Rohit Pawar | अनिल देशमुखांनी काय चुकीचं केलं? नागपुरात रोहित पवार यांचा सवाल, आरती देशमुखांचे डोळे पाणावले

सूडबुद्धीनं अनिल देशमुखांवर ही कारवाई करण्यात आली आहे. यावेळी आरती देशमुख यांचे डोळे पाणावले. आज त्यांच्या पतीचा वाढदिवस होता. पण, ते कुटुंबीयांसोबत वाढदिवस साजरा करू शकले नाही, याचं दुःख आरती देशमुख यांच्या चेहऱ्यावर दिसत होतं.

Rohit Pawar | अनिल देशमुखांनी काय चुकीचं केलं? नागपुरात रोहित पवार यांचा सवाल, आरती देशमुखांचे डोळे पाणावले
अनिल देशमुख यांच्या घरी भेट दिल्यानंतर आरती देशमुख, सलील देशमुख यांचं सांत्वन करताना रोहित पवार. Image Credit source: facebook
Follow us
| Updated on: May 09, 2022 | 4:45 PM

नागपूर : माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचा आज वाढदिवस. पण, ते कैदेत आहेत. त्यामुळं त्यांच्या मतदारसंघात आज राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी दौरा केला. विमानतळावर (Airport) उतरल्यानंतर रोहित सुरुवातीला अनिल देशमुख यांच्या घरी गेले. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना भेटले. काटोल हा अनिल देशमुख यांचा विधानसभा क्षेत्र. या भागातील विकासकामाचं भूमिपूजन (Bhumi Pujan of Development Works) तसंच उद्घाटन रोहित पवार यांच्या हस्ते पार पडले. यावेळी जिल्हा परिषद सदस्य (Zilla Parishad Member) सलील देशमुख, अनिल देशमुख यांच्या पत्नी आरती देशमुख या दौऱ्यात उपस्थित होत्या. काटोल पंचायत समितीतील भूमिपूजन सोहळ्यात रोहित पवार यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला.

भाजपच्या पोटात दुखायला लागलं

यावेळी ते म्हणाले, अनिल देशमुख यांनी काय चुकीचे केले. तुमचे आमदार दोषी नाहीत. भाजपला वाटत होतं शिवसेना सोबत येईल. पण, आली नाही. महाविकास आघाडी झाल्यावर भाजपच्या पोटात दुखायला लागलं. यातून सूडबुद्धीनं अनिल देशमुखांवर ही कारवाई करण्यात आली आहे. यावेळी आरती देशमुख यांचे डोळे पाणावले. आज त्यांच्या पतीचा वाढदिवस होता. पण, ते कुटुंबीयांसोबत वाढदिवस साजरा करू शकले नाही, याचं दुःख आरती देशमुख यांच्या चेहऱ्यावर दिसत होतं.

पवार कुटुंब तुमच्यासोबत

रोहित पवार यांनी सांगितलं की, भाजप तीन-तीन महिन्यांनी सांगत सरकार पडेल. पण आता तीन वर्षे पूर्ण झालेत. फक्त महाविकास आघाडीला अडचणीत आणण्यासाठी प्रयत्न करतात. ईडीवाले शाळेत गेले की नाही मला माहीत नाही. लवकरच अनिल देशमुख बाहेर येतील, असा विश्वास आम्ही देतो. पवार कुटुंब तुमच्यासोबत आहे. पूजा हा व्यक्तिगत विषय आहे. पण स्वत:च्या हितासाठी कोणी राजकारण करत असेल तर तुम्ही त्यांच्यापासून दूर राहा, असा सल्ला रोहित पवार यांनी दिला.

हे सुद्धा वाचा

गणेश टेकडी मंदिरात होमहवन

दरम्यान, माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या वाढ दिवसाच्या निमित्ताने राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी नागपूरच्या प्रसिद्ध टेकडी गणेश मंदिरात होम हवन पूजा पाठ करत त्यांच्या सुटकेसाठी आणि चांगल्या आरोग्यासाठी प्रार्थना केली. अनिल देशमुख सध्या 100 कोटी वसुली प्रकरणात जेल मध्ये आहेत. आज त्यांचा वाढदिवस आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांनी हे आयोजन केलं. यात शहराध्यक्ष दुनेश्वर पेठेंसह प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.