खऱ्या बापाची औलाद असेल तर आरोप सिद्ध करा, वडेट्टीवारांचं पडळकरांना आव्हान; 50 कोटींचा दावा ठोकण्याचा इशारा

राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांची छत्तीसगडमध्ये फॅक्ट्री असल्याचा दावा भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी केला आहे. पडळकरांच्या या आरोपावर वडेट्टीवार यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. (vijay wadettiwar will file the defamation case against gopichand padalkar)

खऱ्या बापाची औलाद असेल तर आरोप सिद्ध करा, वडेट्टीवारांचं पडळकरांना आव्हान; 50 कोटींचा दावा ठोकण्याचा इशारा
vijay wadettiwar
Follow us
| Updated on: Sep 06, 2021 | 1:02 PM

नागपूर: राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांची छत्तीसगडमध्ये फॅक्ट्री असल्याचा दावा भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी केला आहे. पडळकरांच्या या आरोपावर वडेट्टीवार यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. बाबा रे तुला काय बोलायचं असेल तर पुराव्यानिशी बोल. बेछूटपणे काही आरोप करू नकोस. खऱ्या बापाची औलाद असेल तर आरोप सिद्ध कर. नाही तर आज तुला नोटीस देणार आहेच. हे माझं ठरेललं आहे, असा इशारा विजय वडेट्टीवार यांनी दिला आहे. पडळकरांवर 50 कोटींचा अब्रूनुकसानीचा दावा करणार असल्याचंही वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे. (vijay wadettiwar will file the defamation case against gopichand padalkar)

विजय वडेट्टीवार यांनी मीडियाशी बोलताना हा इशारा दिला आहे. पडळकरांनी ऐकिव गोष्टीवर आरोप करू नये. वास्तव गोष्टींवर आरोप करावेत. आता ते कार्यकर्ते राहिले नाहीत. आमदार झाले आहेत. एखाद्या मंत्र्यावर जबाबदारीने आरोप केले पाहिजेत. माझी छत्तीसगडमध्ये फॅक्ट्री असल्याचा त्यांनी आरोप केला आहे. कोणत्या ठिकाणी ही फॅक्ट्री आहे हे त्यांनी सांगावं. पत्ता काढावा. कोणत्या नातेवाईकाची आहे हे सांगावं. नाही सांगितलं तर मी अब्रुनुकसानीचा दावा करेन. कोर्टात जाईल. माझी कोणत्याही दुकानात भागिदारी नाही. असेल तर पुराव्यानिशी सिद्ध करावी, असं वडेट्टीवार म्हणाले.

तर राजकारण सोडेल

पडळकर यांनी माझ्यावर केलेले आरोप सिद्ध करावे, पुरावे द्यावे, आरोप सिद्ध झाले तर मी राजकारण सोडेल. माझ्या नावाने, माझ्या नातेवाईकांच्या नावे कुठलंही दारुचे दुकानं नाही. छत्तीसगडमध्ये कंपनी नाही. पडळकर खऱ्या बापाची औलाद असेल तर, तर त्यांनी आरोप सिद्ध करावे, असं आव्हानच त्यांनी दिलं.

पडळकर सुपारी घेऊन काम करतात

इयत्ता सातवीपर्यंत शिकलेला चंद्रपुरातील एक माणूस केंद्रात मंत्री होता. माझ्या आईने कष्ट करुन मला शिकवलं. संघर्षातून मी शिकलो. चळवळीतून घडलो. ओबीसी चळवळीला बदनाम करण्याचं काम पडळकर करतात. सुपारी घेऊन चळवळ संपवण्याचं काम ते करत आहेत. पडळकर खरंच ओबीसींसाठी काम करणार असेल तर त्यांनी सोबत यावं. चंद्रशेखर बावनकुळे कधीही पातळी सोडून बोलत नाहीत. ओबीसींचं नुकसान होणार नाही ही माझी आणि बावनकुळेंची भूमिका आहे, असं सांगतानाच भाजपमध्ये जाणार नाही असं कुलदैवताची शपथ घेऊन पडळकर भर सभेत बोलले होते. त्याचं काय झालं?, असा सवालही त्यांनी केला. (vijay wadettiwar will file the defamation case against gopichand padalkar)

संबंधित बातम्या:

पडळकरांचं वडेट्टीवारांना पत्र, उद्धव ठाकरे स्टाईल कानपिचक्या, 6 वेळा किंबहुना शब्दाचा प्रयोग

मी वाघ आहे, कशी ते तुमच्या बापाला जाऊन विचारा, चित्रा वाघ यांचं राष्ट्रवादीच्या नेत्याला प्रत्युत्तर

करुणा शर्माच्या गाडीत पिस्तूल ठेवल्याचा व्हिडीओ व्हायरल, फडणवीस, राणे नेमकं काय म्हणाले?

(vijay wadettiwar will file the defamation case against gopichand padalkar)

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.