RSS Chief Mohan Bhagwat : दुर्बलता हा अपराध; हिंदूंना सरसंघचालकांचे मोठे आवाहन, या छुप्या शत्रुंचे नाव घेत काय सांगितला उपाय

RSS Chief Mohan Bhagwat : दुर्बलता हा अपराध आहे, हे हिंदूंनी लवकरात लवकर समजून घ्यावे. जगात अशा काही घटना घडत आहेत. त्यात ही दुर्बलता हिंदूंसाठी घातक असल्याचे राष्ट्रीय स्वंयसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी स्पष्ट केले. त्यांनी सध्याच्या घडामोडीचा आढावा घेत धर्मांधतेवर आसूड ओढला.

RSS Chief Mohan Bhagwat : दुर्बलता हा अपराध; हिंदूंना सरसंघचालकांचे मोठे आवाहन, या छुप्या शत्रुंचे नाव घेत काय सांगितला उपाय
हिंदूंना मोठे आवाहन
Follow us
| Updated on: Oct 12, 2024 | 9:45 AM

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी हिंदू समाजाला मोठे आवाहन केले आहे. त्यांनी सध्याच्या घडामोडीचा आधार घेत त्यांच्या डोळ्यात अंजन घालण्याचा प्रयत्न केला. दुर्बलता हा अपराध असल्याचे आवाहन त्यांनी हिंदूंना केले. ही बाब हिंदूंनी लवकरात लवकर समजून घ्यावे असे त्यांनी सांगितले. दुर्बलता हिंदू समाजासाठी घातक असल्याचे त्यांनी बांगलादेशातील हिंसक घटनावरून आणि हिंदूवरील वाढत्या हल्ल्यावरून सांगितले. त्यांनी सध्याच्या घडामोडीचा आढावा घेत धर्मांधतेवर आसूड ओढला. नागपूरमध्ये विजयादशमी उत्सवात त्यांनी अनेक घडामोडींवर थेट भाष्य केले.

बांगलादेशातील धर्मांधेतेवर प्रहार

विजयादशमीच्या उत्सवात सरसंघचालक मोहन भागवत यांनी शेजारील बांगलादेशातील हिंसेवर तीव्र प्रतिक्रिया दिली. या देशातील उद्रेकावर त्यांनी भाष्य केले. तात्कालिक कारण काही असो पण ही प्रतिक्रिया एकाएक घडली नसल्याचे त्यांनी ठासून सांगितले. येथील धर्मांधांनी त्यांचा राग हिंदू समाजावर काढला. त्यांनी त्यांच्यावर अत्याचार केला. हिंदूच नाही तर इतर अल्पसंख्यांकावर हल्ला चढवले. पण येथील हिंदू एकत्रित आले. संघटनेतून त्यांनी या अन्यायाला वाचा फोडली.

हे सुद्धा वाचा

दुर्बलता हा अपराध

त्यांनी यावेळी दुर्बलता हा अपराध आहे, असे आवाहन हिंदू समाजाला केले. दुर्बलता म्हणजे अत्याचाराला निमंत्रण देणे आहे, असे आवाहन त्यांनी केले. त्यामुळे हिंदू समाजाने संघटन करणे आवश्यक आहे. सशक्त राहावे. केवळ बांगलादेशातच नाही तर भारतात पण हा धोका असल्याचे त्यांनी सांगितले. आपल्या देशात पण त्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचा आरोप त्यांनी केला. देशात, समाजा-समाजात फुट पाडण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप त्यांनी केला. फुटीरता आणण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे आणि ते ओळखण्याचे आवाहन सरसंघचालकांनी यावेळी केले.

फुटीरतावाद्यांचे आवाहन

जगात सध्या समोरासमोर युद्ध करणे सोपे नसल्याचे त्यांनी अधोरेखित केले. त्यामुळे अनेक देशात फुटीरतावाद फोफावत चालल्याचे त्यांनी स्पष्ट केले. समाजा समाजात, जाती-जाती, धर्मा-धर्मात वेगळपणा दाखवण्याचा प्रयत्न जाणीवपूर्वक करण्यात येत आहे. विविधतेत एकतेचा मंत्राला सुरूंग लावून विविधतेला, वेगळेपणाला खतपाणी घालण्याचा प्रयत्न होत आहे. आपण त्यांच्यापेक्षा वेगळे आहोत याविचारांना हवा देण्याचे काम सुरू असल्याचा आरोप त्यांनी केला. छोट्या-छोट्या गोष्टींना हवा देत समाजात तेढ निर्माण करण्याचे प्रयत्न बाहेरील शक्ती करत असल्याचा धोका त्यांनी मांडला. मुद्दामहून संघर्ष निर्माण करण्यात येत आहे. हा धोका ओळखण्याचे आवाहन त्यांनी केले. त्यांनी बांगलादेशातील हिंदूंना मदत करण्याचे आणि त्यांच्या अधिकारांचे रक्षण करण्याचे आवाहन केंद्र सरकारला केले. त्यांनी देशात फुटीरतावादासाठी डाव्या शक्तींवर प्रहार केला.

'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला.
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद.
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?.
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच.
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली.
खातेवाटपानंतर पालकमंत्रिपदासाठी रस्सीखेच, कोणत्या जिल्ह्यात स्पर्धा?
खातेवाटपानंतर पालकमंत्रिपदासाठी रस्सीखेच, कोणत्या जिल्ह्यात स्पर्धा?.
महायुतीचं खातेवाटप जाहीर, फडणवीस-दादा अन् शिंदेंच्या वाटेला कोणत खातं?
महायुतीचं खातेवाटप जाहीर, फडणवीस-दादा अन् शिंदेंच्या वाटेला कोणत खातं?.
250 कोटींचा पीकविमा घोटाळ्याचा पॅटर्न, धस अण्णा यांचे मुंडेंवर निशाणा
250 कोटींचा पीकविमा घोटाळ्याचा पॅटर्न, धस अण्णा यांचे मुंडेंवर निशाणा.
'माझ्या मुलाचा मर्डर..', सोमनाथ सूर्यवंशीच्या आईच्या पवारांसमोरच संताप
'माझ्या मुलाचा मर्डर..', सोमनाथ सूर्यवंशीच्या आईच्या पवारांसमोरच संताप.