Video – Nagpur उपलवाडीतील गोदामाला आग, तीन गोदाम जळून खाक
अग्निशमन विभागाकडून आग विझविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. या आगीत तीन गोदाम जळून खाक झाल्याची माहिती आहे. प्लास्टीकच गोदाम असल्यानं आग पसरत चाललीय.

नागपुरातील उपलवाडी परिसरातील गोदामाला लागलेली आग.
नागपूर : शहरातील उपलवाडी परिसरात आज सकाळी मोठी आग लागलीय. कामठी रोड परिसरात प्लास्टिक गोदामाला ही आग लागली. अग्निशमन विभागाकडून आग विझविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. या आगीत तीन गोदाम जळून खाक झाल्याची माहिती आहे. प्लास्टीकच गोदाम असल्यानं आग पसरत चाललीय. त्यामुळं आग विझविण्याचे मोठे आव्हान अग्निशमन विभागापुढं आहे. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन विभागाची चमू घटनास्थळी दाखल झाली. त्यांनी आग विझविण्याचे प्रयत्न सुरू केली आहेत.

अग्निशमन विभागाकडून उपलवाडीतील आग विझविण्याचे प्रयत्न सुरू आहेत.