उपयुक्तता संपली की डस्टबिनमध्ये…; मंत्रिपदावरून विजय वडेट्टीवार यांचा अजित पवार गटाला टोला

Vijay Wadettiwar on Ajit Pawar Group : काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी अजित पवार गटावर जोरदार निशाणा साधला आहे. त्यांनी मंत्रिपदावरून अजित पवार गटाला टोला लगावला आहे. विजय वडेट्टीवार यांनी काय म्हटलं? मंत्रिपद आणि भाजप यावर वडेट्टीवार काय म्हणाले? वाचा सविस्तर...

उपयुक्तता संपली की डस्टबिनमध्ये...; मंत्रिपदावरून विजय वडेट्टीवार यांचा अजित पवार गटाला टोला
Image Credit source: Facebook
Follow us
| Updated on: Jun 09, 2024 | 8:30 PM

एनडीए सरकारचा शपथविधी सोहळा सध्या होतोय. यात नरेंद्र मोदी यांच्यासह एनडीए सरकारमधील मंत्री शपथ घेत आहेत. मात्र यात राष्ट्रवादी अजित पवार गटातील नेत्यांचा समावेश नाहीये. अशातच विधानसभेचे विरोधी पक्षनेते, काँग्रेसचे वरिष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांनी मंत्रिपदावरून टोला लगवला आहे. भाजपचे नेहमीच धोरण आहे उपयोगी आहे तोपर्यंत उपभोगात आणायचं. निरुपयोगी झालं की काढून फेकायचं. आता राष्ट्रवादी अजित पवार गटाची हीच स्थिती आहे त्यांची उपयुक्तता संपली आहे. हे भाजपने ठरविलं आहे. उपयुक्तता संपली की डस्टबिनमध्ये जातात…, असं विजय वडेट्टीवार म्हणाले.

अजित पवार गटाला टोला

प्रभू रामचंद्राने अयोध्यामध्ये सुद्धा आशीर्वाद इंडिया आघाडीला दिला आहे. आता राष्ट्रवादी या दुखातून कसे सावरतात हे पाहावं लागणार आहे. राष्ट्रवादीचा एक खासदार आहे आणि भाजपने मॅजिक आकडा पूर्ण केला आहे. त्यामुळे हे राहिले काय आणि गेले काय त्यांना काही फरक पडणार नाही. मात्र त्यांची मजबुरी आहे. त्यांना राहावंच लागणार आहे. कारण हे इकडे परत येऊ शकत नाही आणि तिकडे दुखवू शकत नाही.धरलं तर चावते आणि पडलं तर धावतंय, अशी त्यांची अवस्था आहे, असं म्हणत वडेट्टीवार यांनी अजित पवार गटाला टोला लगावला आहे.

विजय वडेट्टीवार काय म्हणाले?

एका खासदारावर त्यांना मंत्रिपद कसा देतील त्यांचे जेवढे आहे ते पाहूनच देणार एक वर राज्यमंत्री पद मिळत होतं. तर त्यांनी स्वीकाराला पाहिजे होतं जो मिला ओ ही सही अशी परिस्थिती आहे. आता त्यांनी सगळ्याला घेतला आहे. सुखके सब साथी मात्र दुःखात यांच्या कोण राहील हे येणारा काळ सांगेल. जेडीयूला एकच कॅबिनेट आणि एक राज्यमंत्री दिलं त्यांची बोळवण केली आहे. बिना पाण्याने हजामत त्यांची केली आहे. पुढे काय काय होते ते पाहू…, , असंही वडेट्टीवार म्हणाले.

आज तिसऱ्यांदा पंतप्रधान आणि भाजप शपथ घेत असताना या दोन लोकांना वाटाण्याच्या अक्षदा सहा महिन्यात लावल्या नाही. त्यांचे पक्ष फोडले नाही तर नवल वाटू नये असं मला वाटतं. आज तर सुरुवात झाली आहे काय होईल? हे कुठल्या दिशेने जातील. कारण प्रत्येकाचा अजेंडा वेगळा आहे. आरक्षणाचा विषय वेगळा आहे. हे सगळं पुढे कसं चालतं यावर आमचं लक्ष आहे, असं विजय वडेट्टीवार यांनी टीव्ही 9 मराठीशी बोलताना म्हटलं आहे.

तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल.
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती.
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे.
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस.
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू.
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी.
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.