारात्मक आढळलेत. 3 जानेवारीनंतर सोमवारी सर्वात कमी दैनंदिन बाधितांची नोंद झाली.

Gold Price Today : सोन्याची अस्मानी झेप, वर्षातील सर्वाधिक भावाची नोंद; महिनाभर तरी कडक राहणार, कारण…

नागपूरहून शिर्डीला थेट विमान, शुक्रवारपासून फ्लाईट होणार सुरू, तासाभरात घेता येणार साईबाबांचे दर्शन

Nagpur Crime | पाच कोटी भेज दे नहीं तो उठा लुंगाँ, प्रफुल्ल गाडगे यांना दिलेल्या अपहरणाच्या धमकीने नागपुरात खळबळ

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.