Maharashtra Budget 2022 : राज्याच्या अर्थसंकल्पातून विदर्भाला काय मिळाले? वाचा दहा महत्त्वाच्या घोषणा
हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृध्दी महामार्गाचा नागपूर ते भंडारा-गोंदिया, नागपूर ते गडचिरोली असा विस्तार करणार अशी घोषणा अर्थमंत्री अजित पवार यांनी केली. बाळासाहेब ठाकरे गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणी उद्यानात आफ्रिकन सफारी सुरू करण्यात येणार असल्याचंही ते म्हणाले. वाचा विदर्भासाठीच्या दहा महत्त्वाच्या घोषणा
अर्थसंकल्पावर प्रतिक्रिया देताना अर्थमंत्री अजित पवार.
Follow us
गोसीखुर्द राष्ट्रीय प्रकल्पासाठी सन 2022-23 मधे 853 कोटी 45 लाख रुपये निधी
देशी गायी, म्हशींची उत्पादकता वाढवण्यासाठी विदर्भात एक मोबाईल प्रयोगशाळा देणार.
अमरावती, भंडारा, येथे प्रत्येकी 50 खाटांची प्रथम दर्जाची ट्रॉमा केअर युनिट उभारणार.
यवतमाळ, बुलढाणा, वर्धा, भंडारा, येथे प्रत्येकी 100 खाटांची स्त्री रुग्णालये स्थापन करणार.
नागपूर येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर वैद्यकीय शिक्षण व संशोधन संस्था येथे पदव्युत्तर संस्था स्थापन करण्यात येणार.
हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृध्दी महामार्गाचा नागपूर ते भंडारा-गोंदिया, नागपूर ते गडचिरोली असा विस्तार करणार.
वाशीम, कचराळा (जि.चंद्रपूर) आणि यवतमाळ येथे एकूण 577 मेगावॅट क्षमतेचे सौर ऊर्जा प्रकल्प,
नागपूर येथे स्वातंत्र्यलढ्याशी निगडीत स्थळांचा हेरिटेज वॉक
गोसीखुर्द येथे जल पर्यटन प्रकल्प प्रस्तावित
बाळासाहेब ठाकरे गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणी उद्यानात आफ्रिकन सफारी सुरू करणार.