Nagpur Voter : मतदार छायाचित्र अपडेट, राज्यातील महानगरात नागपूर प्रथम, जिल्हाधिकारी विमला यांची माहिती

एकच व्यक्तीसाठी एकच मतदान कार्ड राहील. त्यासोबतच मतदाराची ओळख प्रस्थापित होऊन मतदार यादीतील नोंदीचे प्रमाणीकरण होईल, असे जिल्हाधिकारी आर. विमला यांनी सांगितले.

Nagpur Voter : मतदार छायाचित्र अपडेट, राज्यातील महानगरात नागपूर प्रथम, जिल्हाधिकारी विमला यांची माहिती
राज्यातील महानगरात नागपूर प्रथम
Follow us
| Updated on: Aug 19, 2022 | 4:20 PM

नागपूर : मतदार यादी विशेष पुनरीक्षण कार्यक्रम वर्षात चारदा म्हणजेच 1 जानेवारी, 1 एप्रिल, 1 जुलै, 1 ऑक्टोबर महिन्यात होणार आहे. या तारखांवर 18 वर्षे पूर्ण झालेल्या उमेदवारास मतदार नोंदणी करता येणार आहे. ऑनलाईन नोंदणी केल्यास त्याचा लाभ मतदारास लवकर मिळतो. त्यासाठी निवडणूक ॲपचा (Election App) वापर करावा. मतदार नोंदणी कार्यक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी आर. विमला यांनी केले आहे. यासोबत मतदार छायाचित्र अपडेट करण्यात राज्यातील महानगरात नागपूर प्रथम (Nagpur first in metropolis) असल्याचे आर. विमला यांनी सांगितलं. मतदार यादीशी आधार क्रमांक जोडणी विशेष पुनरीक्षण कार्यक्रम, नागपूर विभाग शिक्षक मतदार (Nagpur Division Teacher Voter) संघच्या मतदार यादीत नाव नोंदणी कार्यक्रमासंदर्भात राजकीय पक्षांची बैठक झाली. या बैठकीत जिल्हाधिकारी कार्यालयाच्या छत्रपती सभागृहात त्यांनी ही माहिती दिली. उपजिल्हाधिकारी निवडणूक मिनल कळसकर, उपविभागीय अधिकारी नागपूर शेखर घाडगे, तहसीलदार राहुल सारंग तसेच राजकीय पक्षांचे प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते.

महिला मतदारांची संख्या वाढविण्यावर भर

मतदार पुनरीक्षण कार्यक्रम वर्षातून चारदा होणार आहे. त्यामुळे मतदारांनी नमुना 6-ब भरुन नाव नोंदणी, वगळणी करावी. तसेच इतर बदल करुन घ्यावे, असे जिल्हाधिकारी म्हणाल्या. काही तालुक्यात पुरुष मतदारांच्या तुलनेत महिला मतदारांची संख्या कमी आहे. महिला मतदारांच्या संख्या वाढीवर भर देण्याचे आवाहन त्यांनी केले. राजकीय पक्षांनी मतदान कार्डशी आधार संलग्न करण्यासाठी मतदारांना प्रोत्साहित करण्यासाठी सहकार्य करावे. आधार संलग्न मतदान कार्ड करणे हे ऐच्छिक आहे. त्यामुळे एकाच मतदाराचे नाव विविध मतदार संघात असल्यास ते कळेल. एकच व्यक्तीसाठी एकच मतदान कार्ड राहील. त्यासोबतच मतदाराची ओळख प्रस्थापित होऊन मतदार यादीतील नोंदीचे प्रमाणीकरण होईल, असे जिल्हाधिकारी आर. विमला यांनी सांगितले. आधार संलग्न मतदार कार्ड करणे हे महत्वाचे आहे. या मोहिमेस सर्वांनी सहकार्य करण्याचे आवाहन त्यांनी केले.

शिक्षकांनी मतदार नोंदणी करुन घ्यावी

नागपूर विभाग शिक्षक मतदार संघाची निवडणूक प्रक्रिया 1 ऑक्टोबरपासून सुरु आहे. प्रारुप मतदार यादी 23 नोव्हेंबर रोजी प्रसिध्द होणार आहे. अंतिम मतदार यादी 30 डिसेंबर प्रसिध्द होणार आहे. 1 नोव्हेंबर या अर्हता तारखांवर आधारीत शिक्षक मतदार संघासाठी शिक्षकांनी मतदार नोंदणी करुन घ्यावी, असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. मतदान नोंदणी अधिकारी हे मतदार यादीत असलेल्या प्रत्येक व्यक्तीकडून विहित स्वरुपात आणि रितीने आधार क्रमांक मिळविण्यासाठी वैधानिकरित्या प्राधिकृत करण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले. 1 एप्रिल 2023 पर्यंत किंवा तत्पूर्वी मतदार यादीत असलेली प्रत्येक व्यक्तींचा आधार क्रमांक मतदार यादीशी संलग्न करण्यात येईल. आधार जोडणीसाठी नमुना क्रमाक 6-ब भरुन देण्यात यावा. ऑनलाईन पध्दतीने आधार क्रमांक भरण्यासाठी अर्ज क्र 6-ब ERO Net, GARUDA, NVDP, VHA या माध्यमांवर देखील उपलब्ध आहे. त्याचा लाभ घ्यावा, असे त्यांनी सांगितले. आता वर्षातून चारवेळा हे शिबीर घेण्यात येणार आहेत. हा कार्यक्रम घरोघरी भेट देवून राबविण्यात येणार आहे. शंभरटक्के मतदारांशी संपर्क साधून त्यांच्याकडून 31 मार्च 2023 पूर्वी नमुना अर्ज क्र. 6-ब मध्ये आधार क्रमांक उपलब्ध करुन घेण्याबाबत प्रयत्न करण्यात येईल. मतदारांनी आधार क्रमांक उपलब्ध करुन द्यावा, हे या मोहिमेचे मूलभूत तत्व आहे.

हे सुद्धा वाचा

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.