Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Nagpur validity certificate | जात वैधता प्रमाणपत्र काढायचंय? अर्ज सादर करण्यास मुदतवाढ

चालू वर्षामध्ये बारावीचे अर्ज 30 एप्रिल 2022 पर्यंत घेण्याचे व 30 जूनपर्यंत निकाली काढण्याचे समिती स्तरावर ठरविले आहे. तसेच 1 जुलैपासून बारावी विज्ञान शाखेमध्ये प्रवेशित विद्यार्थ्यांचे अर्ज घ्यावयाचे ठरविले आहेत. जे विद्यार्थी पुढील सत्रामध्ये बारावीमध्ये आहेत त्यांनी त्यांचे अर्ज 1 जुलैनंतर सादर करावे.

Nagpur validity certificate | जात वैधता प्रमाणपत्र काढायचंय? अर्ज सादर करण्यास मुदतवाढ
जात वैधता प्रमाणपत्रासाठी अर्ज सादर करण्यास मुदतवाढ
Follow us
| Updated on: Apr 09, 2022 | 5:15 AM

नागपूर : विद्यार्थ्यांचे जात वैधता प्रमाणपत्राकरिता (certificate) अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत 30 नोव्हेंबर 2021 होती. परंतु अद्यापही ज्यांनी 31 मार्चपर्यंत अर्ज (application ) सादर केलेले नाही अशा अर्जधारकांनी त्यांचे अर्ज 30 एप्रिलपर्यंत सादर करावे. असे जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे उपायुक्त तथा सदस्य सुरेंद्र पवार (Member Surendra Pawar) यांनी कळविले आहे. दुसऱ्या जिल्ह्यातील जातीचे प्रमाणपत्र असल्यास संबंधित जिल्ह्याच्या समितीकडे अर्ज सादर करावे. पूर्वी बारावीचे अर्ज विद्यार्थी शिकत असताना स्वीकारण्यात येत होते. परंतु शासनस्तरावर अनेक अभ्यासक्रमास प्रवेश घेण्यापूर्वीच वैधता प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे. त्यामुळे चालू वर्षामध्ये बारावीचे अर्ज 30 एप्रिल 2022 पर्यंत घेण्याचे व 30 जूनपर्यंत निकाली काढण्याचे समिती स्तरावर ठरविले आहे. तसेच 1 जुलैपासून बारावी विज्ञान शाखेमध्ये प्रवेशित विद्यार्थ्यांचे अर्ज घ्यावयाचे ठरविले आहेत. जे विद्यार्थी पुढील सत्रामध्ये बारावीमध्ये आहेत त्यांनी त्यांचे अर्ज 1 जुलैनंतर सादर करावे.

30 एप्रिल अर्ज भरण्याची मुदत

चालू वर्षात बारावी विज्ञान विषय असलेल्या विद्यार्थ्यांसाठी 1 ते 30 एप्रिल अर्ज भरण्याची मुदत राहणार आहे. पुढील वर्षासाठी 1 ते 30 जुलैपर्यंत मुदत राहणार आहे. व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेवू इच्छिणाऱ्या विद्यार्थी ज्या अभ्यासक्रमाला सीईटी अंतर्गत प्रवेश आहेत. वैधता प्रमाणपत्र बंधनकारक असलेले अर्जधारक 1 एप्रिल ते 30 जूनपर्यंत अर्ज दाखल करु शकतात. विद्यार्थी, पालक व संस्थांनी उपरोक्त प्रमाणे नोंद घ्यावी. मुदतीत कार्यवाही करावी, असे उपायुक्त जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती नागपूर यांनी कळविले आहे.

18 हजार 271 अर्ज प्राप्त

चालू वर्षात नागपूर जिल्हा जात प्रमाणपत्र समितीला 18 हजार 271 अर्ज प्राप्त झाले आहे. त्यापैकी 17 हजार 39 अर्ज वैध व 214 अर्जाबाबत अवैध निर्णय दिलेला आहे. 1 हजार 724 अर्जधारकांनी मुदतीत त्रुटीची पूर्तता न केल्यामुळे जात प्रमाणपत्र नियमानुसार नस्तीबध्द करुन परत करण्यात आले आहे. अनुसूचित जातीचे अर्जधारक असल्यास अर्जदाराचे वाडवडीलांचे 1950 पूर्वीचे नागपूर जिल्ह्यातील वास्तव्य पाहिजे. विमुक्त जाती व भटक्या जमाती प्रवर्गातील अर्जधारक असल्यास त्यांचे वाडवडीलांचे 1961 पूर्वीपासूनचे वास्तव्य जिल्ह्यातील आवश्यक आहे. इतर मागास प्रवर्ग व विशेष मागास प्रवर्गातील अर्जदाराचे वाडवडिलांचे वास्तव्य 1967 पूर्वीपासूनचे जिल्ह्यातील असणे आवश्यक आहेत.

93.47 टक्के प्रकरणे निकाली

नागपूर समितीने चालू वर्षात एकूण प्रकरणांच्या तुलनेत 93.47 टक्के प्रकरणे निकाली काढले आहेत. तसेच जे प्रमाणपत्र वैध ठरले आहे ते अर्जदारांच्या ई-मेलवर पाठविण्यात आलेले आहेत. अर्जधारकांनी प्राप्त वैधता प्रमाणपत्र साईन नॉट व्हालीड नमूद असल्यास प्रमाणपत्र अडोब अक्रोबॅट ॲपमध्ये डाऊनलोड करावा व सेवअझ करुन प्रिंट काढावी. असे केल्यास सही वैध राहील, असेही कळविण्यात आले आहे.

Bombay High Court : बॉम्बे उच्च न्यायालय अंतर्गत महाराष्ट्रात अनेक ठिकाणी भरती ! शैक्षणिक पात्रता, शेवटची तारीख, एका क्लिकवर

Nagpur Accident CCTV : दहेगाव फाट्यावर अंगावर काटा आणणारा अपघात! तिघेही बचावले, दोघांची प्रकृती गंभीर

Vidarbha Temperature | 11 पैकी 7 दिवस देशात सर्वाधिक तापमान चंद्रपूर, अकोल्यात; विदर्भात 11 एप्रिलपर्यंत उष्णतेच्या लाटा

बीड प्रकरणात पोलिसांनी मुलाहिजा बाळगू नये - अंबादास दानवे
बीड प्रकरणात पोलिसांनी मुलाहिजा बाळगू नये - अंबादास दानवे.
वडाळा येथे पोलीस आणि विश्व हिंदू परिषदेचे कार्यकर्ते आमनेसामने
वडाळा येथे पोलीस आणि विश्व हिंदू परिषदेचे कार्यकर्ते आमनेसामने.
रिक्षा अडवली म्हणून चालकाने पोलिसांना दिल अमित देशमुखांच्या नावाचा दम
रिक्षा अडवली म्हणून चालकाने पोलिसांना दिल अमित देशमुखांच्या नावाचा दम.
चांडाळ चौकडी ठाकरे बंधूंना एकत्र येऊ देणार नाही; शिरसाट यांची टोलेबाजी
चांडाळ चौकडी ठाकरे बंधूंना एकत्र येऊ देणार नाही; शिरसाट यांची टोलेबाजी.
ठाकरे बंधूंच्या युतीवर छगन भुजबळ थेट बोलले
ठाकरे बंधूंच्या युतीवर छगन भुजबळ थेट बोलले.
गिरगावात ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्यावर मनसेची बॅनरबाजी
गिरगावात ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्यावर मनसेची बॅनरबाजी.
जम्मू-काश्मीरमध्ये मुसळधार पाऊस आणि भूस्खलन; तिघांचा मृत्यू
जम्मू-काश्मीरमध्ये मुसळधार पाऊस आणि भूस्खलन; तिघांचा मृत्यू.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या गगनचुंबी पुतळ्याचं काम पूर्णत्वाकडे
छत्रपती शिवाजी महाराजांच्या गगनचुंबी पुतळ्याचं काम पूर्णत्वाकडे.
शिंदेंना ठाकरे बंधु एकत्र यायला नको आहे; राऊतांचा टोला
शिंदेंना ठाकरे बंधु एकत्र यायला नको आहे; राऊतांचा टोला.
ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चेवर शरद पवारांचे मौन
ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चेवर शरद पवारांचे मौन.