Yavatmal | विदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसला पडणार खिंडार; डॉ. महेंद्र लोढा काँग्रेसच्या वाटेवर
यवतमाळ जिल्ह्यातील वणी विधानसभा मतदारसंघातील NCP चे अनेक पदाधिकारी पक्ष सोडणार आहेत. राष्ट्रवादीच्या जिल्हा नेतृत्वाने वेळोवेळी डावललं. त्यामुळं राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी पक्षावर उघड नाराजी व्यक्त केलीय.
नागपूर : विदर्भात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याकडून राष्ट्रवादीला खिंडार पाडण्याचा प्रयत्न केला जातोय. राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस डॉ. महेंद्र लोढा काँग्रेसच्या वाटेवर आहेत. मंत्री धनंजय मुंढे यांचे निकटवर्तीय काँग्रेसच्या वाटेवर आहेत. यवतमाळ जिल्ह्यातील वणी विधानसभा मतदारसंघातील NCP चे अनेक पदाधिकारी पक्ष सोडणार आहेत. राष्ट्रवादीच्या जिल्हा नेतृत्वाने वेळोवेळी डावललं. त्यामुळं राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी पक्षावर उघड नाराजी व्यक्त केलीय.
पाच वर्षांपूर्वी लोढा आले होते राष्ट्रवादीत
पाच वर्षांपूर्वी वणी विधानसभा क्षेत्रात राष्ट्रवादी काँग्रेस अस्तित्वात नव्हती. तेव्हा धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून डॉ. महेंद्र लोढा यांच्यासह अनेक कार्यकर्ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दाखल झाले. धनंजय मुंडे यांनी वणी विधानसभा क्षेत्राची जबाबदारी लोढा यांच्याकडं सोपविली. तेव्हापासून मी राष्ट्रवादीसाठी काम करत असल्याचं डॉ. महेंद्र लोढा यांनी सांगितलं.
गावागावांत पोहचविली राष्ट्रवादी
राज्यस्तरावरचे प्रदेश सरचिटणीसपद लोढा यांना देण्यात आलं. त्यामुळं ते वणी क्षेत्रात जोमानं कामाला लागले. गावागावांत राष्ट्रवादी पक्षाची स्थापना केली. हे करत असताना पक्षाकडून कोणतीही अपेक्षा ठेवली नाही. आता वणी विधानसभा म्हणजे डॉ. लोढा यांचा एरिया असं समजलं जातं. वणीतील निवडणुकीसाठी साम-दाम दंड भेद यांचा वापर केला जातो. राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा गावोगावी लावण्याचा प्रयत्न केला जातो.
जिल्ह्याच्या नेतृत्वावर नाराजी
जिल्ह्याच्या नेतृत्वानं आम्हाला डावलनं सुरू केलंय. वणी विधानसभा क्षेत्रात निर्णय घेताना आम्हाला विचारात घेतले जात नाही. जिल्ह्याचे पदाधिकारी त्यांच्या मतानंच निर्णय घेतात. पक्ष आम्ही वाढविला. पण, पक्षाकडून आम्हाला काहीच मिळालं नाही. त्यामुळं लोढा यांच्यासह त्यांचे सहकारी समविचारी पक्षात जाण्याच्या विचारात आहेत. राज्यकडून तसेच जिल्ह्याकडून लक्ष दिलं जात नाही. नेहमी अपमान केला जातो. त्यामुळं राष्ट्रवादी पक्ष सोडून मानाचं स्थान मिळणाऱ्या पक्षात जाणार असल्याचं लोढा यांनी सांगितलं.