NMC Budget | नागपूर मनपाचे नावीन्यपूर्ण 5 उपक्रम कोणते? जाणून घ्या अर्थसंकल्पात वेगळं काय?

अर्थसंकल्प सादर करताना नावीन्यपूर्ण उपक्रमांचा विचार करण्यात आलाय. बायोमायनिंग प्रकल्प हा त्यापैकी एक. असा प्रकल्प उभारणारे नागपूर हे महाराष्ट्रातील पहिलं शहर आहे. नदीपात्र, नदी काठावर मियावायी पद्धतीने 60 हजार वृक्षांची लागवड करण्यात येईल. असेच काही नावीन्यपूर्ण उपक्रम...

NMC Budget | नागपूर मनपाचे नावीन्यपूर्ण 5 उपक्रम कोणते? जाणून घ्या अर्थसंकल्पात वेगळं काय?
नागपूर मनपाच्या अर्थसंकल्पातील नावीन्यपूर्ण उपक्रमImage Credit source: tv 9
Follow us
| Updated on: Jun 17, 2022 | 4:15 PM

नागपूर : मनपा आयुक्त राधाकृष्णन (Radhakrishnan) यांनी आरोग्य सुविधा, रस्ते, पाणीपुरवठा (Water Supply), घनकचरा व्यवस्थापन, शिक्षण (Education), पथदिवे यासह अनेक नावीन्यपूर्ण उपक्रमांवर अर्थसंकल्पात भर दिला आहे. याशिबवाय नावीन्यपूर्ण प्रकल्पांतर्गत नागरिकांच्या तक्रारींचे निवारण करण्यासंदर्भात 5 कोटी, बीओटी तत्वावर बाजार विकसित करण्यासंदर्भात 1 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. अमृत योजनेंतर्गत मनपाद्वारे कंत्राटदाराची नेमणूक करून 16 जलकुंभांचे बांधकाम करण्यात येणार आहे. यापैकी 11 जलकुंभांचे कार्यादेश निर्गमित करण्यात आले आहे. या सर्व कामांसाठी 80 कोटींची तरतूद करण्यात आली आहे.

  1. बायोमायनिंग प्रकल्प : शहरातील कचऱ्याची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावण्यासाठी बायोमायनिंग प्रकल्प उभारणारे नागपूर महाराष्ट्रातील पहिले शहर आहे. या प्रकल्पाच्या कामासाठी झिग्मा ग्लोबल एन्व्हायरो सोल्यूशनची निवड करण्यात आली आहे. प्रकल्पासाठी 40 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
  2. हर्बल उद्यान : शहरात उद्यान विभागांतर्गत 137 व नासुप्रकडून प्राप्त 44 उद्याने आहेत. यात फुलपाखरू उद्यान, सुगंधी उद्यान, रोझ उद्यान साकारण्यात येणार आहेत. जयताळा येथे 3.25 एकर परिसरात हर्बल उद्यान विकसित करण्याचे नियोजन आहे. दिव्यांगांसाठी संवेदना उद्यान : अंध, कर्णबधिर, बहुविकलांग, ऑटिजम, मेंदू पक्षपात, मानसिक मतिमंद अशा मुलांसाठी मनपातर्फे विशेष संवेदना उद्यान साकारण्यात येत आहे.
  3. शहर परिवहन : मनपा प्रशासक आणि आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी ई-बस वाहतुकीवर पूर्ण भर दिलेला आहे. त्याअंतर्गत मनपाच्या आपली बस सेवेमध्ये 115 इलेक्ट्रिक बसचा समावेश करण्यात येणार आहे.
  4. मियावाकी उद्यान : 2022-23 या आर्थिक वर्षात भांडेवाडीच्या धर्तीवर मनपाच्या उद्यानाकरिता राखीव जागा, नदीपात्र, नदी काठावर मियावायी पद्धतीने 60 हजार वृक्षांची लागवड करण्यात येईल. त्यांचे पालकत्व सामाजिक संस्थांना देण्यात येईल. पोलीस जिमखाना ते मुख्यमंत्री निवासस्थान रामगिरी रोडपर्यंत असलेल्या वॉकर्स रोड प्रमाणे इतर रोडवरही वॉकर्स स्ट्रीट निर्माण करण्याचे प्रयोजन आहे.
  5. विशेष ग्रंथालय : मनपाद्वारे वेगवेगळ्या संकल्पनेवर चार ग्रंथालये साकारण्याचे प्रस्तावित आहे. ज्येष्ठ नागरिकांसाठी राष्ट्रमाता कस्तुरबा ग्रंथालय, स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी डॉ. राममनोहर लोहिया ग्रंथालय, ऐतिहासिक साहित्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर संदेश ग्रंथालय, अभ्यासिका म्हणून बाजीराव साखरे ई-ग्रंथालयाचा विकास करण्याची तरतूद आहे.
ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर
ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर.
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला.
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.