Vijay Vadettiwar : चौथ्या झाडीपट्टी नाट्य संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी विजय वडेट्टीवार, ब्रम्हपुरीत 17 व 18 सप्टेंबरला आयोजन

वैदर्भीय शेतकऱ्यांचे नाटकावर फार प्रेम आहे. बऱ्याच कालावधीनंतर संमेलन होत आहे. झाडीपट्टी  नाट्य संमेलनामुळे एक वेगळं चैतन्य निर्माण झालंय.

Vijay Vadettiwar : चौथ्या झाडीपट्टी नाट्य संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी विजय वडेट्टीवार, ब्रम्हपुरीत 17 व 18 सप्टेंबरला आयोजन
ब्रम्हपुरीत 17 व 18 सप्टेंबरला आयोजन
Follow us
| Updated on: Aug 11, 2022 | 6:03 PM

नागपूर : चौथे झाडीपट्टी नाट्य संमेलन 17 व 18 सप्टेंबरला ब्रम्हपुरी येथे होणार आहे. चौथ्या झाडीपट्टी नाट्य संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी माजी मंत्री तथा ब्रह्मपुरी विधानसभेचे आमदार विजय वडेट्टीवार यांनी निमंत्रण स्वीकारले आहे. ब्रम्हपुरीत झाडीपट्टी नाट्य संमेलन यशस्वी होईल, अशी ग्वाही त्यांनी दिली. अखिल झाडीपट्टी नाट्य विकास मंडळाचे (Akhil Zadipatti Theater Development Board) व झाडीपट्टी नाट्य संमेलनाचे अध्यक्ष अभिनेते अनिरुद्ध वनकर यांनी विजय वडेट्टीवारांची भेट घेतली. यंदाच्या चौथ्या झाडीपट्टी नाट्य संमेलनाचे स्वागताध्यक्षपद स्वीकारण्याची विनंती केली. ही विनंती विजय वडेट्टीवार यांनी स्वीकारल्याची माहिती अनिरुद्ध वनकरांनी दिली. दुसरीकडे झाडीपट्टी नाट्य नाट्यसंमेलनाच्या अध्यक्षपदी (President of Natya Sammelan) अनिरुद्ध वनकर (Anirudh Vankar) यांच्यासारख्या कसलेल्या अभिनेता, गायक, लेखक, दिग्दर्शकाची व ज्यांना अनेक नाट्यमहोत्सवाचा दांडगा अनुभव आहे, अश्या व्यक्तीची निवड झाल्याने नाट्यवर्तुळातूनही आनंद व्यक्त केले गेले.

पूर्व विदर्भाचा भाग झाडीपट्टीचा

चंद्रपूर, भंडारा, गोंदिया आणि गडचिरोली या चार जिल्ह्यांचा भूभाग म्हणजे झाडीपट्टी. पूर्वी त्याला झाडीमंडळ नावाने ओळखले जायचे. या प्रदेशात बोलली जाणारी मराठी भाषेची बोली झाडीबोली या नावाने प्रचलित आहे. या भागात गेल्या 150 वर्षांपासून लोककलावंत नाटक हा कलाप्रकार सादर करत आहेत. दिवाळीनंतर शेतातील पीक हाती आले की इथल्या नाटकांना प्रारंभ होतो.

नाट्यकलावंत व रसिकांमध्ये उत्सुकता

विदर्भात शहरीकरणाचे वारे वाहू लागले असले तरी इथल्या नाट्यसंस्कृतीने आपली प्राचीन परंपरा जपली आहे. वैदर्भीय शेतकऱ्यांचे नाटकावर फार प्रेम आहे. बऱ्याच कालावधीनंतर संमेलन होत आहे. झाडीपट्टी  नाट्य संमेलनामुळे एक वेगळं चैतन्य निर्माण झालंय. नाट्यकलावंत व रसिकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे. या संमेलनामुळे देशात झाडीपट्टीची आणखी एक वेगळी ओळख निर्माण होईल, अशी माहिती झाडीपट्टी अखिल नाट्य संमेलनाचे अध्यक्ष अनिरुद्ध वनकर यांनी दिली.

हे सुद्धा वाचा

विविध समित्यांचे गठण

संमेलनाच्या व्यवस्थापनासाठी मुख्य समिती, स्वागत समिती, स्टेज  व्यवस्थापन समिती, भोजन समिती, निवास समिती, स्वागत समिती, प्रसिद्धी व प्रचार समिती, महिला व्यवस्थापन समिती, भोजन समिती, निवास समिती, नाटक समिती, सांस्कृतिक संगीत समिती,  पुरस्कार निवड समिती, आर्थिक जमापुंजी समिती, स्टेज  व्यवस्थापन समिती, व विविध समित्यांचे गठन करण्यात आले आहे.  झाडीपट्टी नाट्य संमेलन मुख्य समितीमध्ये अनिरुद्ध वनकर, हिरालाल सहारे (पेंटर), अनिल उट्टलवार , परमानंद गहाणे, प्रल्हाद मेश्राम, शेखर पटले, प्रा. शेखर डोंगरे, भास्कर पिंपळे, नित्यानंद बुद्धे, अंबादास कांबळी, मुस्ताक शेख, सचिन कवासे, सपना मोटघरे, किरपाल सयाम, संदीप राऊत, संजय रामटेके  यांची निवड करण्यात आली.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.